अडोबीचं ग्राफिक्स डिझाईनसाठी सोपं फ्री ॲप : Creative Cloud Express

Adobe Creative Cloud Express

अडोबीने खास सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी नवं ॲप आणलं असून यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया पोस्ट्स, पदार्थांचे मेन्यू, ब्रोशर्स, पोस्टर्स, आमंत्रण, कोलाज तयार करता येतील सोबत फोटो एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगसाठीही यामध्ये पर्याय देण्यात आले आहेत. हे ॲप मोफत उपलब्ध असून यामधील आणखी सुविधांचा वापर करायचा असेल तर तुम्हाला महिन्याला $9.99 (~₹७६०) द्यावे लागतील.

अडोबी CC Express च्या मोफत प्लॅनमध्ये तुम्हाला हजारो टेंप्लेट, डिझाईन्स आणि काही अडोबी फॉन्ट देण्यात आले आहेत. अडोबी स्टॉकमधील काही फोटोसुद्धा मिळतील. बेसिक एडिटिंग आणि इफेक्टस मिळतील. 2GB चं क्लाऊड स्टोरेज मिळेल. यांचं ॲप iOS, अँड्रॉइड आणि वेबसाइटवरही उपलब्ध आहे.

Download Adobe Creative Cloud Express : adobe.com/express

प्रीमियम प्लॅनमध्ये सर्व प्रीमियम टेंप्लेट, अडोबी स्टॉकचं पूर्ण फोटो कलेक्शन, २००००+ अडोबी फॉन्ट, एडिटिंगसाठी अधिक पर्याय, एका क्लिकवर तुमचा लोगो, रंग, ब्रँडिंग जोडता येईल, क्लाऊड लायब्ररी, 100GB चं क्लाऊड स्टोरेज मिळेल. प्रीमियम प्लॅनमध्ये Adobe Premiere Rush, Adobe Photoshop Express, Adobe Spark Video आणि Adobe Spark Page यांमधील प्रीमियम फीचर्ससुद्धा उपलब्ध असतील.

Creative Cloud Express मधील काही खास सोयी

काही प्रमाणात किचकट असणाऱ्या अडोबी फॉटोशॉप ऐवजी कुणालाही सहजपणे टेंप्लेट वापरुन या ॲपमध्ये ग्राफिक्स डिझाईन, सोशल मीडिया पोस्ट्स तयार करता येतील. बरेच जण वापरत असलेल्या Canva ला अडोबीचा पर्याय म्हणजे CC Express म्हणता येईल अशी ही नवी सेवा आहे. पूर्वी Adobe Spark नावाने असलेली ही सेवा आता फ्री यूजर्ससाठी अधिक पर्यायांसोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Exit mobile version