Sooraj Bagal

Sooraj Bagal

मोबाईल इंटरनेट वापर वाढला

मोबाईल इंटरनेट वापर वाढला

सायबर कॅफेत जाण्याऐवजी मोबाईलवर इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: महाविद्यालयीन युवक-युवती फेसबुक, ऑर्कुट, ट्‌विटर यासारख्या सोशल वेबसाईटवर...

फेसबुकला आपले फोटो का हवे असतात ?

फेसबुकला आपले फोटो का हवे असतात ?

सोशल मीडियामध्ये युर्जसच्या फोटोवरून वादंग माजले आहे. फिल्टर्स आणि कॅमेरा अँप्सच्या मदतीने गेल्या वर्षभरात सोशल नेटवर्किंग वेबसाइट युर्जसना मोठे फोटो...

ब्लॅकबेरीचा पहिला स्मार्टफोन BB Z10 लॉन्च, अ‍ॅपलला देणार जबरदस्त टक्कर

ब्लॅकबेरीचा पहिला स्मार्टफोन BB Z10 लॉन्च, अ‍ॅपलला देणार जबरदस्त टक्कर

ब्लॅकबेरी मोबाईल निर्माता कंपनी 'रिसर्च इन मोशन'चे (RIM) गुरुवारी दोन स्मार्टफोन बाजारात दाखल झाले. ब्लॅकबेरी Z10 आणि ब्लॅकबेरी Q10 अशी...

मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

मराठी विश्वकोश ई-बुक स्वरूपात

माहिती आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या मराठी विश्वकोशाचे सर्व १ ते १६ खंड आता ई - बुक स्वरूपात उपलब्धझाले आहेत . नियोजन आयोगाचे सदस्य डॉ . नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नुकतेच सोळाव्या खंडाचे लोकार्पणकरण्यात आले . तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेले पहिले पंधरा खंड आणि प्रा . मे . पुं . रेगेयांनी संपादित केलेला सोळावा खंड असा हा लाखो पानांचा ऐतिहासिक दस्तावेज आता इंटरनेटच्या माध्यमातूनजगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे .  चेंबूर येथील आचार्य मराठे कॉलेजमध्ये आयोजित या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ . जाधव यांनी आज घराघरात कम्प्युटर तसेच मोबाइलद्वारे प्रत्येकाच्या हातात इंटरनेट पोहोचले असताना युनिकोडमधून विश्वकोश जसा आहे , तसा वेबसाइटवर उपलब्ध करून देण्याची मराठी विश्वकोश मंडळाची संकल्पना अफाट असल्याचे सांगून विश्वकोश मंडळाची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे ' सी - डॅक ' चे महेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचीही स्तुती केली .  विश्वकोश मुलांनी वाचावा आणि इतरांनाही इंटरनेटवर तो वाचण्यास प्रवृत्त करावे , असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला . प्रयत्नवाद , आशावाद , उच्च ध्येय , नम्रता , आत्मविश्वास ,अपयशावर मात करण्याची जिद्द , प्रागतिक दृष्टिकोन , वेळेचे नियोजन आणि देशप्रेम ही यशाची नऊ सूत्रे असून त्यांची कास विद्यार्थ्यांनी कधी सोडू नये , असेही ते म्हणाले . तर ' विश्वकोश कोशात न राहता तो विश्वात यावा ,यासाठी ही सारी धडपड आहे ' असे विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष डॉ . विजया वाड यांनी सांगितले . ई - बुक आवृत्तीनंतर विश्वकोश आता टॅबलेटवरही उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सी - डॅकचेसंचालक महेश कुलकर्णी यांनी सांगितले . विश्वकोशाचे सर्व खंड  marathivishwakosh.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत . 

Page 293 of 322 1 292 293 294 322
ADVERTISEMENT
error: Content is protected!