नवे लेख (Latest Posts)

नवीन अॅक्रोबॅट आणखी सुलभ : मॅक आणि विंडोजसाठी अॅक्रोबॅट ११ बाजारात

नवीन अॅक्रोबॅट आणखी सुलभ : मॅक आणि विंडोजसाठी अॅक्रोबॅट ११ बाजारात

पीडीएफ फाइल्सने कम्प्युटरधारी समाजाचे सर्व आयुष्यव्यापले आहे . फॉन्ट , वर्ड , एक्सेल , पॉवरपॉइंट , फोटोशॉपअसे कुठलेही सॉफ्टवेअर नसले तरी त्यातून तयार केलेल्या पीडीएफ फाइल्स जशाच्या तशा अॅक्रोबॅट रिडरमध्येदिसू शकतात . त्यामुळेच अॅडोबची सॉफ्टवेअर सर्वत्र लोकप्रिय असून त्यात सातत्याने नवनवीन एडिशन्स येतअसतात . आता अॅडोबने मॅक आणि विंडोजसाठी अॅक्रोबॅट ११ बाजारात आणले आहे . मोबाइल आणि टॅबलेटयुझर्स ध्यानात ठेवून यात विविध सुविधा देण्यात आल्या आहेत . नवे अॅक्रोबॅट एमएस ऑफिससोबत अधिक संलग्नकरण्यात आले असून यातून फोटो रिसाइज आणि रोटेट करता येतात , टेबल्स , फॉर्म्स एडिट करता येतात तसेचडॉक्युमेंट एडिटही करता येतात .  इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर  सध्या अनेक कागदपत्रांवर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर केल्या जातात . ही प्रक्रीया नव्या अॅक्रोबॅटमध्ये आणखी सुलभकरण्यात आली आहे . इकोसाइन या उपकंपनीच्या सहकार्याने कंपनीने विंडोज ८ टॅबलेटधारकांना ही सुविधा दिलीआहे . त्यामुळे सहीच्या ठिकाणी नाव टाइप करणे किंवा आयपॅडवर बोटाच्या सहाय्याने सही करण्याच्या पलीकडेअनेक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत . त्यामुळेच येत्या काही वर्षात ऑनलाइन सही केलेल्या कंत्राटांचे प्रमाण १टक्क्यावरून ५० टक्क्यांपर्यंत वाढेल असे कंपनीला वाटते .  फॉर्म वापरण्यात सुलभता  एका संशोधनानुसार कर्मचाऱ्यांचे आठवड्यातील ११ तास कागदी अर्ज शोधण्यात आणि विविध फॉरमॅटमधीलडॉक्युमेंट उघडण्यात व फाइल्सचे लोकेशन्स शोधण्यात वाया जातात . या समस्येवर अॅक्रोबॅटने अॅडोब फॉर्म्ससेंट्रलच्या माध्यमातून तोडगा काढला आहे . यामध्ये कुठल्याही प्रकारचा डेटा तुमच्या टॅबवर , पीसीवर अॅटोमॅटीकउपलब्ध होणार असून त्यासाठी कुठल्याही प्रकारचे कन्वर्जन करण्याची गरज पडणार नाही आणि थेट टेबल्स आणितक्त्यांच्या स्वरूपात ही माहिती उपलब्ध होईल . अॅक्रोबॅट रीडरच्या मोबाइलसाठी उपलब्ध असलेल्या मोफतएडिशनमध्ये पीडीएफ फॉर्म भरता येणार असून अॅक्रोबॅट . कॉमवर ते सेव्ह करता येणार आहेत .  कागदपत्रांची सुरक्षा  जगभरातील किमान २५ टक्के कंपन्यांना माहितीच्या सुरक्षेची समस्या जाणवते . त्यांच्यासाठी नव्या अॅक्रोबॅटमध्येपीडीएफ फाइल्सचा अॅक्सेस मर्यादित करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे . नव्या रिस्ट्रीक्टएडिटींग पर्यायात फाइल्ससाठी पासवर्ड देण्यात आला असून त्याआधारे डेटा इन्क्रिप्शन आणि छुपी माहिती काढूनटाकणे यासारखे पर्याय उपलब्ध आहेत . आयटी कंपन्यांसाठी यामध्ये अतिरिक्त पर्याय देण्यात आले असून एकापेक्षाअधिक पीसीवर अॅक्रोबॅट फाइल्स एडिट करणे , अॅपलच्या रिमोट डेस्कटॉप टूलचा सपोर्ट यासाररख्या गोष्टी यातदेण्यात आल्या आहेत .

गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

मायक्रोसॉफ्टला टक्‍कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक लॅपटॉप...

जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

बहुप्रतिक्षीत HTC कंपनीचा हायडेफिनेशन डिस्‍प्‍ले असलेला स्‍मार्टफोन बाजारात लॉंन्‍च झाला आहे. जपानमध्‍ये कंपनीने नवा HTC बटरफ्लाई J लॉंन्‍च केला आहे....

Page 393 of 406 1 392 393 394 406

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!