इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

Meta AI हा मेटा कंपनीचा ओपन-सोर्स एआय चॅटबॉट आता इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सॲपसह मेटाच्या प्लॅटफॉर्मवर जोडला जात आहे. अनेक जणांना त्यांच्या ॲप्समध्ये Meta AI चा अॅक्सेस उपलब्ध झालेला दिसू लागला आहे. मेटा प्रमुख मार्क झकरबर्गनी आता अधिकृत रोलआउट सुरू झाल्याचे जाहीर केलं आहे.

दिलेल्या माहितीनुसार या चॅटबॉटमध्ये आता Llama 3 या LLM (Large Language Model)चा समावेश आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सॲपसोबत https://www.meta.ai या वेबसाइटवरसुद्धा Meta AI वापरता येईल. सध्यातरी ही वेबसाइट भारतात उपलब्ध नाही त्यामुळे भारतीय युजर्सना फक्त ॲप्समधूनच याचा वापर करता येईल.

तुम्हाला इंस्टाग्राममध्ये सर्च बटनवर क्लिक केल्यावर Meta AI चा लोगो दिसेल त्यावर क्लिक केलं की हा चॅटबॉट वापरता येईल.

मेटा एआय म्हणजे काय?
Meta AI हा Meta कंपनीतर्फे तयार करण्यात आलेला ChatGPT चा एक स्पर्धक आहे. तुम्ही वेगवेगळा मजकूर तयार करण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, इमेजेस तयार करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी Meta AI वापरू शकता. त्यांचं याबद्दल असं म्हणणं आहे की “Meta AI हा आता सर्वात बुद्धिमान AI सहाय्यक आहे जो तुम्ही विनामूल्य वापरू शकता – आणि तुमच्या फ्रिजमध्ये काय आहे यावर आधारित डिनरचे नियोजन करण्यात, तुमच्या चाचणीचा अभ्यास करणे आणि बरेच काही करण्यात मदत करण्यासाठी मदत करेल.”

Meta AI द्वारे आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात. आपण त्याला ChatGPT, Google Gemini प्रमाणे प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकतो. निबंध/पत्र लिहून घेऊ शकतो. आपल्याला हव्या त्या प्रकारच्या इमेजेस मोफत तयार करून घेऊ शकतो. विविध प्रकारच्या पाककृती पाहू शकतो.

अधिक माहिती : https://about.fb.com/news/2024/04/meta-ai-assistant-built-with-llama-3

Exit mobile version