MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

अँड्रॉइड अॅपची चलती

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 13, 2013
in ॲप्स
अॅपल , विंडोज , ब्लॅकबेरी आणि अँड्रॉइड अशा चार ऑपरेटिंग सिस्टिमची सध्या मार्केटमध्ये चांगलीच चलती आहे . विंडोज मार्केटमध्ये नवीनच असल्याने अजून त्याची म्हणावी , तशी स्पर्धा सुरू झालेली नाही . पण अॅपल आणि अँड्रॉइड या दोन ऑपरेटिंग सिस्टिममध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे . या दोन्ही ओएसमध्ये नेमकी कोण बाजी मारतो , याकडे मार्केटचं नेहमीच लक्ष असतं . नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात अँड्रॉइड अॅप्स सर्वाधिक डाऊनलोड झाले आहेत , अशी माहिती कॅनलिस या आयटी सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे . 

जानेवारी २०१३ ते मार्च २०१३ या कालावधीत डाऊनलोड झालेल्या अॅप्लिकेशन्सपैकी ५१ टक्के अॅप्लिकेशन्सही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारी होती . गुगल प्लेवरून ही सर्व अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यात आली होती . उर्वरित ४९ टक्क्यांमध्ये ब्लॅकबेरी , अॅपल आणि विंडोज या ओएसचा क्रमांक येतो .डाऊनलोडिंगमध्ये अँड्रॉइड आघाडीवर असलं तरी उत्पन्न कमविण्यामध्ये अॅपलने बाजी मारली आहे .  
                  या तीन महिन्यांच्या कालावधीत डाऊनलोड झालेल्या अॅप्लिकेशनच्या उत्पन्नाचा विचार केल्यास त्या उत्पन्नातील ७४टक्के उत्पन्न हे अॅपलला मिळाले आहे . उर्वरित २६ टक्क्यांमध्ये ‘ गुगल प्ले ‘ चा वाटा सर्वाधिक आहे . ब्लॅकबेरीवर्ल्ड आणि विंडोज फोन स्टोअरमध्ये सर्वात कमी उत्पन्न मिळाल्याचे या सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे .पहिल्या तीन महिन्यांमध्ये एकूण १३ . ४ अब्ज अॅप्लिकेशन्स डाऊनलोड झाली आहेत . यातून सुमारे २ . २ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उत्पन्न मिळाले आहे . अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले यांच्यात चांगलीच स्पर्धा आहे . पण ब्लॅकबेरी वर्ल्ड आणि विंडोज फोन स्टोअर हे या दोन्ही ब्रॅण्डसच्या स्पर्धेत कुठेही तोडीस तोड येत नाहीत , असे मत कॅनलिसचे ज्येष्ठ अभ्यासक टीम शेफर्ड यांनी सांगितले . या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यात आल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे . यावरून असे स्पष्ट होते की , जगभरात स्मार्टफोन वापरणा -यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे . 
इंडोनेशिया , दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वाधिक अॅप्लिकेशन्स डाऊनलोड झाली आहेत . पण तेथून उत्पन्न फार कमी आले आहे . याचाच अर्थ असा आहे की येथे या भागात फ्री अॅप्लिकेशन्स सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आले आहेत . भारतात स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत ४२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे .

ADVERTISEMENT
Tags: AndroidApp StoreAppsPlay Store
ShareTweetSend
Previous Post

‘सोशल नेटवर्किंग’ची दुनिया आभासीच

Next Post

आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post
आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech