Tag: Micromax

तीन महिन्यात ५ लाख टॅबलेटची विक्री : मायक्रोमॅक्स सर्वाधिक

स्वस्तातील टॅबलेट उपलब्ध झाल्याने भारतीय टॅबलेटवर अक्षरशः तुटून पडले असून तीन महिन्यात तब्बल ५लाखाहून अधिक टॅबलेटची खरेदी भारतीयांनी केली आहे . एप्रिल ते जून या कालावधीत ही खरेदी झाली असूनगेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ ६७३ टक्क्यांची आहे .  सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालानुसार भारतीय टॅबलेट बाजारपेठेत मायक्रोमॅक्सचा सर्वाधिक म्हणजेच १८ .४ टक्के हिस्सा आहे . त्यापाठोपाठ सॅमसंग ( १३ . ३ टक्के ) आणि अॅपलचा ( १२ . ३ टक्के ) क्रमांक लागतो .गेल्यावर्षी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या टॅबलेटची सरासरी किंमत २६ हजार होती . यंदा ती निम्म्यावर म्हणजेच १३  हजार रुपयांवर आली आहे .  देशातील टॅबलेट बाजारपेठ अजूनही प्राथमिक अवस्थेत असली तरी नवनवीन पुरवठादार आणि त्यांच्या स्वस्तातील टॅबलेटमुळे देशात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे . चालू वर्षाच्या तिस - या तिमाहीतील विक्रीझालेले ४७ . ४ टक्के टॅबलेट नव्या कंपन्यांचे होते . त्यांचा प्रमुख फोकस शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या अॅप्सचा प्रसार करण्याचा आहे . यावरून टॅबलेट विक्रेत्यांनी भारतीय युवकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होत असल्याचेसीएमआर टेलिकॉम प्रॅक्टीसचे प्रमुख विश्लेषक फैसल कावूसा यांनी सांगितले . भविष्यात विंडोज , आयओएस ,क्यूएनएक्स या ऑपरेटींग सिस्टीमवर आधारित टॅबलेटचे प्रमाण आयपॅड ३ आणि प्लेबुकच्या घसरणा - या किमतीमुळे वाढणार असल्याचे ते म्हणाले .

Page 5 of 5 1 4 5
ADVERTISEMENT
error: Content is protected!