MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

एकच व्हॉट्सॲप नंबर आता अनेक फोन्सवर वापरता येणार!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 26, 2023
in ॲप्स

गेली अनेक वर्षं मागणी असलेली एकच व्हॉट्सॲप फोन क्रमांक / अकाऊंट अनेक फोन्सवर वापरता येईल अशी सोय सरतेशेवटी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. याबद्दल काल स्वतः मार्क झकरबर्ग यांनी माहिती दिली आहे. पूर्वीच्या WhatsApp Web, WhatsApp Desktop सोबतच आता एकावेळी चार वेगवेगळ्या फोन्सवर एकच व्हॉट्सॲप नंबर वापरता येईल!

छोटे व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. सोबतच एकापेक्षा अधिक फोन्स वापरणाऱ्या युजर्ससाठीही हा नवा पर्याय आहे.

ADVERTISEMENT

हे करण्यासाठी आपल्या आधीच व्हॉट्सॲप इंस्टॉल केलेल्या फोनला Primary Phone असं गृहीत धरलं जाईल आणि नंतर आपण लॉगिन करणाऱ्या दुसऱ्या, तिसऱ्या, इ. फोन्सना Companion Phones असं समजलं जाईल.

  1. तुमच्या नव्या/दुसऱ्या फोन (Companion)वर WhatsApp इंस्टॉल करा
  2. ओपन केल्यावर उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या More Options वर टॅप करा.
  3. त्यानंतर Link to existing account
  4. आता एक QR कोड दिसेल जो आपल्याला पहिल्या आधीच व्हॉट्सॲप लॉगिन केलेल्या फोन (Primary) मध्ये स्कॅन करायचा आहे.
  5. त्यासाठी पहिल्या म्हणजेच Primary फोनमध्ये व्हॉट्सॲप उघडा
  6. त्यामध्ये More Options > Linked Devices > Link a device
  7. आता कॅमेरा उघडला असेल त्याद्वारे नव्या/दुसऱ्या फोनमध्ये दिसत असलेला QR कोड स्कॅन करा.
  8. आता तेच अकाऊंट या फोनमध्ये सुरू झालेलं दिसेल.

व्हॉट्सॲप अनेक फोन्सवर वापरत असताना खालील गोष्टी लक्षात ठेवा.

  • Live Location आणि स्टेट्स या सोयी दुसऱ्या फोन (Companion) मध्ये वापरता येणार नाहीत.
  • जर तुमच्या मुख्य (Primary) फोनमध्ये १४ दिवस व्हॉट्सॲप वापरलं नसेल तर या दुसऱ्या Companion फोन्सवरुन व्हॉट्सॲप लॉगआउट होईल.
  • लॉगआउट झाल्यावर तुम्हाला वरील कृती पुन्हा करावी लागेल.
  • लॉगिन केलेले फोन्स पाहण्यासाठी Settings मध्ये Linked Devices वर जा.
  • तुम्ही iOS व अँड्रॉइड असे दोन्ही प्रकारचे फोन्स लिंक करू शकता.
  • तुमची एक वर्षा पर्यंतची चॅट हिस्ट्री Sync होईल.
Source: WhatsApp Blog
Tags: AppsWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

ॲपलचं भारतातलं पहिलं अधिकृत दुकान बीकेसीमध्ये सुरू!

Next Post

ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Best of 2024 Play Store

गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 12, 2024
Next Post
ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech