MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Micromaxने लॉन्च केला Canvas Knight

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 10, 2014
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
Micromaxने लॉन्च केला Canvas Knight, जाणून घ्या फिचर्समायक्रोमॅक्सने लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन कॅनवास नाइट ऑक्टो- कोर चिपसह लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मायक्रोमॅक्स इंटरनेटवर या मोबाइलच्या टिजर व्हिडीओ पोस्ट करत होते. मायक्रोमॅक्सचा हा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी S5ला टक्कर देईल हे निश्चित आहे. गॅलेक्सीS5 प्रमाणेच मायक्रोमॅक्स कॅनवास नाइटमध्येही 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. याचबरोबर हा स्मार्टफोन एक्सपिरिया Z2, HTC One 2 M8 नोकिया आणि मोटोरोलाच्या लेटेस्ट अ‍ॅन्ड्राइड मोबाइल्सना टक्कर देईल. 
ऑक्टा-कोर असणारा पहिला मोबाइल
कॅनवासच्या टिझर अ‍ॅडमध्ये ‘The power of Eight’ ही कंपनीची टॅगलाइन होती. यानूसार हा स्मार्टफोन ऑक्टा कोर प्रोसेसरवर आधारित असणार हे निश्चित झाले होते. मायक्रोमॅक्सचा हा पहिलाच ऑक्टा- कोर प्रोसेसर असणारा स्मार्टफोन आहे. 
मायक्रोमॅक्स कॅनवास नाइटची डिस्प्ले स्क्रीन 5 इंच आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधी कंपनीने पोस्ट केलेल्या  फोटोला ‘Beyond High Definition’ही टॅगलाइन दिली होती. यावरून यात 2K रिझल्यूशन असे वाटत होते मात्र कंपनीने यात केवळ फुल एचडी डिस्प्ले दिलेला आहे. या मोबाइलची 5 इंच स्क्रीन 1080×1920 रिझल्यूशन देते. याचबरोबर 443 पिक्सल प्रती इंच एवढी याची डेन्सिटी आहे. 
कॅमेरा 
लॉन्चिंगपूर्वी सांगितल्याप्रमाणेच यामध्ये 16 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. याचबरोबर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.  ओमिनी व्हिजन कॅमेरा चिप सोबतच यात M8 लारगन लेन्स आहे. कॅमे-याविषयी सागांयचे झाल्यास मायक्रोमॅक्सने आतापर्यंत लॉन्च केलेल्या मोबाइलपैकी या स्मार्टफोनचा कॅमेरा सर्वात जास्त पॉवरफुल आहे.

मेमरी आणि ऑपरेटिंग सिस्टम 
कॅनवास नाइटची ऑपरेटिंग सिस्टम 4.2.2 जेलीबीन आहे. आता बाजारात अ‍ॅन्ड्राइड किटकॅट 4 ऑपरेटिंग सिस्टम असणारे मोबाइल मिळत असताना हा स्मार्टफोन जून्याच ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. 
या मोबाइलमध्ये 32GB इंटरनल मेमरी असून एक्सर्टनल मेमरीविषयीची माहिती कंपनीने सांगितलेली नाही.
Micromaxने लॉन्च केला Canvas Knight, जाणून घ्या फिचर्सइतर फिचर्स 
या मोबाइलमध्य़े  2 GHz चे ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. याशिवाय या स्मार्टफोनची रॅम 2GB आहे.  2350 mAh बॅटरीसोबतच या मोबाइलमध्ये कनेक्टीव्हीटीसाठी 3G,वाय-फाय, ब्ल्यूटूथ पर्याय देण्यात आले आहेत. हा मोबाइल 7.5 तासांचा टॉकटाइम आणि 175 तासांचा स्टॅण्डबाय टाइम देईल असा कंपनीने दावा केला आहे. 
रंग
कॅनवास नाइट काळ्या, काळ्या आणि सोनेरी, पांढरा आणि सोनेरी रंगात लॉन्च करण्यात आला आहे. 
किंमत
मायक्रोमॅक्सने या मोबाइलची प्री ऑर्डर सुरू केली असून या मोबाइलची किंमत 19,999 रूपये आहे.
Source : Divya Marathi
Tags: AndroidMicromaxSmartphones
ShareTweetSend
Previous Post

अँड्रॉइड फोनवर मराठी टायपिंग कसे करायचे

Next Post

आयफोनची ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 लॉन्च

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post

आयफोनची ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 लॉन्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech