MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

प्रतिक्षा संपली! नोकियाचा पहिला टॅब्‍लेट लॉंच Lumia 2520, 10.1 इंचाची स्‍क्रीन आणि खूप काही…

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 29, 2013
in टॅब्लेट्स
ADVERTISEMENT
प्रतिक्षा संपली! नोकियाचा पहिला टॅब्‍लेट लॉंच, 10.1 इंचाची स्‍क्रीन आणि खूप काही...नोकियाने एका जंगी कार्यक्रमात आपल्‍या पहिल्‍या टॅब्‍लेटचे शाही लॉंचिंग केले. या कार्यक्रमात नोकियाने 6 हॅण्‍डसेट लॉंच केले. त्‍यात हा टॅब्‍लेट सर्वांच्‍या आकर्षणाच्‍या केंद्र स्‍थानी होता. हा टॅब्‍लेट विंडोज 8 ऑपरेटीग सिस्टिमवर काम करतो. याशिवाय कंपनीने काही ऍक्‍सेसरीजही लॉंच केले.

नोकियाच्‍या पहिल्‍या टॅब्‍लेटबद्दल प्रचंड उत्‍सुकता होती. या टॅब्‍लेटची स्‍क्रीन 10.1 इंचाची आहे. हे या टॅब्‍लेटचे प्रमुख आकर्षण आहे.

नोकियाने ल्‍युमिया 2520 हा टॅब्‍लेट लॉंच केला. हा एक उत्कृष्‍ट टॅब्‍लेट आहे. त्‍यात वेगळा किबोर्ड जोडण्‍याचीही सोय आहे. टॅब्‍लेटचे लुक्‍स स्‍टायलिश आहेत. स्‍क्रीन रिझॉल्‍यूशन 1080 पिक्‍सेल एवढे आहे. स्‍क्रीन फुल एचडी डिस्‍प्‍ले देते. खास बाब म्‍हणजे, कंपनीने 4 रंगांमध्‍ये टॅब्‍लेट सादर केला आहे. नोकियाचा टॅब्‍लेट कॉर्निंग गोरिल्‍ला ग्‍लास 2 प्रोटेक्‍शनसोबत येतो. कनेक्‍टीव्‍हीटीबाबत बोलायचे झाल्‍यास या टॅब्‍लेटमध्‍ये 4जी तंत्रज्ञान आहे. कोणत्‍याही टॅब्‍लेटमध्‍ये 4जी तंत्रज्ञान अद्याप पुरविण्‍यात आलेले नाही. 4जी तंत्रज्ञानामुळे हाय स्‍पीड ब्राऊझिंगचा वेगळाच आनंद मिळेल.

ल्‍युमिया 2520 टॅब्‍लेटमध्‍ये स्‍नॅपड्रॅगन 800 क्‍वाड कोर 2.2 GHz प्रोसेसर वापरण्‍यात आला आहे. तसेच 2 जीबी रॅम आहे. त्‍यामुळे निश्चितच टॅब्‍लेट अतिशय फास्‍ट आहे. टॅब्‍लेटमध्‍ये विंडोज 8.1 RT ही लेटेस्‍ट ऑपरेटींग सिस्टिम वापरण्‍यात आली आहे. नोकिया 2520 मध्‍ये बॅटरी चार्जिंग खूप वेगात होते. केवळ एका तासात बॅटरी 80 टक्‍के चार्ज होते. या टॅब्‍लेटमध्‍ये 6.7 मेगापिक्‍सेल कॅमेरा आहे. तसेच समोरुन 2 मेगापिक्‍सेल कॅमेरा आहे. नोकियाचे खास स्‍टोरीटेलर आणि व्हिडिओ डायरेक्‍टर ऍप्‍सदेखील या टॅब्‍लेटमध्‍ये आहेत.

नोकियाने अबूधाबी येथे टॅब्‍लेटचे लॉंचिंग केले. यावर्षी तरी हा टॅब्‍लेट ग्राहकांच्‍या हातात पडण्‍याची शक्‍यता नाही. या तिमाहीत अमेरिका, इंग्‍लंड आणि फिनलंड येथे टॅब्‍लेट पाठविण्‍यात येईल. इतर बाजारपेठेत पुढील वर्षाच्‍या पहिल्‍या तिमाहीत टॅब्‍लेट उपलब्‍ध होईल. भारतातील लॉंचिंगबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. तरीही पुढील वर्षाच्‍या सुरुवातीला भारतात हा टॅब्‍लेट लॉंच होण्‍याची अपेक्षा आहे. टॅब्‍लेटची किंमत 499 डॉलर्स म्‍हणजे भारतीय चलनानुसार जवळपास 31 हजार रुपये आहे. तसेच यासोबत मिळणा-या स्‍वतंत्र किबोर्डची किंमत 9 हजार रुपये आहे.

Tags: NokiaTabletsWindowswindows 8.1
ShareTweetSend
Previous Post

स्मार्टफोन विथ बेस्ट कॅमेरा

Next Post

दिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Crowdstrike BSOD Windows

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

July 19, 2024
ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

ॲपलचे नवे आयपॅड सादर : iPad Pro, iPad Air, M4 Chip, Pencil Pro!

May 8, 2024
सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

October 5, 2023
सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

July 26, 2023
Next Post
दिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही!

दिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech