MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

फेकूचंदांपासून सावधान

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 3, 2014
in Security
दीपिका-रणवीरच्या रिलेशनशिपची बातमी एफबीवर झळकली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा उपद्वव्याप केला होता त्यांच्या नावाच्या ‘अनऑफिशिअल’ अकाऊंटवरुन. सोशल मीडियावरील स्टार्सच्या फेक अकाऊंटवर असला ‘आगाऊ’पणा वारंवार सुरू असून बॉलिवूड स्टार्स त्याला वैतागले आहेत. 

‘दीपिका प्रकाश पडुकोण इज इन अ रिलेशनशिप विद रणवीर सिंग…येस इट्स ऑफिशिअल नाऊ’. दीपिकानं तसं फेसबुकवरही टाकलंय. आश्चर्य वाटलं ना? पण थांबा थांबा…डोळे मोठे करण्याआधी जरा नीट वाचून घ्या. वर दिलेल्या या बातमीची गेला आठवडाभर सोशल नेटवर्किंग साईट्सवर जोरदार चर्चा होती. पण फ्रेंड्स, यात काहीही तथ्य नाही. हा केवळ दीपिका-रणवीरच्या फॅन्सनी केलेला उपद्व्याप आहे. त्यांच्या चाहत्यांनी फेसबुकवर खोटं अकाऊंट तयार करून त्यावर त्यांच्या प्रेमाची खुलेआम ग्वाही दिली. सोशल मीडियावर चाहत्यांनी केलेल्या अशा ‘आगाऊ’पणामुळे बॉलिवूड स्टार्स अक्षरशः वैतागले असून ‘यांना कुणीतरी आवरा’ असं ते म्हणू लागले आहेत. 

दीपिका आणि रणवीरनं स्वतः असं काहीही म्हटलेलं नसतानाही केवळ फेक अकाऊंटमुळे हा गैरसमज झाला. वास्तवात रणवीर किंवा दीपिकाच्या खऱ्या फेसबुकवर प्रोफाइल्सवर असं काहीही नाही. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, परिणीती चोप्रा, श्रद्धा कपूर, आलिया भट असे अनेक बॉलिवूड सेलेब्स सतत ऑनलाइन असतात. त्यांची अधिकृत अकाउंट्सही आहेत. पण कतरिना कैफ, रणबीर कपूर, विद्या बालन, सैफ अली खान, करीना कपूर या स्टार्सना हे माध्यम अजिबात आवडत नाही. त्यांना प्रायव्हसी हवी असल्यानं ते सोशल मीडियापासून चार हात लांब राहणंच पसंत करतात. पण जे कलाकार यापासून लांब आहेत त्यांचे फॅन्स त्यांच्या नावाने फेक अकाऊंटस बनवत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे त्यातून सगळा गोंधळ उडतो आणि त्याचा ताप या स्टार्सना होतोय. 

साऊथची सुपरस्टार असीनसोबतही असंच घडलं. एरव्ही मायक्रो ब्लॉगिंग साईट्सपासून लांब राहणारी असीन काही दिवसांपूर्वी अचानक अॅक्टिव्ह झालेली दिसून आली. तिच्या ट्विटर अकाउंटवर अभिषेक बच्चन, रितेश देशमुख अशा अनेक स्टार्सनी तिच्याशी संवाद साधायला सुरूवात केली. पण नंतर समजलं की ती असीन नव्हतीच. तिच्या कुणा चाहत्यानं तिचं हे फेक अकाउंट बनवलं होतं. नंतर खुद्द रितेशनंच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हे सांगितलं. असाच काहीसा प्रकार ‘तू चीज बडी है मस्त मस्त’फेम रवीना टंडनबरोबही घडला. रवीना आता फेसबुकवर नाहीय. पण आपलं एफबी अकाऊंट कॅनडाच्या कुणी इसमानं हॅक केलंय असा आरोप तिनं केला आहे. ‘माझं फेसबुक प्रोफाइल दोन वर्षांपूर्वीच हॅक झालंय. याबाबत मी सायबर क्राइम विभागाकडे तक्रारही नोंदवली आहे. हे अकाऊंट बंद करण्यासाठी मी सगळे प्रयत्न केलेत. पण आता कुणीतरी कॅनडाहून ते चालवत आहे’ असं तिनं ट्विटरवर नमूद केलंय. 

एकूणात काय, हल्ली बॉलिवूड स्टार्स सोशल साईट्सवर असो वा नसो, त्यांचे चाहते त्यांची फेक अकाउंट्स काढताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना मनःस्ताप सहन करावा लागतोय. 

फेसबुक-ट्विटरवर नसलेले स्टार्स :: 

रणबीर कपूर, कतरिना कैफ, विद्या बालन, करीना कपूर, सैफ अली खान, असीन, कंगना, काजोल,ऐश्वर्या राय-बच्चन इम्रान खान सुशांतसिंग राजपूत

ADVERTISEMENT
Tags: BollywoodCelebritiesFacebookFakeProfilesTwitter
ShareTweetSend
Previous Post

बारावीचा निकाल आज

Next Post

फेसबूक लवकरच मोबाइलवर इंटरनेटविना

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Community Notes India

X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!

April 4, 2024
ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

July 24, 2023
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
Next Post

फेसबूक लवकरच मोबाइलवर इंटरनेटविना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech