MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

ऑनलाइन खरेदीसाठीच्या टिप्स

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 13, 2014
in eCommerce
ऑनलाइन खरेदी हा सहजसोपा पर्याय असल्याने त्याला मिळणारी पसंती दिवसेंदिवस वाढतेच आहे. पण त्यात काही धोकेही असतात. अनेकांची फसवणूक होते , वस्तू चुकीची मिळते , बिल भरूनही वस्तू हाताशी येत नाही वगैरे अनुभव अनेकांना येतात. ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी अनेक ठिकाणी दिलेलीही असते. त्याकडेही दुर्लक्ष करणाऱ्यांच्यासाठी ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाच्या या काही टिप्स… 
… 

वेबसाइटना विक्री करताना डिस्ट्रिब्युटर , रिटेलरचे कमिशन द्यावे लागत नाही , त्यामुळे वस्तू स्वस्तात मिळतात. पण ऑनलाइन खरेदी करताना केवळ वस्तू स्वस्तात मिळते म्हणून खरेदी करू नका. ही खरेदी करताना वस्तूचा विक्रेता , विक्रीसाठीच्या अटी-नियम काळजीपूर्वक वाचा. काही ठिकाणी विक्रेत्या वेबसाइटची वॉरंटी मिळते तर काही ठिकाणी उत्पादकाची. उत्पादकाच्या सर्विस सेंटरचे जाळे मोठे असल्याने नक्कीच ती वॉरंटी अधिक फायदेशीर असते. बिलाच्या रकमेमध्ये व्हॅटचे पैसे समाविष्ट केले आहेत किंवा नाहीत याचीही माहिती करून घ्या. व्हॅटसह बिल नसेल तर सर्विस सेंटरवर प्रॉब्लेम येऊ शकतो. शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी याच पर्यायाची निवड करा. जेणेकरून नंतर विचार बदलल्यास वस्तू परत करता येते किंवा हवी असल्यास वस्तू ताब्यात घेतल्यावर पैसे देता येतात. 

* रिव्ह्यु वाचा 

कुठलीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी इतरांच्या त्याविषयीच्या प्रतिक्रिया काळजीपूर्वक वाचा. गुगलवर त्या वस्तूविषयी सर्च दिल्यावर शक्यतो सुरुवातीच्या ५ प्रतिक्रिया सोडून इतर वाचा , जेणेकरून संतुलित माहिती मिळेल. सोबतच विक्री करणारी वेबसाइट सुरक्षित आहे ना , त्या वेबसाइटविषयी इतरांच्या प्रतिक्रिया कशा आहेत हे नीट पहा. वस्तूंच्या किमतीची विविध वेबसाइट तुलना करून पहा. त्यासाठी mysmartprice.com या वेबसाइटची मदत घेऊ शकता. ऑनलाइन खरेदी करताना खूप ऑफर्सही मिळतात. त्यांची माहितीindiafreestuff.com या वेबसाइटवरून घेऊ शकता. 

* लिंक तपासून पहा 

खरेदी करताना किंवा बिल भरताना वेबसाइटच्या अॅड्रेस पूर्वी https किंवा लॉकचे चिन्ह आहे ना याची खात्री करा. अशा लिंक वरून केलेले व्यवहार अधिक सुरक्षित असतात. तसेच लिंकचा पत्ता काळजीपूर्वक वाचा. काही फसवे लोक लिंकचा अड्रेसमध्ये सुरुवातीचे शब्द मूळ वेबसाइट प्रमाणे ठेवतात मात्र नंतरच्या शब्दांमध्ये बदल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. तसेच मोबाइलमध्ये क्रेडीट कार्डची माहिती सेव्ह करून ठेवू नका. 

ADVERTISEMENT
Tags: eCommerceOnlineShoppingTipsTricks
ShareTweetSend
Previous Post

मायक्रोमॅक्सचा नवा लॅपटॅब

Next Post

सोनीने सादर केला प्रोजेक्टर; घरातच अनुभवा ‘मल्टीप्लेक्स’चा आनंद

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

October 6, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
Next Post
सोनीने सादर केला प्रोजेक्टर; घरातच अनुभवा ‘मल्टीप्लेक्स’चा आनंद

सोनीने सादर केला प्रोजेक्टर; घरातच अनुभवा 'मल्टीप्लेक्स'चा आनंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech