MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

मोबाइल शॉपिंग जोरात

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 6, 2013
in eCommerce
ADVERTISEMENT
हातात स्मार्टफोन आला आणि कुठलीही कामं एका क्लिकवर होऊ लागली. कडक उन्हाळ्याच्या या दिवसांत तर बहुतेकांनी , दुकानांमध्ये जाऊन घामाघूम होत खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंगलाच पसंती दिली आहे. 

आपल्या हातात स्मार्टफोन आल्यापासून आपली अनेक कामं सोपी झाली आहेत. खूप लोक आपलं शॉपिंगही या स्मार्टफोनच्याच माध्यमातून करू लागली आहेत. मोबाइलवर फक्त एक क्लिक करून , आपल्या घरात आपल्याला पाहिजे ती वस्तू मिळत असेल तर ते कोणाला नको असेल ? त्यामुळे या एम शॉपर्सच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचं दिसून येतंय. बहुतांश कंपन्यांनी देऊ केलेलं स्वस्त थ्रीजी कनेक्शन आणि परवडण्याजोगे स्मार्टफोन यामुळे त्याचा वापर वाढला आहे. सर्वांना एम शॉपिंग करणं सोयीचं वाटू लागलं आहे. 

‘ इबे इंडिया ‘ या ऑनलाइन शॉपिंग कंपनीने नुकतंच याबाबत एक सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार बहुतांश लोकांनी उन्हाळी खरेदीसाठी एमशॉपीचाच पर्याय स्वीकारला आहे. एप्रिल महिन्यात केलेल्या या सर्वेक्षणामध्ये १ ‌हजार ३४५ ग्राहकांची पाहणी करण्यात आली. यात सहभागी झालेल्यांमध्ये ९२ टक्के ग्राहक पुरुष होते. त्यापैकी ३९ टक्के ग्राहक हे १८ ते २५ वर्ष या वयोगटातले तर ३१ टक्के ग्राहक २६ ते ३० वर्ष वयोगटातले होते. त्यामुळे खरेदीचं हे माध्यम तरुणांमध्ये किती लोकप्रिय होतं , हे समजतं. यापैकी ४९ टक्के मोबाइल शॉपर्स हे भारतातल्या छोट्या शहरातले होते. म्हणजे महानगरांपेक्षा छोट्या शहरांमध्ये एम शॉपर्सचं प्रमाण अधिक आहे. 

समर मोबाइल कॉमर्स सर्व्हेमधून समोर आलेली काही ठळक वैशिष्ट्यं… 

– उन्हाची तीव्रता आणि दुकानांमधली गर्दी टाळण्यासाठी ५९ टक्के मोबाइल शॉपर्सनी आपल्या मोबाइलवरूनच वस्तूंची खरेदी करणं पसंत केलं. 

– या ग्राहकांनी सनग्लासेस (४९ टक्के) , सुती कपडे (४३ टक्के) , टीज (३६ टक्के) , शॉर्टस (३४ टक्के) आणि टोप्या (१८ टक्के) अशी खरेदी करून उन्हाळ्यात ‘ कूल ‘ राहणं पसंत केलंय. 

– मोबाइल शॉपर्समधला सर्वात आवडता रंग हा पांढरा असून ५६ टक्के ग्राहकांनी या रंगालाच पहिली पसंती दर्शवली आहे. त्यापाठोपाठ निळा (५० टक्के) , हिरवा (२२टक्के) , काळा (२० टक्के) आणि क्रीम (२० टक्के) अशी टक्केवारी आहे. 

– आपल्या कुटुंबियांसाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी मोबाइल कॉमर्स शॉपर्स कपडे आणि फूटवेअर (४२ टक्के) घेणं सर्वाधिक पसंत करतात. 

– उपकरणांच्या किमतींची तुलना करणं (७२ टक्के) ही मोबाइल शॉपर्सची सर्वात लोकप्रिय अॅक्टिव्हिटी होती. 

– ४३ टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी रात्रीच्या वेळी शॉपिंग साइट्सवर जाणं पसंत केलं. 

– स्टोअर किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्यापूर्वी ६२ टक्के मोबाइल शॉपर्स नेहमी आपल्या फोनवरून किंमती मात्र तपासून पाहतात. 

– मोबाइल शॉपर्स आपल्या आवडत्या शॉपिंग साइट्स अॅक्सेस करण्यासाठी ब्राऊजरचा (४६ टक्के) वापर करतात. २१ टक्क्यांहून अधिक शॉपर्स आपल्या मोबाइलवर अॅप्स आणि ब्राऊजर असा दोन्हींचा वापर करतात. 

– ५७ टक्के ग्राहक थ्रीजी , ३२ टक्के टूजी तर केवळ ११ टक्के एज वापरतात. 

– सॅमसंग हा सर्वात लोकप्रिय मोबाइल उपकरण (३९ टक्के) ब्रॅण्ड असून त्यापाठोपाठ नोकिया (१६ टक्के) आणि अॅपलचा (११ टक्के) क्रमांक लागतो. त्यानंतर इतर कंपन्या येतात.

Some Sites for mobile shopping : 

1. m.flipkart.com
2. m.ebay.in

Tags: eBayeCommerceFlipkartServeryShopping
ShareTweetSend
Previous Post

सॅमसंगची नोकियावर कुरघोडी

Next Post

सहजसोपे करा विंडोज ८

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Flipkart Amazon Sale Offers 2024

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २७ सप्टेंबरपासून!

September 25, 2024
फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

October 6, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
Next Post

सहजसोपे करा विंडोज ८

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech