MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home सॉफ्टवेअर्स

‘सॅमसंग’, ‘मोझिला’चे नवे ब्राउजर : लवकरच ‘सर्वो’ ब्राउजर लाँच करणार

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 10, 2013
in सॉफ्टवेअर्स
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातील अग्रणी ‘सॅमसंग’ आणि ब्राउजरच्या दुनियेतील ‘मोझिला’ यांच्यातर्फे संयुक्तपणे नवे वेब ब्राउजर सादर करण्यात येणार आहे. ‘सर्वो’ या नावाने हे वेब ब्राउजर इंजिन बाजारात दाखल होणार आहे.

‘मोझिला’चे मुख्य तांत्रिक अधिकारी ब्रेंडन आयनीड यांनी या बाबत माहिती ​दिली. इंटरनेटचा वापर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला अधिक वेगवान आणि अनेकविध सेवांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने ‘सॅमसंग’समवेत मिळून नव्या ब्राउजरची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आयनीड यांनी स्पष्ट केले. मोझिला आणि ‘सॅमसंग’तर्फे या ब्राउजरची निर्मिती ‘रस्ट’मध्ये करण्यात येणार आहे. या ब्राउजरच्या निर्मितीसाठी ‘मोझिला’ने ‘रस्ट’ ही नवी प्रोग्रॅमिंग लँग्वेज विकसित केली आहे. सध्या ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज विकासाच्या प्रक्रियेत असून, तिचे ०.६ हे व्हर्जन बुधवारी लाँच करण्यात आले.

‘गेल्या काही वर्षांमध्ये सी प्लस प्लसवर आधारित अनेक वेब ब्राउजर विकसित करण्यात आले. मात्र, सध्याच्या आधुनिक काळात नुसते ब्राउजर असून, उपयोग नाही तर त्याची क्षमता आणि वेग वाढविणेही गरजेचे बनले आहे.उच्च क्षमतेच्या, बहुपेडी ब्राउजरची गरज सातत्याने भासत असल्याने सर्वोची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे आयनीड यांनी स्पष्ट केले. ‘सर्वो’ची निर्मिती करून ‘मोझिला’ आणि ‘सॅमसंग’चा ब्राउजिंगच्या दुनियेतील ग्राहकांना अत्यंत सुरक्षित आणि चांगली अनुभूती देण्याचा प्रयत्न आहे. या ब्राउजर​वरील कामाला सुरुवात झाली असून, ते कधी बाजारात येईल या विषयी बोलण्यास नकार देण्यात आला.

‘मोझिला’ची स्मार्टफोननिर्मितीत एंट्री 

केवळ ब्राउजरच नाही, तर ‘मोझिला’ आता स्मार्टफोनच्या निर्मितीतही प्रवेश करणार आहे. ‘फायरफॉक्स’ या लोकप्रिय वेब ब्राउजरची निर्मिती करणाऱ्या ‘मोझिला’ने आता फायरफॉक्स बेस्ड स्मार्टफोनची निर्मिती करण्याचे जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये झेटीईच्या भागीदारीत ‘मोझिला’ने ‘फायरफॉक्स’ ही ऑपरेटिंग सि​स्टीम असलेले स्मार्टफोनचे प्रारूप सादर करण्यात आले होते.

ADVERTISEMENT
Tags: BrowserMozillaSamsungServo
ShareTweetSend
Previous Post

विंडोजची निळाई : मायक्रोसॉफ्ट विंडोज

Next Post

उत्तर एका क्लिकवर :(आस्क अ क्वेश्चन अॅप ) उत्तर देतील ते थेट आयआयटीमधील तज्ज्ञ प्रोफेसर्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Next Post

उत्तर एका क्लिकवर :(आस्क अ क्वेश्चन अॅप ) उत्तर देतील ते थेट आयआयटीमधील तज्ज्ञ प्रोफेसर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech