MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

गुगलचे हँगआऊट जीमेलवर : मित्रांसोबत चॅट जीमेलचा नवा पर्याय

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 9, 2013
in इंटरनेट
ग्रुप चॅट तेही व्हिडिओवर करण्याची धम्माल आता जीमेलवर उपलब्ध होणार आहे . गुगलने नुकतेच आपल्या ग्रुप व्हिडीओ चॅटिंगची हँगआऊट सेवा भारतीय युजर्ससाठी लाँच केली .यामध्ये आपण एकाच वेळी नऊ जणांशी बोलू शकणारआहोत . 

ही सेवा वापरण्यासाठी युजर्सनी केवळ जीटॉकच्या पॅनेलशेजारी असलेल्या व्हिडीओ कॅमेरावर क्लिक करायचे आहे . यानंतर एक नवीन विंडो पॉप – अप होईल . यात गुगल प्लसमधील आपल्या मित्रांची यादी दिसणार आहे .यामध्ये आपण त्यांच्या जीमेल आयडीवर क्लिक करून त्यांना व्हिडीओ चॅटलिस्टमध्ये अॅड करू शकतो . 
                    गुगल प्लसमध्ये नसलेल्या एखाद्या मित्राशी आपल्याला चॅट करायचे असेल तर आपण जीमेल आयडीवरून त्यांना इन्व्हिटेशन पाठवू शकतो . हे चॅट आपण हँगआऊट या फिचरचा वापर करून सर्वांसाठी खुले करू शकतो . यासाठी युट्यूबचे अकाऊंट लागते . यानंतर ते चॅट ब्रॉडकास्ट होताना दिसेल . आपण त्या ग्रुपमध्ये करत असलेल्या विविध चर्चा आपल्या फोटोसह सर्वांना पाहवयास मिळणार आहेत . एकदा हँगआऊट सुरू झाले की , आपल्या ग्रुपमेंबर्सची यादी आपल्याला स्क्रीनच्या खालच्या बाजूस दिसते तर व्हिडीओ वरच्या बाजूस दिसतो .

जीमेलच्या विंडोच्या डाव्या बाजूला चॅट्स , स्क्रीनशेअर , गुगल ड्राइव्ह , गुगल डॉक्स , इफेक्ट्स आणि पिंग पाँग हँगआऊट असे पर्याय दिसू लागतील . चॅट आणि हँगआऊटच्या माध्यमातून मित्रांना मेसेजेसही पाठवता येणार आहेत . तर स्क्रीनशेअर या सुविधेमध्ये मित्रांशी स्क्रीनशॉट शेअर करता येणार आहेत . हे शेअर केल्यावर आपल्या ग्रुपमधील सर्व मेंबर्सना तो व्हिडीओ पाहता येणार आहे . गुगल ड्राइव्ह आणि गुगल डॉक्स हे व्हिडीओ चॅट्समध्ये अधिक गंमत आणतील , असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे . 

हँगआऊटमध्ये जाऊन मज्जा – मस्ती करायची असेल तर गुगलने हँगआऊटमध्ये गेम्सचीही सुविधा दिली आहे .यामध्ये आपल्या ग्रुपमधील एखाद्याशी गेम्स खेळता येणार आहेत . याचबरोबर यामध्ये आपण विविध वॉलपेपर्स ,साऊंड इफेक्ट्स , फोटो आदी गोष्टी आणि आपल्या आवडीचे अॅप्सही वापरू शकणार आहोत . भविष्यात गुगलच्या सर्व सुविधा म्हणजे कॅलेंडर , ई – मेल यालाही हँगआऊट करता येणार आहे . म्हणजे एकाच वेळी आपण एखादी गोष्ट आपल्या विविध मित्रांशी शेअर करू शकतो . त्यामुळे आता मित्रांसोबत हँगआऊट करण्यासाठी जीमेलचा नवा पर्याय खुला झाला आहे . 

ADVERTISEMENT
Tags: GmailGoogleHangouts
ShareTweetSend
Previous Post

मोबाईल इंटरनेट वापर वाढला

Next Post

वेबसाइट टेस्टिंग आणखी सोपे : मॉडर्न . आयई

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Google Pixel 6a

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

May 14, 2022
Google Cloud Pune

पुण्यात होणार गूगल क्लाऊडचं नवं ऑफिस!

January 25, 2022
Next Post

वेबसाइट टेस्टिंग आणखी सोपे : मॉडर्न . आयई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!