Sooraj Bagal

Sooraj Bagal

नोकियाने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त विंडोज स्मार्टफोन

नोकियाने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त विंडोज स्मार्टफोन

मोबाईल बाजारातील प्रसिद्ध ब्रँड नोकियाने भारतात गुरुवारी दोन मोबाईल लाँच केले. त्यातील एक विंडोज 8 स्मार्टफोन असून त्यांची किंमत १०,५००...

‘यू ट्यूब’ला आव्हान व्हेवो

' यू ट्यू ' ब हे नाव कुणाला माहीत नाही ? पण उठल्यासुटल्या त्यावर आपण जे व्हिडिओ पाहतो , ते नक्की कोण अपलोड करतं , एखादी ठराविक कंपनी ' यू-ट्यूब ' ला डेटा...

सॅमसंग गॅलक्सी एस फोर : चार सेकंदांत १०० फोटो काढा!

अॅपलच्या 'आयफोन ५'ला टक्कर देण्यासाठी आणि जागतिक स्मार्टफोनची बाजारपेठ काबीज करण्यासाठी आघाडीच्या स्मार्टफोनमेकर 'सॅमसंग'ने गुरुवारी 'सॅमसंग गॅलक्सी एस फोर'हा नवा...

गुगलला ७० लाख डॉलरचा दंड

अमेरिकेत इंटरनेटच्या खासगी वाय - फायनेटवर्कमधून गुपचूपपणे , बेकायदेशीर माहिती गोळा केल्याप्रकरणी ७० लाख अमेरिकन डॉलर्स दंड भरण्याचीतयारी गुगलने दर्शवली . अमेरिकेतील ३८ राज्यांमध्ये अॅटर्नी जनरलसोबत हा करार केला .  माहितीची गोपनीयता राखण्याबाबत कर्मचाऱ्यांना कडक प्रशिक्षण देण्यास तसेच यूजर्सना वायरलेस नेटवर्कसुरक्षित करण्याविषयी जागरूक करण्याची मोहीम राबवण्यासही गुगलने मान्यता दिली . गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूइमेजसाठी पॅनोरमा फोटो काढणाऱ्या वाहनांनी वायफाय इंटरनेटच्या असुरक्षित नेटवर्कमधून बेकायदेशीररित्याडेटा गोळा केल्याच्या वृत्तानंतर सुमारे डझनभर देशांमध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती . गुगलनेस्थानिक कायद्यांचे उल्लंघन केल्याचे नऊ देशांमध्ये समोर आले , असे इलेक्ट्रॉनिक प्रायव्हसी इन्फॉर्मेशन सेंटरनेस्पष्ट केले . स्ट्रीट व्ह्यू वाहनांनी अमेरिकेत २००८ ते २०१० या काळात गोळा केलेला ईमेल , पासवर्ड , वेबहिस्ट्री आणि अन्य डेटा नष्ट करण्याचे आश्वासनही गुगलने दिले . 

एका एसएमएसवर मोबाइल चार्ज

मोबाइल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे जेथे जाईल तेथे त्याची सोबत ठरलेलीच . असेअसताना कामाच्या गडबडीत , व्यापात मोबाइल चार्ज करणं चुकून राहून गेलं आणि अचानक बॅटरी डाउनझाल्यास मात्र धांदल उडते . मग मोबाइल चार्ज करण्याची पळापळ ठरलेलीच . आता मात्र या पळापळीला एकसोपा पर्याय उपलब्ध झाला आहे . फक्त एक टेक्स्ट एसएमएस पाठवायचा की बॅटरी चार्ज्ड ! बुचकळयात पडलात ना ? पण हे खरंच आहे . लंडनस्थित ' बफेलो ग्रिड ' नामक कंपनीने सौर ऊर्जेवर आधारितमोबाइल चार्जिंग स्टेशनची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे . या चार्जिंग स्टेशनचा वापर करण्यासाठी फक्त एकएसएमएस पाठविण्याची आवश्यकता आहे . मात्र हा पर्याय सध्या युगांडा येथील मोबाइलधारकांना उपलब्धअसून जगभरात पोहोचायचा आहे . आफ्रिका आ ​ णि आशिया खंडात दिवसेंदिवस मोबाइलधारकांचे प्रमाण वाढत आहे . त्यातही शहरी भागापेक्षाग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा असल्याने तेथील मोबाइलधारकांना हे स्टेशन वरदानच ठरणार आहे . 'बफेलो ग्रिड ' ने या तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम आफ्रिकेतील युगांडा या देशात केल्याचे वृत्त ' न्यू सायंटिस्ट ' नेदिले आहे . चार्जिंग स्टेशनमध्ये साठविण्यात आलेली उर्जा मोबाइलच्या बॅटरीला ' मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग 'या ( एमपीपीटी ) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याचेही ' न्यू सायंटिस्ट ' ने म्हटले आहे . मात्र ,तत्पूर्वी वर म्हटल्याप्रमाणे एक टेक्स्ट एसएमएस या ' ग्रिड ' ला पाठविणे आवश्यक आहे . हे सौर स्टेशन ६० वॉटक्षमतेचे आहे . हे स्टेशन तयार करण्यासाठी सर्व प्रकारच्या पर्यावरणाच्या निकषांचे पालन करण्यात आल्याचेहीकंपनीने म्हटले आहे . मात्र , मोबाइलचे चार्ज होणे सर्वस्वी स्टेशनच्या परिसरातील तापमान आणि सूर्याचाप्रकाश यावर अवलंबून असल्याचे ' बफेलो ग्रिड ' ने स्पष्ट केले आहे . ' एमपीपीटी ' ला जोडण्यात आलेले कम्प्युटर्सतापमान आणि त्यातील बदल यांची निरीक्षणे नोंदवणार आहेत . जेणेकरून यूजरना बॅटरी चार्ज होण्यासाठीलागणारा वेळ आणि शक्यता यांची माहिती मिळणार आहे . कशी चार्ज होईल बॅटरी ? युगांडातील मोबाइलधारकांना बॅटरी चार्ज करण्यासाठी ( एका एसएमएससाठी ) ११० शिलिंग ( भारतीयचलनात दोन रुपये ) खर्च येतो . स्टेशनला मेसेज आल्यानंतर मोबाइलमधील बॅटरी सॉकेटशी स्टेशन जोडण्यातयेते आणि नेहमीप्रमाणे बॅटरी चार्ज होण्यासाठी तयार असल्याचा संकेत दिला जातो . पण संबंधित मोबाइलचीबॅटरी चार्ज होण्यासाठी दीड तासांचा अवधी लागत असल्याचेही ' न्यू सायंटिस्ट ' ने म्हटले आहे . युगांडामधील हेस्टेशन पूर्ण चार्ज झाल्यानंतर तीन दिवस कार्यरत राहू शकते आणि दिवसाला ३० ते ५० मोबाइल चार्जिंगचीत्याची क्षमता आहे . 

Page 281 of 317 1 280 281 282 317
ADVERTISEMENT
error: Content is protected!