नवे लेख (Latest Posts)

धोका ‘फेक मेसेजिंग अॅप्स’चा

मोबाइल व ई - मेल हे संवादाचे उत्तम माध्यम बनले असले ,तरी त्यातही आपणच आपल्याला कुणाच्याही नावे बनावटमेसेजेस करण्याची नवी अॅप्स बाजारात आली आहेत .संशयाने पोखरलेले कौटुंबिक नातेसंबंध किंवा व्यावसायिकअसूया यांच्यात मोबाइल - ईमेलवरील अशा माध्यमांचावापर वाढला असल्याने फेक मेसेजेसच्या अॅप्लिकेशनची त्यातनवी भर पडेल , अशी भीती तज्ज्ञांना वाटते . आपणच स्वतःला तिऱ्हाईतांच्या नावे ई - मेल करायचे आणित्यांचा भांडणतंटे किंवा व्यावसायिक काटाकाटीत पुरावाम्हणून वापर करायचा , असे प्रकार काही प्रकरणात उघडझाले आहेत . अशा प्रकारांमध्ये इंटरनेटवरील प्रॉक्सीसर्व्हरचा वापर केला जातो . हे सर्व्हर नायजेरिया , इंग्लंडआदी देशांमध्ये असल्याने भारतातील सायबर पोलिसांनागुन्हेगारापर्यंत पोहोचणे अशक्य बनते . आश्चर्य म्हणजे ,प्रत्यक्षात हा गुन्हेगार भारतातूनच फेक संदेशांचे व्यवहारकरीत असतो . काही पेड किंवा अनपेड वेबसाइट्सवरूनहीस्वतःच स्वतःला तिऱ्हाईत व्यक्तींच्या नावे ई - मेल करण्याचीसुविधा उपलब्ध होते . त्याचाही गैरवापर होत असतो , असेगुप्तवार्ता अधिकाऱ्यांना तपासात आढळले आहे . काहीदिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने तपास केलेल्या एका प्रकरणात एक बडी खासगी बँक बंदहोत असल्याच्या अफवा फेक संदेशाद्वारे पसरविण्यात आल्या होत्या . ठेवीदार खात्यातील पैसे काढू लागल्यावरत्यावर प्रकाश पडला होता . या माध्यमांमध्ये स्मार्टफोनसाठी उपलब्ध झालेल्या फेक मेसेजेस या अॅपची भर पडली आहे . यात इनकमिंग आणिआऊटगोइंग असे दोन्ही मेसेजेस कुणाच्याही नावे बनावट स्वरुपात तयार करण्याची सोय आहे . केवळ हे मेसेजेसतिऱ्हाइत व्यक्तीपर्यंत पाठविले जात नाहीत , इतकेच . केवळ मेसेजेस नव्हे तर कॉलच्या वेळा , आदी तपशीलांचेबनावट रेकॉर्ड तयार करण्याचे तंत्रही या अॅपमध्ये असते . अलीकडे पती - पत्नींमधील बिघडलेले संबंध आणि संशयाचे गढूळ वातावरण यांच्यात मोबाइलवरील मेसेजेसचावेगवेगळे दावे - प्रतिदावे करण्यासाठी उपयोग केला जातो . हे प्रमाण आता वाढल्याचे सायबर डिटेक्टिव्ह तज्ज्ञसांगतात . त्याचप्रमाणे दोन व्यवसाय भागीदारांमध्येही मोबाइल संभाषणांचा , कॉल रेकॉर्ड्सचा वापर केला जातो. एकमेकांमधले फेक मेसेजेस क्लायंटना दाखविल्यास त्यांचा त्यावर विश्वास बसू शकतो . पोलिस किंवा कोर्टाकडून या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश आल्यास मोबाइल कंपन्यांमार्फत कॉलरेकॉर्ड्सचीखातरजमा होऊ शकते . पण प्रकरणे पोलिसांपर्यंत जाण्यापूर्वीच मेसेजेस , कॉल्सचे लॉग यांच्यावरून बिघडलेल्यानातेसंबंधांना तणावाचे नवे कारण मिळालेले असते . फेक मेसेजेस हे अशा प्रकारे दिशाभूल करू शकतात . त्यांचागैरवापर होऊ शकतो किंवा त्यातून नाहक गोंधळही उडू शकतो .

टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ ||  —  स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ || — स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

टॅबलेटसाठी भारत आता मोठी बाजारपेठ बनला आहे. अ‍ॅपलच्‍या हायएंड टॅबपासून भारतीय कंपन्‍यांच्‍या कमी किंमतीचे टॅबलेटस बाजारपेठेत मोठयाप्रमाणात विकले जात आहेत....

अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

विंडोज ८  लॉचिंग अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत . यामुळे अँड्रॉइड धोक्यात येईल का ? ग्राहक पुन्हा कम्प्युटर खरेदीकडे वळतील का ? विंडोजकडे पुरेसे अॅप्स आहेत का ? या प्रश्नांवर जगभरातील तज्ज्ञ चर्चा करत आहेत . मायक्रोसॉफ्टसह गुगलचे भवितव्यच नव्या लाँचवर अवलंबून असल्याने या चर्चा होणे स्वाभाविक आहे . अॅपलचे टॅबलेट मार्केटमधील स्थान मजबूत असल्याने त्यांचा याचा फरक पडणार नसला तरी सॅमसंग , आसुस , तोशिबा यासारख्या अँड्रॉइड टॅबलेट बनविणा - या कंपन्यांनी विंडोज ८ टॅबलेटच्या निर्मितीची तयारी करून स्वतःचे स्थान डळमळीत होणार याची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे . आयपॅड नको असलेल्यांसाठी सध्या अँड्रॉइड टॅबलेटचा पर्याय उपलब्ध असला तरी त्याची विक्री म्हणावी तितकी नाही . गेल्यावर्षी लॉँच झाला तेव्हा गॅलेक्सी टॅब १० . १ हा आयपॅडला उत्तम टक्कर देईल अशी चर्चा होती . मात्र अॅपल विरुद्धच्या खटल्यात सॅमसंगने नमूद केलेल्या माहितीनुसार अमेरिकत केवळ ७ लाख १२ हजार गॅलेक्सीटॅबची विक्री झाली आहे . कंपन्यांनी निर्यात केलेल्या सर्व प्रकारच्या अँड्रॉइड टॅबलेट्सचे आकडे खूप मोठे दिसतअसले तरी कित्येक टॅब विक्रेत्यांकडे पडून असल्याचे आयडीसी या संशोधन संस्थेने म्हटले आहे . विडोंज ८ मुळे अँड्रॉइड पूर्णपणे इतिहासजमा होणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे . प्रामुख्याने स्वस्तातीलआणि ७ ते १० इंच आकारात उपलब्ध असलेल्या नॉन ब्रँडेड अँड्रॉइड टॅबलेटच्या विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे . ग्राहक प्रामुख्याने गेम खेळणे , व्हीडिओ पाहणे , गाणी ऐकणे , इंटरनेट अॅक्सेस यासारख्या गोष्टींसाठी अँड्रॉइड टॅबलेट वापरतील असे गार्टनरच्या कॅरोलिना मिलानेसी म्हणतात .हार्डवेअर उत्पादकांनी अॅपलच्या व्यतिरिक्त दुसरी कंपनी टॅबलेट निर्मितीस परवानगी देईल या आशेने अँड्रॉइडसाठी गुगलबरोबर करार केला होता . मात्र आता त्यांनी मायक्रोसॉफ्टसोबतही हातमिळवणी केली आहे . अँड्रॉइडचे एक बलस्थान म्हणून अॅप्सकडे पाहिले जाते . सध्या गुगल प्ले स्टोअरवर ६ . ७५ लाखाहून अधिक अॅप्सउपलब्ध आहेत . त्याचवेळी मायक्रोसॉफ्टने अजून अॅप स्टोअरची घोषणा केलेली नाही . मात्र विंडोजकडे अँड्रॉइडच्या कितीतरी पट अधिक अॅप्स असल्याचे तज्ज्ञ सांगतात . गुगलनेही विंडोज ८ चा धोका लक्षात घेऊन आता अॅप्स डेव्हलपर्ससाठी नवे दिशानिर्देश जाहीर केले आहेत . कारण हेच डेव्हलपर विंडोज ८ साठीही अॅप तयारकरणार आहेत . 

काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल ??

गेल्या काही दिवसांत गुगलच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहूनअधिक घसरण झाली आहे . त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेत २४ अब्ज डॉलरने घट झाली आहे . ही घट अशीच सुरू राहिली , तर येत्या काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल , अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत .  गेल्या तिमाहीमध्ये गुगलच्या महसूलात केवळ १७ टक्क्यांची वाढ दिसून आली . २००९ नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या महसूलात २० टक्क्यांपेक्षा कमी वाढ दिसून आली आहे .एकेकाळी सर्च इंजिन क्षेत्रात याहूची आघाडी होती . पण हळुहळू या स्पर्धेतून याहू बाद झाले . येत्या ५ - ८ वर्षांत गुगलवरही तीच वेळ येऊ शकते , असे आयर्न कॅपिटल या हेज फंडाचे संस्थापक एरिक जॅक्सन यांनी म्हटले आहे . युजरने जाहिरातींवर क्लिक केल्यास गुगलला महसूल मिळतो . गेल्या तीन महिन्यांत त्यात १५ टक्के घट झाली आहे . त्यामुळे भविष्यात गुगलचा नफा आणखी कमी होईल , अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . अधिकाधिक ग्राहक मोबाइल अॅप्लिकेशन्सना प्राधान्य देत असल्याने जाहिरातदारही इंटरनेटवर आधारित जाहिरातींसाठी पैसे मोजण्यास तयार नाहीत .  त्यातच जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये बायडूला प्राधान्य दिले जाते . मायक्रोसॉफ्टनेही काही महिन्यांपूर्वीच बिंगची नवीन आवृत्ती सादर केली होती . त्याचवेळी गुगलची रशियातील स्पर्धक यान्डेक्सने विकसनशील मार्केटमध्ये गुगलला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे . स्वतःकडील तज्ज्ञांचा वापर करून गुगलला आव्हान देण्याचे कंपनीने ठरविले आहे . त्यासाठी कंपनीने तुर्कस्तानपासून सुरुवात केली आहे . गेल्याच महिन्यात कंपनीने गुगलच्या क्रोमला आव्हान देण्यासाठी नवा ब्राऊझर लॉँच केला . त्यामुळे ऑपेरा तयार करणाऱ्या नॉर्वेजियन कंपनीने यान्डेक्ससोबत ब्राऊझर तंत्रज्ञान शेअर करण्यासाठी करार केला आहे . या ब्राऊझरवर कामकरण्यासाठी यान्डेक्स विविध अॅप्लिकेशन्स तयार करत असून सर्चच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल गोळा करण्याचा त्यांचा मानस आहे .  एकेकाळी सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात ऑर्कुटचेच साम्राज्य होते . पण फेसबुकच्या उदयाबरोबरच ऑर्कूटचे साम्राज्य कमी झाले . आता ते जवळपास दिसेनासे झाले आहे . फेसबुकलाही आता ट्विटर , लिंक्डइनचा धोका जाणवतोआहे . फेसबुकच्या शेअरमध्ये होत असलेली घसरण थांबलेली नाही . त्यामुळे इतके दिवस टिकून असलेली गुगलचीसद्दी जाऊन गुगलला पर्याय निर्माण होईल आणि गुगल इतिहासजमा होईल , अशी विश्लेषक वर्तवत असलेली शक्यता पूर्णपणे खोटी ठरवता येणार नाही . शेवटी हे तंत्रज्ञानाचे जग आहे . त्यात दररोज नवीन काही येणारच ... 

Page 405 of 422 1 404 405 406 422

वाचनीय

लोकप्रिय

error: Content is protected!