MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 29, 2026
in News
Google Workspace New App Icons

जर तुम्ही गेल्या काही दिवसांत तुमचे मोबाईल अ‍ॅप्स किंवा वेब ब्राऊझर बार बारकाईने पाहिले असतील, तर तुम्हाला गुगलच्या अ‍ॅप्समध्ये काहीतरी वेगळेपण जाणवले असेल. गूगलने अधिकृतपणे त्यांच्या लोकप्रिय गूगल वर्कस्पेस (Google Workspace) अ‍ॅप्सचे आयकॉन्स पूर्णपणे बदलले आहेत.

२६ मे २०२६ रोजी गूगलने या मोठ्या डिझाईन बदलाची घोषणा केली. गुगलच्या मते, हा बदल त्यांच्या ‘जेमिनी एरा’ (Gemini Era) म्हणजेच एआय युगातील एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे.

ADVERTISEMENT

२०२० मध्ये गुगलने आपल्या सर्व अ‍ॅप्ससाठी चार रंगांची (निळा, लाल, पिवळा आणि हिरवा) एकसारखी आऊटलाईन असलेली डिझाईन आणली होती. पण, युजर्सची नेहमी एकच तक्रार असायची की, मोबाईल स्क्रीनवर सगळे अ‍ॅप्स एकाच सारखे दिसतात, त्यामुळे नेमके कोणते अ‍ॅप उघडायचे ते समजत नाही! आता गुगलने लोकांची ही अडचण दूर केली आहे. आता सपाट (Flat) टाइपच्या डिझाईनमधील आयकॉन्स ऐवजी ग्लॉसी आणि थ्रीडी लुक (Glossy Gradients) असलेल्या नवीन आयकॉन्स आल्या आहेत. अँड्रॉइड १७ (Android 17) मध्ये येणाऱ्या नव्या थ्रीडी इमोजी स्टाईलसारखाच हा काहीसा लुक आहे.

कोणत्या १४ अ‍ॅप्सचे आयकॉन्स बदलले?
Gmail, Calendar, Chat, Meet, Drive, Docs, Slides, Sheets, Keep, Forms, Sites, Tasks, Vids, Voice.

तुम्हाला हे नवीन आयकॉन्स कधी दिसणार?
या नव्या आयकॉन्सचा रोलआऊट १९ मे २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सुरू झाला आहे. गुगलने स्पष्ट केले आहे की, हा एक ‘एक्सटेंडेड रोलआऊट’ आहे. याचा अर्थ असा की, सर्व युजर्सच्या मोबाईलवर आणि कॉम्प्युटरवर हे बदल पूर्णपणे दिसण्यासाठी जून २०२६ च्या मध्यापर्यंतचा वेळ लागू शकतो. त्यामुळे, जर तुमच्या सहकाऱ्याच्या फोनवर नवीन Gmail चा आयकॉन दिसत असेल आणि तुमच्या फोनवर अजूनही जुनाच असेल, तर काळजी करू नका; येत्या काही दिवसांत तुमच्याही फोनवर अ‍ॅप अपडेट उपलब्ध होईल!

तुम्हाला गुगलचा हा नवीन लुक कसा वाटला? जुनी डिझाईन बरी होती की ही नवीन डिझाईन जास्त आवडली?

Out with the old, in with the bold ✨

We gave the Google Workspace icons a sleeker look to meet this new era of helpfulness. Check them out! https://t.co/NHtXdghQys pic.twitter.com/oE3RVs9h7f

— Google Workspace (@GoogleWorkspace) May 19, 2026
Tags: GoogleGoogle WorkspaceIcons
ShareTweetSend
Previous Post

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

Next Post

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
Next Post
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech