MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

विद्यार्थ्यांनी माइनक्राफ्टमध्ये तयार केली त्यांच्या शाळा/कॉलेजची प्रतिकृती!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 6, 2020
in गेमिंग
Minecraft Student Recreated School

सध्या कोरोना/COVID-19 मुळे जगभर बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. अशावेळी शाळा, कॉलेज सारखी ठिकाणे तर आधी बंद करण्यात आली. घरबसल्या फावल्या वेळात काही तरी करावं या उद्देशाने काही विद्यार्थ्यांच्या सुपीक डोक्यात भन्नाट कल्पना आली आणि त्यांनी चक्क माइनक्राफ्ट (Minecraft) या गेममध्ये त्यांच्या शाळा/कॉलेजची प्रतिकृती बनवायला सुरुवात केली. अनेकांनी तर पूर्ण कॉलेजच्या कॉलेज या गेममध्ये उभं केलं आहे!

यूनिवर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी आणि बॉस्टन यूनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यानी आधी याची सुरुवात केली अशी माहिती आहे. यामध्ये त्यांनी वर्ग, विद्यार्थ्यांच्या खोल्या, फूड ट्रकपर्यंत सर्वकाही बनवलं आहे! काही जण तर यामध्ये पदवीदान समारंभाचीही तयारी करत असल्याचं ऐकिवात आहे!

ADVERTISEMENT

माइनक्राफ्ट या प्रसिद्ध गेमला जवळपास अकरा वर्षे पूर्ण होत असून सध्या ११.२ कोटी लोक दरमहा ही गेम खेळत आहेत! मायक्रोसॉफ्टने २०१४ मध्ये माइनक्राफ्टची डेव्हलपमेंट पाहणार्‍या मोजांग कंपनीचं तब्बल 2.5 बिलियन डॉलर्स खर्चून अधिग्रहण केलं होतं! माइनक्राफ्ट अजूनही सर्वाधिक कॉपी विकलेल्या पीसी गेम्समध्ये आघाडीवर आहे. माइनक्राफ्ट हे नेहमीच्या गेम्सप्रमाणे नसून अनेक गोष्टी शिकण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. ब्लॉक्स वापरुन आपल्या कल्पना शक्तीला वाव देत ही गेम हव्या त्या प्रकारे खेळता येते! यामुळे मेंदूला चालना मिळत असल्याचंही अनेक संशोधनांमध्ये सांगण्यात आलं असून विद्यार्थ्यांना कोडिंग शिकवण्यासाठीही या गेमचा वापर करण्यात येत आहे. ही गेम पीसी, प्लेस्टेशन, एक्सबॉक्स, अँड्रॉइड, iOS वर उपलब्ध आहे!

This is amazing. https://t.co/i2n3gBRk3S

— Microsoft (@Microsoft) March 31, 2020

कल्पनाशक्तीला वाव देत हवी ती गोष्ट यामध्ये तयार करता येते. काही जणांनी पूर्ण शहरं, कॅल्कुलेटर, गेममध्ये गेम्स बनवली आहेत! एकाने तर या गेममध्ये वापरता येईल असा कम्प्युटर सुद्धा बनवला आहे!

गेल्या काही आठवड्यात गेमिंगचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं असून अशावेळी माइनक्राफ्ट तरी कसे मागे राहील… आधीच खूप क्रिएटिव लोक असणाऱ्या या गेमच्या जगतात आता माइनक्राफ्ट सर्व्हर्स मोठ्या सर्च केले जात आहेत. विद्यार्थी त्यांनी तयार केलेल्या गोष्टी फेसबुक, रेडिट व डिस्कॉर्डवर शेयर करताना पाहायला मिळत आहेत. भारतात ही गेम खेळण्याचं प्रमाण फारच कमी असावं. पब्जीसारख्या गेम्सचं वेड लागलेल्या लहान मुलांना अशा गेम्सद्वारे काही क्रिएटिव करता येऊ शकतं.

Source: The Verge
Tags: GamingMinecraft
Share8TweetSend
Previous Post

विंडोज १० आता १०० कोटी डिव्हाईसेसवर अॅक्टिव्ह!

Next Post

Windows 10 वर सहजसोपं मराठी टायपिंग : कोणत्याही सॉफ्टवेअर/टूलशिवाय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
Jio Game Controller

जियोचा गेम कंट्रोलर उपलब्ध : अँड्रॉइड फोन्सवर गेम्स खेळण्यासाठी उपयुक्त!

June 2, 2022
Epic Games Mega Sale

Epic Games चा मेगा सेल सुरू : ४ फ्री गेम्स मिळणार!

May 20, 2022
Apex Legends Mobile

Apex Legends Mobile गेम आता सर्वांसाठी iOS व अँड्रॉइडवर उपलब्ध!

May 17, 2022
Next Post
Windows 10 वर सहजसोपं मराठी टायपिंग : कोणत्याही सॉफ्टवेअर/टूलशिवाय!

Windows 10 वर सहजसोपं मराठी टायपिंग : कोणत्याही सॉफ्टवेअर/टूलशिवाय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!