MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 25, 2026
in News
WhatsApp CEO Kunal Shah

भारतीय फिनटेक कंपनी CRED चे संस्थापक कुणाल शाह यांची Meta ने व्हॉट्सॲपच्या ग्लोबल प्रमुख (Global Head of WhatsApp) म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच Meta ने CRED मध्ये सुमारे 900 दशलक्ष डॉलर (सुमारे ₹८५०० कोटी) इतकी मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारतीय उद्योजकतेची जागतिक स्तरावर पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे.

व्हॉट्सॲपचे विद्यमान प्रमुख Will Cathcart यांनी सात वर्षांच्या कार्यकाळानंतर पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते Meta मध्येच नव्या जबाबदारीत काम करणार असून, त्यांच्या जागी आता कुणाल शाह WhatsApp चे नेतृत्व स्वीकारतील.

ADVERTISEMENT

Meta ने कुणाल शाह यांच्यावर का दाखवला विश्वास?

कुणाल शाह हे भारतातील सर्वात प्रभावशाली स्टार्टअप उद्योजकांपैकी एक मानले जातात. त्यांनी २०१० मध्ये FreeCharge ची सह-स्थापना केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी CRED ची स्थापना केली. क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणाऱ्या ग्राहकांसाठी रिवॉर्ड-आधारित प्लॅटफॉर्म म्हणून CRED ने अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. Meta च्या मते, ग्राहकांच्या वर्तनाचा सखोल अभ्यास, डिजिटल पेमेंट्समधील अनुभव आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिक दृष्टीकोन यामुळे कुणाल शाह यांची WhatsApp साठी निवड करण्यात आली आहे.

शिक्षण: इंजिनिअरिंग किंवा MBA नाही!

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. वडिलांचा व्यवसाय बंद पडल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी डिलिव्हरी बॉय, डेटा एंट्री ऑपरेटर, मेहेंदी कोन विक्रेता, सायबर कॅफे ऑपरेटर, संगणक प्रशिक्षण देणे अशा अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. या अनुभवामुळे त्यांना ग्राहकांचे वर्तन, व्यवसाय अगदी जवळून समजले.

विशेष म्हणजे, कुणाल शाह यांच्याकडे ना इंजिनिअरिंगची पदवी आहे, ना पूर्ण केलेले MBA शिक्षण. त्यांनी मुंबईतील Wilson College मधून तत्त्वज्ञान (Bachelor of Arts in Philosophy) या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी NMIMS मध्ये MBA ला प्रवेश घेतला होता, मात्र काही महिन्यांतच त्यांनी तो अभ्यासक्रम सोडून उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला.

२०१० मध्ये त्यांनी संदीप टंडन यांच्यासोबत FreeCharge ची स्थापना केली. ऑनलाइन मोबाईल रिचार्जमध्ये फ्रीचार्जने मोठी झेप घेतली होती. २०१५ मध्ये Snapdeal ने ही कंपनी सुमारे 400 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतली. त्यानंतर काही वर्षे नवीन कल्पनांवर काम केल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी स्वतःच्या भांडवलातून CRED ची स्थापना केली. वेळेवर क्रेडिट कार्ड बिल भरणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड देण्याची संकल्पना CRED मुळे लोकप्रिय झाली.

CRED मध्ये 900 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक

या कराराचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे Meta कडून CRED मध्ये 900 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक. या गुंतवणुकीनंतर Meta कंपनीत Minority Investor म्हणून सहभागी होणार आहे. मात्र, CRED च्या ग्राहकांच्या डेटावर Meta ला कोणताही प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

WhatsApp साठी पुढील टप्पा

व्हॉट्सॲप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म असून भारत हा त्याचा सर्वात मोठा बाजार आहे. कुणाल शाह यांच्या नेतृत्वाखाली व्हॉट्सॲपमध्ये डिजिटल पेमेंट्स, व्यावसायिक सेवा आणि ई-कॉमर्सशी संबंधित सुविधा अधिक वेगाने विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Meta भारतासह ब्राझील आणि इंडोनेशिया यांसारख्या बाजारपेठांमध्ये WhatsApp ला अधिक सक्षम “सुपर ॲप” बनवण्याच्या दिशेने काम करत आहे.

It’s been a minute.

2015–2018
– Exited FreeCharge. Spent time learning and investing.
– Pondered about: Why can't trust be rewarded? Started with $1M of personal capital.
– Launched CRED to reward people for paying credit card bills on time.

2019–2025
– Built a system run by a…

— Kunal Shah (@kunalb11) June 22, 2026
Tags: CEOKunal ShahWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Next Post

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या किंमती वाढवल्या

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

April 1, 2024
Next Post
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या किंमती वाढवल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech