MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

‘फेसबुक’ची नवी ‘सर्च क्रांती’

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 22, 2013
in Social Media
एखाद्या गोष्टीची सवय झाली , की नवे काही स्वीकारायला आपले मन तयार होत नाही. इंटरनेटवर सर्च इंजिनचा वापर करण्याच्या झालेल्या सवयीमुळे दुसऱ्या कुठल्या प्रकारे एखादी गोष्ट शोधता येईल , याचा विचारही फारसा कुणाला शिवला नसेल. आपल्याला जे सर्च करायचे आहे , तो शब्द टाइप करून संबंधित वेबसाइटच्या लिंकवर जायचे आणि हवी ती माहिती घ्यायची , असे साधारण आपल्याला माहीत असलेले सर्चचे स्वरूप आहे. पण , ‘ फेसबुक ‘ ने या सर्च संकल्पनेला फाटा देत कुणी विचारही करणार नाही , अशा नव्या पद्धतीची टूल बनवली आहे. 
या टूलद्वारे ‘ सर्च मेथड ‘ तर बदलणार आहेच ; पण सर्च करण्यामध्ये मोनोपॉली असलेल्या ‘ गुगल ‘ ला आणि इतर कंपन्यांच्या वेबसाइट्सना शह देण्याचाही त्यामागे प्रयत्न आहे. मंगळवारी या टूलचे अनावरण करण्यात आले. या टूलला ‘ ग्राफ सर्च ‘ असे संबोधण्यात आले आहे. 

‘ फेसबुक ‘ चे सहसंस्थापक आणि मुख्य अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी या ‘ टूल ‘ चे महत्त्व सांगितले. ते म्हणाले , ‘ ग्राफ सर्च ‘ साठी वर्षभराहून अधिक काळ आम्हाला लागला. सोशल नेटवर्कमध्ये युझरना सर्च करता येणार आहे. फेसबुकवर कुठलीही माहिती शोधण्यासाठी अत्यंत नव्या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. पहिल्यांदा काही हजार यूझरनाच ही सुविधा वापरायला मिळेल. हळूहळू ती इतर यूझरना दिली जाईल. ‘ 

टूलमध्ये नेमके काय ? 

फेसबुक युझर त्यांच्या सोशल नेटवर्कमध्ये त्यांना हवे ते सर्च करू शकतील. त्यामध्ये त्यांना हव्या असलेल्या व्यक्ती, ठिकाणे , फोटो आणि त्यांना जे आवडेल , ते येथे सर्च करता येईल. एखादे हॉटेल आपल्या एखाद्या मित्राने ‘लाइक ‘ केले असेल , तर हॉटेल म्हणून सर्च दिला , तर आपल्याला संबंधित हॉटेलचे डिटेल्स मिळतील. डेंटिस्ट ,जॉब आणि बरेच काही शोधण्यासाठी याचा उपयोग होईल. गुगलवरील सर्च आणि फेसबुकच्या सर्चमध्ये असलेला मूलभूत फरक म्हणजे फेसबुकवर सर्च केल्यानंतर वेबसाइट्सची भली मोठी यादी दिसत नाही. सोशल नेटवर्कद्वारेच हवे ते मिळाल्यामुळे युझर ‘ गुगल ‘ चा वापर कमी करण्याची शक्यता आहे. आपल्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीद्वारे सर्च करून मिळालेली माहिती ही गुगलवर स्वतंत्र सर्च करून मिळवलेल्या माहितीपेक्षा अधिक विश्वासार्ह असेल , असा दावा कंपनीने केला आहे. 

सोशल नेटर्किंग पुरेसे 

फेसबुकमधील ‘ डेटा ‘ सर्चसाठी पुरेसा आहे , या गृहितकावर ‘ ग्राफ सर्च ‘ ची निर्मिती केली आहे. मित्राला कुठले पार्क आवडते , त्यावरून आपण एखाद्या पार्कबद्दलची माहिती , त्याचे फोटो पाहून संबंधित उद्यानात जावे , की न जावे हे ठरवू शकतो. केवळ ‘ सोशल नेटवर्किंग ‘ पुरतेच फेसबुकवरील सर्च मर्यादित राहणार आहे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे हा सर्च पुरेसा ठरेल , असा कंपनीचा दावा आहे. 

ADVERTISEMENT
Tags: FacebookSearch Engine
ShareTweetSend
Previous Post

गुगलच्या भाषांतराचे अजब-गजब !

Next Post

ब्रिटिश फेसबुकला कंटाळले!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

February 8, 2023
गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

February 7, 2023
Next Post

ब्रिटिश फेसबुकला कंटाळले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech