MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

गुगलचे फोटो ‘अधिक’ ‘ वर्ल्ड फोटोग्राफी डे ‘निमित्त गुगल+ फोटो ‘ सर्व्हिसमध्ये मोठा बदल

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 31, 2013
in इंटरनेट
सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रावर आपल्या ठसा उमटवण्यात ‘गुगल+ ‘ फारसे यशस्वी ठरलेले नसले , तरी सोमवारी जगभरात साजरा करण्यात आलेल्या ‘ वर्ल्ड फोटोग्राफी डे ‘निमित्ताने ‘ गुगल+ ‘ ने त्यांच्या ‘ फोटो ‘ या सर्व्हिसमध्ये मोठा बदल केला आहे. यामुळे येत्या काळात ‘ गुगल+ ‘ हे फोटोशेअरिंगसाठीचे खूप मोठे व्यासपीठ ठरणार आहे. मोबइलमध्ये काढलेला फोटो थेट ‘ गुगल+ ‘ च्या अकाऊंटमध्ये सेव्ह करता येऊ शकतो. त्यासाठी मोबाइलची मेमरी खर्च करण्याची गरज राहत नाही. 

‘ गुगल+ ‘ ने मुंबईत फोटोग्राफी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर रघू राययांच्यासह अनेक फोटोग्राफर्सनी हजेरी लावली होती. इतकेच नव्हे , तर या फोटाग्राफर्सच्या काही फोटोंचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते. 

‘ गुगल+ ‘ फोटोमध्ये देण्यात आलेले काही फीचर्स अत्यंत उपयुक्त ठरतील. 

ऑटो बॅकअप – आपण एकदा आपल्या अँड्रॉइड फोन किंवा आयफोनवरून ‘ गुगल+ ‘ चे अकाऊंट सिंक केले की ,काढलेला फोटो थेट क्लाऊड टेक्नॉलॉजीद्वारे ‘ गुगल+ ‘ वर सेव्ह राहतो. यामुळे काही कारणांमुळे तुमच्यामोबाइलमधला डेटा उडाला तरी त्याचा बॅकअप या अकाऊंटवर मिळू शकतो. 

ऑटो एक्स्टेन्शन – ऑटो एक्स्टेन्शनमुळे आपल्या फोटोंमध्ये छोट्या-छोट्या हालचाली दिल्या जातात. त्यामुळे आपल्या फोटोंमधील चेहऱ्यांवर काम होते आणि चेहरा चांगला दिसतो. 

ऑटो हायलाइट – नवीन फोटो अपलोड केला , की तुम्हाला तुमच्या कलेक्शनमधील हायलाइट्स दाखवता येऊ शकतात. त्यामुळे तुमचे सर्वोत्तम फोटो शेअर करणे शक्य होते. डुप्लिकेट आणि हललेल्या फोटोंमधून हवा तो फोटोशोधण्यासाठी फार वेळ वाया घालवायची गरज उरणार नाही व आपले आवडते फोटो आवडत्या लोकांसोबत शेअर करणे शक्य होते. 

ऑटो ऑसम – फोटोमागची कथा जर तुम्हाला शेअर करायची असेल तर तुम्ही ऑटो ऑसममुळे ती शेअर करू शकता. यात फोटोंमध्ये छोटेछोटे अॅनिमेशन वापरून फोटोमागची कथा रंगवून सांगता येऊ शकते. 

‘ गुगल+ ‘ ने फोटो या सुविधेतून अनेक गोष्टी हौशी फोटोग्राफर्सच्या आवाक्यात आणल्या आहेत. यामुळे छोट्या फोटोग्राफर्सनाही आपले फोटो अधिक आकर्षकपणे मांडता येऊ शकतील , असे गुगल इंडियाचे मार्केटिंग विभागाचे संचालक संदीप मेनन यांनी स्पष्ट केले. फोटोग्राफर्सच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन गुगलने उपयोगी फोटो एडिटिंग साधने देण्यावर लक्ष केंद्रित केले असून त्या द्वारे ते महत्त्वाच्या ठरणाऱ्या विशेष घटनांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फोटोग्राफर्सना सहकार्य करू शकणार आहेत , असेही ते म्हणाले.

ADVERTISEMENT
Tags: GoogleGoogle PlusPhotographyPhotosSharing
ShareTweetSend
Previous Post

पुणे-मुंबई टॅक्सीचे कॉल सेंटर

Next Post

वायरलेस चार्जिंगचा नोकिया स्मार्टफोन लाँच

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post

वायरलेस चार्जिंगचा नोकिया स्मार्टफोन लाँच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech