फेसबुकच्या डेटा चोरीमध्ये तब्बल ३ कोटी यूजर्सचा डेटा हॅकर्सकडे!

फेसबुकने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार तब्बल ५ कोटी वापरकर्त्यांचं अकाउंट हॅक झालं असून सुरक्षेमधील एका त्रुटीमुळे एव्हढ्या यूजर्सच्या अकाउंट्स धोक्यात सापडली होती! फेसबुकने त्यावेळी सुरु केलेल्या तपासाची माहिती आज प्रसिद्ध केली असून ३ कोटी यूजर्सच्या टोकनची माहिती मिळवून त्यांची वैयक्तिक माहिती हॅकर्सना मिळाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

तुमच्या अकाउंटबद्दल माहिती चोरीला गेली आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंकवर जा त्यानंतर आलेल्या पेजवर शेवटी Is my Facebook account impacted by this security issue? असा लिहलेला बॉक्स दिसेल ज्यामध्ये तुमचं अकाउंट त्या डेटा चोरीमध्ये होतं किंवा नाही याबद्दल लिहलेलं दिसेल.

या लिंकवर जाऊन शेवटी पहा facebook.com/help/securitynotice

जर अकाऊंटची माहिती चोरीला गेली असेल तर असे दिसेल
जर अकाऊंटची माहिती सुरक्षित असेल तर असे दिसेल

त्या त्रुटीद्वारे ऍक्सेस मिळालेल्या या ३ कोटी यूजर्सपैकी दीड कोटी यूजर्सची नावं, ईमेल ऍड्रेस, फोन क्रमांक हॅकर्सच्या तावडीत सापडले आहेत तर उर्वरित यूजर्सची ह्या माहितीसोबतच प्रोफाइल फोटो, धर्म, लोकेशन, डिव्हाईस इन्फो, कोणत्या ठिकाणी गेला आहेत आणि तुम्ही लाईक केलेली पेजेस अशी जवळपास सर्वच माहिती हॅकर्सना मिळाली आहे! तर राहिलेल्या दहा लाख अकाउंट्सची कोणतीही माहिती मिळवू शकले नाहीत. 

जरी तुमच अकाउंट ऍक्सेस केलेलं असलं तरी पासवर्ड बदलण्याची गरज नाही असं फेसबुककडून सांगण्यात येत आहे कारण पासवर्डची चोरी झाली नसून अकाउंट पाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टोकनची झाली आहे. ही टोकन्स फेसबुकने रिसेट केली आहेत. याबाबत अजूनही तपास सुरु असून सध्यातरी ही मिळालेली माहिती हॅकर्सनी कुठेही वापरली असल्याचं निदर्शनास आलेलं नाही.

याबद्दल फेसबुकची अधिकृत पोस्ट : An Update on the Security Issue 

माहितीसाठी इतर लेख :

search terms how to check if your account data is stolen in Facebook data leak exposure  

Exit mobile version