नवे लेख (Latest Posts)

व्हॉट अॅन अॅप!

इन्स्टन्ट मेसेज सेवेने गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वांच्या मोबाइलमध्ये स्थान मिळवलं आहे . यामुळे मूळच्या एसएमएस सेवेला मोठा धक्का बसला आहे . सुरुवातीला ही इन्स्टन्ट मेसेजिंग सेवा काही मर्यादित फोन्सवर उपलब्ध होती . मात्र , कालांतराने मोबाइलचे अवतार बदलत गेले आणि नवनवीन ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आल्या . यामुळे विविध अॅप्स बाजारात आले . यात व्हॉटस्अॅप हे सर्वांच्या पसंतीचे ठरले आहे .  भारतातील ५२ टक्के स्मार्टफोन युजर्स व्हॉटस्अॅपचा वापर करतात तर उर्वरित लोक फेसबुक मेसेंजर सेवेचा वापर करत आहेत . फेसबुकने आपलं अँण्ड्रॉईड मेसेंजर बाजारात आणलं आहे . पण त्यात सध्या फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधील लोकांशीच आपण बोलू शकतो . हा मेसेंजर बाजारात आल्यावर तो व्हॉटस्अॅपला टक्कर देईल , अशी भाकीते रंगवली गेली होती . पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही . थिंक डीजिट या साप्ताहिकाने केलेल्या सर्वेक्षणातही बाब समोर आली आहे . यामध्ये सध्याचे भारतातील स्मार्टफोन युजर्स कोणते मेसेंजर वापरतात आणि त्यांचे त्यावरचे म्हणणे काय आहे याचा पूर्ण विचार करण्यात आला आहे .  या सर्वेक्षणानुसार भारतातील स्मार्टफोन युजर्सपैकी २५ टक्के युजर्स कोणत्याही प्रकारची मेसेजिंग सेवा वापरातनाहीत . ५२ टक्के लोक व्हॉटस्अॅप वापरतात तर , १४ टक्के लोक फेसबुक मेसेंजर वापरतात . ९ टक्के लोक फेसबुक मेसेंजर अँड्रॉईड व्यतिरिक्त इतर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वापरता येईल याची वाट पाहत आहेत . फेसबुक मेसेंजरमधील मर्यादा आणि इतर बाबी लक्षात घेता त्याचा वापर करणे फारसे कोणाला पसंत नसल्याचे या सर्वेक्षणातसमोर आले आहे . फेसबुकने मेसेंजर सेवा बाजारात आणून सध्याच्या प्रस्थापितांना दणाणून मात्र सोडलं आहे .पुढच्या काळात जर ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे सुरू करण्यात आली आणि त्यातील सर्व मर्यादा काढून टाकण्यात आल्या तर सध्याच्या सेवांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत . व्हॉटस्अॅपमध्ये आपल्या फोनबुकमधील लोकांशी संपर्क साधता येतो . मात्र , फेसबुक मेसेंजरमध्ये भविष्यात आपल्याला फेसबुकफ्रेंड्सबरोबरच फोनबुकमधील लोकांशीही संपर्क साधता येणार आहे . याचदरम्यान फेसबुक व्हॉटस्अॅपला विकत घेणार अशा अफवाही सुरू झाल्या आहेत . 

गुगल मॅप पुन्हा ‘आयफोन’वर

पूर्वी पत्ता विचारायचा झाला , की रस्त्यावरील एखाद्याव्यक्तीला गाठले जायचे . आजही तसे होते पण सध्याच्या युगात पत्ता किंवा एखादे ठिकाण शोधण्याकरिताइंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे ... पूर्वी एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे झाल्यास त्या ठिकाणीजायचे कसे ? जवळची खूण काय ? असा तपशील गोळा करावा लागे . मात्र , आता इंटरनेटवर सर्च करायचाअवकाश की तेथे कसे जायचे , जवळचा रस्ता कोणता आदी माहिती काही क्षणांतच मिळते .  ' जीपीएस ' वर आधारित मोबाइल असल्यास इंटरनेटच्या साह्याने मॅपचे अॅप्लिकेशन सुरू करून संबंधित ठिकाणीपोचता येऊ शकते . कागदावरील मॅपचे थोडक्यात नकाशांचे व्हर्च्युअल रूप सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुगलनेआपल्या मॅप्सच्या सर्व्हिसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले . अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारितमोबाइल फोनमध्ये गुगलच्या मॅप्सचे अॅप दिलेले असते . नसल्यास ते डाउनलोड करून घेणे उपयोगाचे ठरू शकते. गुगलच्या मॅपच्या आधारे अनेक लोकांनी त्यांची घराचे पत्ते अॅड केले आहेत . त्यामुळे गुगल मॅपवरून संबंधितव्यक्ती कोठे राहते किंवा संबंधित व्यक्तीचे ऑफिस कोठे आहे , हे कळते . मात्र , आयफोन बनविणाऱ्या अॅपलकंपनीने ' गुगल मॅप ' सुविधा आयफोनवरून काही महिन्यांपूर्वी काढून टाकली होती . अॅपलने स्वतःची मॅपसर्व्हिस सप्टेंबरमध्ये सुरू केल्याने हे पाऊल उचलण्यात आले होते .  पूर्वी अॅपलच्या आयफोनमध्ये गुगल मॅपचे प्री - लोड अॅप येत होते . ते बंद करण्याच्या कंपनीच्या या निर्णयासग्राहकांकडून तीव्र विरोध झाला . अखेर अॅपल कंपनीने आयफोनवर गुगलची फ्री मॅप सुविधा पुन्हा उपलब्ध करूनदिली आहे . चाळीस देशांत तिचा अॅक्सेस करणे शक्य असल्याचे कंपनीने स्पष्ट केले . गुगलने आकाशातून दिसणारेदृश्य , टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन हे नवे फीचर उपलब्ध केले आहे . ही सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर डाउनलोडच्या बाबतीतही अॅपल अॅप स्टोअरवर गुगल मॅपिंग अॅपला सर्वाधिक मागणी होती . गुगल मॅप अॅपलच्याउत्पादनावर उपलब्ध झाला आहे . यूजर पब्लिट ट्रान्झिट इन्फॉर्मेशन यावर पाहू शकणार आहे ; तसेच लाइव्हट्रॅफिक अपडेटबरोबर स्ट्रीट व्ह्यू फीचरचाही यात समावेश करण्यात आला आहे . यामुळे यूजरना विविध प्रकारचीमाहिती आपल्या गरजेनुसार जाणून घेता येणार आहे . गुगलचे मॅप किती लोकप्रिय आहे , हे अॅपलच्या ग्राहकांच्यामागणीवरून कळू शकते . अॅपल या कंपनीची गुगल ही स्पर्धक कंपनी आहे . मात्र , असे असतानाही यूजरचीमागणी पूर्ण करण्यासाठी अॅपलला पुन्हा ही सर्व्हिस उपलब्ध करून देण्याची दखल घ्यावी लागली आहे . 

फॉण्ट्सची गंमत

कम्प्युटरमध्ये टायपिंग करत असताना एरिअल , टाइम्सरोमन फार फार तर कॅम्बरिया आणि  मराठीसाठी मंगल अशा ठराविक फॉण्टच्या पलीकडे आपण कधीच विचार करत नाही . प्रत्यक्षात  कम्प्युटरमध्ये खूप फॉण्ट्स असतात . प्रत्येक फॉण्ट बनवण्यामागचा एक उद्देश असतो . हेफॉण्ट  बनवताना टायपोग्राफर्स त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतात , त्यात आपल्या भावना उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो . वर्षाला असे शेकडो फॉण्ट्स बाजारात येत असतात . सुंदर अक्षर ज्याप्रमाणे आपले लक्ष वेधून घेते त्याप्रमाणेच सुंदर फॉण्टही आपले लक्ष वेधून घेत असतो . यामुळे  टेक जगतात फॉण्टला विशेष महत्त्व आहे . सरत्या वर्षात बाजारात आलेल्या वेबवर तसेच मोबाइलवर वापरता येतील अशा काही बेस्टफॉण्ट्स विषयी ...  नोटीसीआ  हा फॉण्ट कॉम्पटीबल टाइपचा आहे . टॅबलेटच्या स्क्रीनवर कोणतीही गोष्ट वाचताना सुसह्य  व्हावी यादृष्टीने हा फॉण्ट तयार करण्यात आला आहे . या फॉण्टमध्ये वळदार अक्षरे चांगल्या  प्रकारे दिसतात . यामुळे हा फॉण्ट्सला अनेकांनी पसंती दर्शविली आहे . या फॉण्टमधील  वळणदारपणामुळे नेहमीच्या मोठ्या फॉण्टला पर्याय मिळणार आहे , असे फॉण्ट बनवणाऱ्यांचे  म्हणणे आहे . यात फॉण्टचे चार प्रकार असतील . हे फॉण्ट गुगल वेब फॉण्टमध्येउपलब्ध  आहेत . हे चारही फॉण्ट्स मोफत उपलब्ध आहेत .  बॅरिओल  विविध वेबसाइट्स आणि विविध अॅप्समध्ये दिसणारा गोलाकार फॉण्ट हा बॅरिओल फॉण्ट आहे  . हा फॉण्ट रेग्युलर आणि इटॅलिक अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे . गोलाकार अक्षरांमुळे  कोणतीही मोठी गोष्ट छोट्या जागेत सेट करता येणे शक्य होत आहे . कोणत्याही वेबसाइटच्या  मोबाइल आणि टॅबलेट व्हर्जनमध्ये मोठे फॉण्ट वापरले की , अनेकदा आपल्याला त्या गोष्टी  वाचण्यासाठी स्क्रोल करावे लागते . या त्रास या फॉण्टमुळे कमी होतो आणि छोट्या स्क्रीनवरही  फॉण्ट तितकाच चांगला दिसतो , असे फॉण्ट क्रिएटरने स्पष्ट केले आहे . ...

Page 377 of 406 1 376 377 378 406

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!