गूगल फॉर इंडिया २०२१ : खास भारतासाठी गूगलमध्ये नव्या सुविधा !

गूगल फॉर इंडिया हा कार्यक्रम गूगलचे भारतीय वापरकर्त्यांसाठी सुरु असलेले प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी आयोजित केला जातो. Google For India मध्ये यंदाच्या सातव्या वर्षीही बऱ्याच नव्या गोष्टी आणल्या आहेत. गूगल आता देशातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी पर्याय शोधण्याचं काम करणार आहे. गेल्यावर्षी गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी यावेळी भारतात तब्बल ७५००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं होतं! याचा पहिल्या वर्षासाठी वापर JioPhone Next सादर करण्यासाठी वापरण्यात आला आहे असं गूगलने सांगितलं आहे.

गूगल करियर सर्टिफिकेट्स

गूगलने भारतात तब्बल दहा लाख जणांसाठी करियर सर्टिफिकेट्ससुद्धा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. Data Analytics, IT Support, IT Automation, UX Design, Project Management अशा क्षेत्रामधील कोर्स तुम्ही पूर्ण करू शकता. यांची किंमत ६००० ते ८००० रुपयांपर्यंत असेल व हे Coursera वर उपलब्ध असतील. हा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केल्यावर गूगलने भागीदारी केलेल्या Accenture, Wipro, Times Internet, genpact, Tech Mahindra, Better या कंपन्यांमध्ये जॉबसाठी थेट प्रयत्न करू शकतात!
अधिक माहिती : grow.google/certificates

गूगलने १,००,००० विद्यार्थ्यांसाठी Nasscom Foundation, Safeducate आणि Tata Strive यांच्यासोबत भागीदारी करत स्कॉलरशिपसुद्धा जाहीर केली आहे.

गूगलची लहान व्यवसायांना मदत

SIDBI (Small Industries Development Bank of India) च्या सोबत भागीदारी करत लहान व्यवसायांसाठी (micro enterprises) गूगलने ११० कोटी रुपयांचा आर्थिक मदत कार्यक्रम जाहीर केला आहे. भारतातील सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योगांना पुढे आणण्याचं उद्दिष्ट यामागे आहे असं गूगलतर्फे सांगण्यात आलं आहे.

गूगल सर्चमधील नव्या सोयी

यावेळी जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख नव्या गोष्टींपैकी एक म्हणजे प्रथमच गूगल असिस्टंटच्या मदतीने COVID 19 च्या लसीची नोंदणी करता येणार आहे. ही सेवा ८ भारतीय भाषांमध्ये वापरता येईल.

ता गूगलमध्ये सर्च केल्यावर आलेल्या रिजल्टची भाषा इंग्लिश असली तरीही तो रिजल्ट वा ती वेबसाइट आणि त्यावरील माहिती भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करून पाहता येईल!

व्हॉइस आधारित सर्च रिजल्ट्ससाठीही आता भारतीय भाषांचा सपोर्ट देण्यात आला असून आता सर्च रिजल्ट्स आपल्या एका बटन क्लिकवर आपल्या भाषांमध्ये ऐकता येईल!

Exit mobile version