![कॅनॉनने भारतात लॉन्च केला सुपरपिक्चर क्वॉलिटी डीएसएलआर कॅमेरा](http://i6.dainikbhaskar.com/thumbnail/655x588/web2images/divyamarathi.bhaskar.com/2014/03/28/0156_1993_1.jpg)
कॅनन ‘ईओएस 1200डी’ हा एक अँट्री लेव्हल डीएसएलआर कॅमेरा असून त्यात 18 मेगापिक्सल एपीएस-सी सीमॉस सेंसर, डिजिक4 प्रोसेसर देण्यात आले आहे. याशिवाय 1080 पिक्सलचे 24 एफपीएससोबत 30एफपीएस फॉर्मेटमध्ये फूल एचडी व्हिडिओ शूट केला जाऊ शकतो. 9 पॉइंट ऑटोफोकस सिस्टिमही देण्यात आली आहे. हीच सिस्टिम कॅनने ‘1100डी’मध्येही वापरली आहे.
एवढेच नव्हे तर ‘ईओएस 1200डी’मध्ये 70 प्रकारचे नन ईएफ लेन्स सपोर्ट करतात. यूजरला फ्रेंडली मेनू तसेच 3 इंचाचा टीएफटी मॉनिटर डिस्प्ले दिला आहे.
कॅनन’ने या कॅमेरामध्ये 18-55 एमएम लेन्स आणि 55 -250 एमएम लेन्स असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहे. या दोन्ही मॉडेलची किंमत क्रमश: 34,995 रूपये आणि 39,995 रूपये आहे.