व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

WhatsApp Edit Message

बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवल्यानंतर त्यामध्ये स्पेलिंग किंवा इतर काहीतरी चूक झालेली लक्षात येते. मग आपण *आणि पुढे सुधारित मेसेज लिहून परत नवा मेसेज म्हणून ते पाठवतो. मात्र आता हे करण्याची गरज उरणार नसून व्हॉट्सॲप स्वतः मेसेज एडिट करण्याची सोय उपलब्ध करून देत आहे!

तुम्ही मेसेजमध्ये चूक केल्यास किंवा तुमचा विचार बदलल्यास तुम्ही आता पाठवलेले संदेश संपादित करू शकता. ही सोय तुम्हाला शब्दलेखन त्रुटी दूर करण्यास किंवा तुमच्या संदेशांमध्ये संदर्भ जोडण्याची परवानगी देते.

एखादा मेसेज पाठवल्यावर १५ मिनिटांपर्यंतच आपल्याला एडिटचा पर्याय असेल. शिवाय एडिट केलेल्या मेसेजसमोर Edited असं लेबलसुद्धा दिसेल. मात्र एडिट करण्याच्या आधी तो मेसेज काय होता हे दिसणार नाही. ही सोय हळूहळू जगभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होत आहे. येत्या आठवड्यात सर्वांना उपलब्ध होईल.

व्हॉट्सॲपने अलीकडे नव्या सोयी जोडण्याचा धडाकाच लावला आहे. काही दिवसांपूर्वीच चॅट लॉक करण्याचा पर्याय आला होता. त्याआधी एकापेक्षा अधिक फोन्सवर एकच व्हॉट्सॲप अकाऊंट वापरता येण्याची सोय आली आहे!

Exit mobile version