नवे लेख (Latest Posts)

अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!

अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!

मोबाईल फोन बाजारात गेल्या 14 वर्षापासून प्रथम क्रमांकावर असलेल्या ब्रॅंड 'नोकिया'ला कोरियन कंपनी 'सॅमसंग'ने धोबीपछाड दिला आहे. संशोधन संस्था 'आयएचएस'ने सॅमसंगला...

स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी एअरबॅग

स्मार्टफोनमध्ये टचस्क्रीनचे प्रमाण सर्वाधिक आहे. टचस्क्रीन हा नाजूक  प्रकार आहे. त्यामुळे फोन पडल्यास स्क्रीन फुटण्याचा धोका अधिक  असतो ; तसेच फोनमध्ये बिघाड...

मोबाइलमध्ये प्रोजेक्टर

लॅपटॉप , पेनड्राइव्ह , जाडजूड वायर्स आणि व्हाइट स्क्रीन .. प्रेझेंटेशनसाठी करावी लागणारी ही तयारी . हे सगळंविसरा आता . केवळ मोबाइलने तुम्ही उत्तम प्रेझेंटेशन देऊ शकता . त्यासाठी हवी एक भिंत किंवा प्लेन सरफेस .  प्रोजेक्टर मोबाइलचा जन्म  इपोक नावाच्या ब्रिटनमधल्या कंपनीने या प्रोजेक्टर मोबाइलची कसेंप्ट आणली . ब्रिटन आणि अमेरिकेतडॉक्युमेंट अॅसेम्बलिंग टेक्नॉलॉजी पुरवतात . या कंपनीच्या प्रोजेक्टर विभागाने २००८ मध्ये या मोबाइलचाविकास केला आणि २५ ऑगस्ट २००८ ला तो येथील बाजारात आला . या मोबाइलमुळे एसएमएस आणि फोनव्यतिरिक्त मोबाइलचा स्मार्टफोन म्हणूनही वापर होऊ शकतो . पहिल्यांदा विकसित करण्यात आलेला हाप्रोजेक्टर मोबाइल दिसायला एकदम साधा असला तरी यामध्ये टचस्क्रीन , ब्लुट्यूथ , १ जीबी मेमरी ही फिचर्सआहेत .  इंटरनॅशनल मार्केट  या अनोख्या टेक्नॉलॉजीला बाजारपेठेत स्थान मिळण्यासाठी फार काळ वाट पहावी लागली . इपोक याकंपनीनंतर बऱ्याच स्थानिक कंपन्यांनी अशी मॉडेल्स आणण्यास सुरुवात केली . पण , त्यांना फार यश ‌ आलं नाही. यानंतर सॅमसंगने जुलै २०१०मध्ये आपले बीम हे प्रोजेक्टर मोबाइलचे मॉडेल इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणले .पण , त्यांनी ही सुविधा भारतासारख्या देशांपासून दूर ठेवली . यामुळे आपल्याला हा मोबाइल परदेशातूनमागवावा लागतो .  लक्ष्य ' मॅनेजमेंट ' विद्यार्थी  भारतात प्रोजेक्टर मोबाइल सर्वप्रथम चेन्नईतल्या टेकबेरी या मोबाइल कंपनीने बाजारात आणला . १८ नाव्हेंबर२०१० ला याचे अधिकृत लॉचिंग करण्यात आले . त्यानंतर इंटेक्स या कंपनीने आपला मोबाइल भारतात आणला. पण , सामान्य ग्राहकांकडे दुर्लक्ष केल्याने या कंपनीच्या मोबाइलबाबत फारशी कोणाला माहिती नव्हती .मॅनेजमेंटचे विद्यार्थी आणि कर्मचारी हे आमचे मुख्य ग्राहक असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे . यानंतर स्पाइसमोबाइलने सर्वसामान्य ग्राहक लक्षात घेऊन हा मोबाइल बाजारात आणला आणि त्याची आकर्षक जाहिरात करूनहा विषय उत्सुकतेचा बनविला . यामुळे ही टेक्नॉलॉजी सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं यश हे स्पाइस मोबाइलकडेचजाते . स्मार्टफोन , आयफोन , टॅबलेट यांच्या भाऊगर्दीत हा मोबाइल ग्राहकांना कसा आकर्षित करेल हे लवकरचकळेल .  स्पाइस एम ९०००  स्पाइसच्या खास मोबाइलच्या जाहिरातींमुळे सर्वांपर्यंत पोहोचलेला हा मोबाइल भारतातील बहुतांश मार्केटकाबीज करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . यामध्ये ८७ एमबीची इंटरनल मेमरी असून १६जीबीपर्यंत एक्स्पाण्डेबल आहे . यात जीपीआरएस , वॅप , युएसबी कनेक्टर , ब्लूटूथ या सुविधा आहेत .याचबरोबर ड्युएल सिमच्या या मोबाइलमध्ये ३ . २ मेगापिक्सलचा कॅमेराही आहे . याची किंमत साधारणत :६९०० ते ७५०० पर्यंत आहे .  मायक्रोमॅक्स एक्स ४०  स्वस्त आणि मस्त मोबाईलची रेंज बाजारात आणणारा मायक्रोमॅक्स या कंपनीनेही आपला प्रोजेक्टर मोबाइलबाजारात आणला आहे . विशेष म्हणजे हा ड्युअल सिम प्रोजेक्टर मोबाइल आहे . याशिवाय यामध्ये रेडिओ ,ओपेरा मिनी ब्राउझर , इबुक अशा विविध सुविधा आहेत . याचबरोबर मोबाइल ट्रॅकरही यामध्ये उपलब्ध आहे .यात २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे . या मोबाइलची किंमत पाच ते साडेपाच हजार इतकी आहे .  टेकबेरी एसटी - २००  भारतात प्रोजेक्टर मोबाइलची मुहुर्तमेढ करणारी ही कंपनी . या कंपनीचा भारतीय बनावटीच्या यामोबाइलमध्ये टचस्क्रीन उपलब्ध आहे . याची स्क्रीन ३ . २ इंचांची असून यामध्ये दोन मेगापिक्सलचा फ्लॅशकॅमेरा आहे . यामध्ये १०८० पिक्सलची एचडी स्क्रीन वापरण्यात आली आहे ..  इंटेक्स  हे मोबाइलमधून करण्यात येणारे प्रोजेक्शन आपल्याला ३६ इंचांचे दिसू शकते . यामध्ये एलइडी टेक्नॉलॉजीवापरण्यात आल्याने रिझल्ट आणखीनच सुस्पष्ट असेल . तसंच , हा मोबाइल ड्युएल सिम आहे . प्रोजेक्टर लावूनसलग तीन तास आपण त्याचे चित्र भिंतीवर पाहू शकतो . याचा अर्थ असा की , यामध्ये असलेली बॅटरी सलग तीनतास चालते . याची मेमरी १६ जीबीपर्यंतच एक्स्पाण्डेबल आहे . यामध्ये एलइड फोकस वापरण्यात आला असूनएका सेकंदाला फोटोच्या २५ फ्रेम बनू शकतात . या प्रोजेक्टर मोबाइलची किंमत १० ते १२ हजाराच्या आसपासआहे .  समसंग गॅलक्सी बिम I8530  मार्केटमध्ये येणाऱ्या नव्या ब्रँडबरोबरच काही प्रस्थापित ब्रँडही आता प्रोजेक्टर मोबाइलच्या मार्केटमध्ये उतरलेआहेत . सॅमसंग गॅलक्सी बिम नावाचा आपला पहिला वहिला प्रोजेक्टर मोबाइल बाजारात आणला आहे . इतरकंपन्यांच्या प्रोजेक्टर मोबाइलच्या तुलनेत हा मोबाइल खूप महाग आहे . असे असले तरी हा फोन खूप चांगलेरिझल्ट्स देतो . यात डिजीटल लाईट प्रोजेक्टर आहे . म्हणजे हा प्रोजेक्टर वापरताना अंधार करण्याची गरजभासत नाही . यात पाच मेगापिक्सलचा कॅमेरा आहे . याची किंमत ३० हजार रुपयांपर्यंत आहे .

मोबाइल झाला सेट : अॅप्स असूनही त्याचं काय करायचं

बाजारातला सगळ्यात भारी फोन आपण हौसेनं घेतो , पणत्याचा वापर मात्र पुरेपूर होत नाही . बऱ्याचदा फोनमध्ये अॅप्स असूनही त्याचं काय करायचं ते कळत नाही . हीअॅप्स जरा समजून घेतली तर , लाइफ और आसान बन सकती है भिडू . एमईटी प्रस्तुत मुंबई टाइम्सकार्निवलमध्ये याच विषयावर सेमिनार झालं . वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये ही धमाल सेटिंग जुळून आली .यावेळी सर्वांत आधी आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी ठरत असेलेल्या १२ अॅप्सबद्दल विद्यर्थ्यांना माहितीदेण्यात आली , ती अशी ..  गुगल गॉगल्स  हे अॅप वापरून आपण आपल्या मोबाइलवरुन फोटोच्या माध्यमातून सर्च करू शकतो . म्हणजे , समजा आपणएखद्या प्रसिद्ध मंदिराचा फोटो घेऊन तो सर्च केला , तर आत्ता आपण असलेल्या ठिकाणापासून तिथे जाण्याचासंपूर्ण मार्ग हे अॅप आपल्याला दाखवतं . इतकंच नव्हे , तर एखाद्या वस्तूचा फोटो जर आपण सर्च केला , तर त्यावस्तूबद्दलची संपूर्ण माहिती आपल्यायला मिळू शकते .  ड्रॉपबॉक्स  आपला महत्वपूर्ण डेटा क्लाउड स्टोरेजच्या मदतीने सेव्ह करता येतो तो या अॅपमुळे . हे अॅप प्ले स्टोअरमध्येहीउपलब्ध आहे . यातून स्टोअर केलेला डेटा आपण कधीही आणि कुठेही अगदी मोबाइलमध्ये , लॅपटॉपमध्ये किंवाकम्पुटरमध्ये ओपन करू शकतो .  शेयर कॉंटॅक्ट्स व्हाया एसएमएस  फोनमधले कॉंटॅक्ट्स शेअर करायला आपल्याला मदत करतं ते हे अॅप . तेही एसएमएसच्या मदतीने . सध्याबहुतांश मोबाइलमध्ये बिसनेस कार्ड पाठवण्याची सोय नसते , अशा मोबाइलमध्ये हे अॅप खूप उपयुक्त ठरतं .  एमएक्स प्लेयर  हे अॅप सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स प्ले करतो . या अॅपमध्ये ब्राइटनेस वाढवणे , झूम आणि इतर फीचर्सवापरू शकतो . यामुळे आपल्याला फिल्म पाहण्याचा चांगला आनंद लुटता येतो .  स्कॅन  हे अॅप QR कोड स्कॅन करायला वापरलं जातं . सध्या विविध जाहिरातींमध्ये QR कोड वापरला जातो . यामुळे आपल्याला जाहिरात आपल्या मोबाइलवर पाहता येऊ शकते . याचबरोबर त्यातील अधिक माहितीही आपल्यालायातून मिळते .  एव्हेर्नोट  आयडियाज किंवा आपल्या कामाबद्दलची माहिती सेव्ह करून ठेवण्यासाठी हे अॅप महत्त्वाचं ठरतं . ही माहितीआपण मोबाइल , कम्पुटर असे कुठेही आणि काहीही ओपन करू शकतो .  झोमॅटो  हे अॅप तुमच्या एरियामधलं हॉटेल किंवा रेस्टॉरंट आणि मेन्यू कार्ड्स अशा गोष्टी शोधण्यात मदत करतं . हे अॅपजीपीएसचा वापर करून आपल्याला उपयुक्त असं रिझल्ट देतं .  निंबझ  हे अॅप सगळ्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये आहे . या अॅपमधून फेसबुक , हॉटमेल , जीमेलचं अकाउंटवापरता येतं . शिवाय मित्र आणि मैत्रिणीशी चॅटही करता येतं .  झेझ  या अॅपमधून वॉलपेपर , रिंगटोन्स , थीम्स आणि इतर गोष्टी फ्रीमध्ये डाउनलोड करता येतात .  वायबर ...

Page 394 of 422 1 393 394 395 422

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!