MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

युट्युब नेशन : यूट्यूबवरील व्हिडिओ शोधणे सेवा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 20, 2014
in इंटरनेट
you-tubeयूट्यूबवरील व्हिडिओ शोधणे म्हणजे नाही म्हटले तरी दिव्यच असते. पण यावर आता यूट्यूबने यावर उपाय शोधला आहे. यूट्यूब नेशन नावाची नवीन सेवा नुकतीच सुरू झाली असून त्यावर दररोजचे नवीन हायलाइट्स, ट्रेंडिंग आणि अजून न शोधलेले व्हिडिओचे हायलाइट रील उपलब्ध असणार आहे. यासाठी यूट्यूबने ड्रीमवर्क्स अॅनिमेशनसोबत टायअप केले आहे. त्यासाठी 

www.youtube.com/user/youtubenation ही लिंक अॅक्टिव्ह ही करण्यात आली आहे. 

ड्रीमवर्क्सची टीम या डेटातून मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ तर शोधेलच शिवाय यूट्यूबच्या युजर्ससाठी कोणता व्हिडिओ ‘व्हायरल’ ठरणार हे सुद्धा शोधणार आहे.अथांग सम्रुद्रात दिपस्तंभासारखा याचा उपयोग होईल, अशी टिप्पणी ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सीईओ जेफरी कॅटझेनबर्ग यांनी केली आहे. जेफरी यांची ही टिप्पणी अतिशयोक्तीपूर्ण वाटत असली तर यात तथ्य आहे. कारण एका मिनिटात १०० तासाच्या लांबीचे व्हिडोओ यूट्यूबवर अपलोड होत असतात. इतक्या डेटातून व्हिडीओ सर्च करणे म्हणजे सोपे काम नाही. 

फक्त विश्लेषण आणि गणितांच्या आधारावर आमचे काम अवलंबून असणार नाही. सर्वात जास्त काय पाहिले जात आहे, हे दाखवले जाईलच पण काय सर्वात जास्त पाहिले जावू शकेले हे शोधणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास पाच मिनिटांचा एक शो असेल, त्यात एक तासापेक्षा जास्त लांबीच्या व्हिडिओच्या लिंक असतील. १८ ते ३० वयोगटातील युजर्ससाठी याचा अधिकाधिक उपयोग होवू शकेल. कधीतरी युट्युबचा वापर करणारे नियमितपणे युट्युबचे दर्शक व्हावे, हे लक्षात ठेवून यूट्यूब नेशनची रचना करण्यात आली आहे. 

यू ट्यूबरील कंटेंट प्रमोट करण्यासाठी यूटयूब नेशनची निर्मिती करण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांचा हा एकत्रित प्रोजेक्ट असून जवळपास एक वर्ष यावर काम सुरू असल्याचे यू ट्यूबचे कंटेट आणि बिझनेस ऑपरेशन्सचे प्रमुख रॉबर्ट किंकल यांनी सांगितले आहे. ही फक्त सुरुवात असून यानंतर स्पोर्टस, न्यूज आणि म्युझिक अशा किमान एक डझन कॅटेगरी बनवण्यात येणार असल्याचे ड्रीमवर्क अॅनिमेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT
Tags: GoogleVideosYouTube
ShareTweetSend
Previous Post

प्रॉब्लेम्स (“दर्द”) शेअर करणारी वेबसाइट

Next Post

थ्री-डी प्रिंटर बांधणार घर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post

थ्री-डी प्रिंटर बांधणार घर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech