Tag: Innovation

बदलणारं तंत्रज्ञान जग : ट्रेंड्स

तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत दररोजच्या आयुष्यात खूप बदल झालेत . बदलांची ही प्रक्रीया अशीच सातत्याने सुरू राहणार आहे . जगणं अधिकाधिक सोपं करण्याच्या दृष्टीने सध्या तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत . आयबीएमने नुकतेच आगामी पाच - दहा वर्षात लोकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवू शकणाऱ्या काही संशोधनांची यादी जाहीर केली आहेत . सध्या सुरू असलेले संशोधन , नवनवीन तंत्रज्ञान आणि समाजातील ट्रेंड्सवरुन ही यादी तयार करण्यात आली आहे .  दृष्टी सध्या गुगलचे गॉगल्स अॅप फोटोतील गोष्टी ओळखून त्यांची माहिती देते . पण येत्या दशकाअखेर कम्प्युटर केवळ छायाचित्रांवरून ओळख पटवणार नाही तर मानवाप्रमाणे पिक्सेलनुसार समोरची गोष्ट ओळखू शकेल .उदाहरणार्थ भविष्यात लाल सिग्नल पाहून थांबायचे आहे , हे कम्प्युटरला कळेल . किंवा एखाद्या व्यक्तीला कोणते कपडे योग्य दिसतात , हे सांगू शकेल . वस्त्रोद्योगात सध्या अधिकाधिक ऑनलाइन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या तंत्राचा उपयोग सुरू आहे . हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रासाठी खूप फायदेशीर ठरेल . त्यामुळे निरोगीपेशी आणि दूषित पेशींमधील फरकही ओळखता येऊ शकेल .  स्पर्श गेल्या कित्येक दशकांपासून यंत्रांना स्पर्श आणि संवेदनांची जाणीव व्हावी यासाठी तज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत .त्यांना लवकरच यश मिळेल अशी चिन्हे आहेत . टचस्क्रीन मोबाइल , टॅबलेट ही त्याचीच सुरुवात आहे . सध्या इन्फ्रारेड , प्रेशर सेन्सिटिव्ह तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्श ओळखणे यासारख्या गोष्टींवर संशोधन सुरू आहे . त्यामुळे भविष्यात कम्प्युटरला कापडाला स्पर्शकरुन त्याचा प्रकार किंवा त्वचेला स्पर्श करून निदान करता येईल .  गंध एखादा वास घेऊन तो फुलाचा आहे की कृत्रिम हे ओळखणे लवकरच कम्प्युटरला शक्य होणार आहे . त्यामुळे स्क्रीनवर पाहून चमचमीत खाद्यपदार्थाचा गंध सामावून घेणे शक्य होईल . एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून येणारा गंध , श्वासातील विविध घटक आणि शारीरिक हालचालींवर यंत्राच्या सहाय्याने डॉक्टर दमा , डायबिटीस ,फिट्स येणे , किडनीतील बिघाड वगैरे आजारांचे निदान करू शकतील . सध्या डिजीसेंट आणि ट्रायसेनएक्स या कंपन्या कम्प्युटरच्या मदतीने गंध तयार करणारे उपकरण तयार करत आहेत . डिजीसेंटने केमिकल स्ट्रक्चरच्या आधारे हजारो गंध एकत्र केले असून सेंट स्पेक्ट्रमच्या आधारे त्याच्या डिजिटायझेशनचे काम सुरू आहे . जेणेकरून कम्प्युटर गंध ओळखू शकेल . आयबीएमही सेन्सर्सच्या आधारे परिसरातील केमिकल्स गोळा करण्याचे तंत्र विकसित करत आहे . त्यावरून साफसफाई झाली आहे का , प्रदूषण किती आहे याचा अंदाज येऊ शकेल . सध्या पर्यावरणातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किंवा दुर्मिळ कलाकृती जतन करण्यासाठी आयबीएम यातंत्राचा वापर करत आहे .  चव विविध पदार्थातील मूळ घटकांच्या मॉलेक्युल्सची चाचणी करून , मानवी मनाला आवडणारी चव आणि गंधयांचा संयोग साधून चव ओळखण्याचे तंत्र तयार करत आहे . लक्षावधी रेसिपींची तुलना करुन आयबीएम हे तंत्र विकसित करते आहे . जपानमध्येही त्सुकुबा विद्यापीठात खाद्यपदार्थाची चव आणि त्यानंतर तोंडात तयार होणा -या विविध क्रियांचे विश्लेषण करण्यासाठी फूड सिम्युलेटर विकसित करण्यात गुंतले आहे . विविध केमिकल्स एकमेकांबरोबर कशी वागतात , त्यातील बाँडिंग स्ट्रक्चर यांच्या अल्गोरिदमचे विश्लेषण करुन चव ओळखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत .  ध्वनी कम्प्युटरने ध्वनीचे विश्लेषण सुरू केल्यानंतर आवाज , त्यामागील प्रेशर , ध्वनी तरंग ओळखणे सोपे होणार आहे .त्यामुळे परिसरात घडणा - या बारीकसारिक बदलांवरुन भविष्यातील हालचालींचे अंदाज वर्तवता येतील .उदाहरणार्थ , वा - याच्या आवाजात झालेला बदल यावरुन वादळ , भूकंप यांचा अंदाज वर्तवता येईल . 

काश्मिरी युवतीने बनवलं ‘अँड्रॉइड अॅप’

गरजेच्या सुविधांसाठी ' डायल काश्मीर ' ठरणार वरदान  प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने पुढे जाण्याचा काश्मिरी मातीचा गुणधर्म आहे. काश्मीरसाठी विशेष अँड्रॉइड अप्लिकेशन तयार करणाऱ्या २३वर्षीय ...

… हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल!

… हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल!

दक्षिण कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी मेगा सीरीजचा स्मार्टफोन सादर केला आहे. यावेळी कंपनीने एंड्रॉईड आधारित दोन नवे स्मार्टफोन गॅलेक्सी ...

आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

आघाडीची मोबाइल निर्माता कंपनी 'नोकिया'ने आपला सगळ्यात स्वस्त हँडसेट ‘नोकिया 105’ मंगळवारी भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. नोकियाचा हा कलर ...

Page 10 of 12 1 9 10 11 12
ADVERTISEMENT
error: Content is protected!