MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टीव्ही

रियलमीचा आता स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 25, 2020
in Wearables, टीव्ही
realme TV

रियलमी या सर्वात वाढ नोंदवणाऱ्या स्मार्टफोन कंपनीने आता IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणे सादर करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आज काही उत्पादने सादर केली आहे. यामध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच, इयरबड्स आणि पॉवरबँकचा समावेश आहे. realme SmartTV, realme Watch, realme Buds Air Neo आणि realme Powerbank 2 येत्या काही दिवसात खरेदीसाठी उपलब्ध होत आहेत. सध्या भारतात सुरू असलेला चीनी वस्तूंना विरोध लक्षात घेता रियलमीने आता त्यांचं उत्पादन भारतात सुरू करणार असल्याचं यावेळी जाहीर केलं.

realme SmartTV : हा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असलेला स्मार्ट टीव्ही असून यामध्ये जवळपास सर्व स्मार्ट सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये HDMI, USB, AV, Digital Audio, ANT, LAN हे पोर्ट्स आणि WiFi, Bluetooth 5.0 जोडण्यात आलं आहे. यासोबत येणाऱ्या रिमोटवर नेटफ्लिक्स, प्राइम, यूट्यूब, गूगल असिस्टंटसाठी बटन्स देण्यात आली आहेत. MediaTek Quad Core प्रोसेसर, डॉल्बी ऑडिओ आहे.
याची किंमत १२९९९ (३२ इंची) आणि २१९९९ (४३ इंची) अशी असेल. हा टीव्ही realme.com, फ्लिपकार्टवर २ जून दुपारी १२ पासून उपलब्ध होणार आहे. त्यानंतर लवकरच ऑफलाइन दुकानांमध्येही उपलब्ध होईल.

ADVERTISEMENT

realme Watch : रियलमीने आता त्यांचं स्मार्टवॉचसुद्धा आणलं असून यामध्ये कमी किंमतीत अनेक सुविधा देऊन चांगला पर्याय दिला आहे. यामध्ये 1.4″ टचस्क्रीन डिस्प्ले असून रियल टाइम हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर, १४ स्पोर्ट मोड्स, स्मार्ट नोटिफिकेशन्स, म्युझिक आणि कॅमेरा कंट्रोल्स सुदधे देण्यात आले आहेत! याची किंमत ३९९९ असून हे स्मार्ट घडयाळ realme.com, फ्लिपकार्टवर ५ जून दुपारी १२ पासून उपलब्ध होणार आहे. त्यानंतर लवकरच ऑफलाइन दुकानांमध्येही उपलब्ध होईल.

realme Buds Air Neo : वायरलेस इयरबड्स साठी आणखी एक पर्याय आणला असून यामध्ये इन्स्टंट ऑटो रिकनेक्ट, टच कंट्रोल, १७ तासांचा प्ले बॅक अशा सुविधा आहेत. याची किंमत २९९९ असून हे इयरबड्स realme.com, फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. त्यानंतर लवकरच ऑफलाइन दुकानांमध्येही उपलब्ध होईल. याचा पहिला सेल आज दुपारी ३ वाजता होणार आहे.

realme PowerBank 2 : ही 10000mAh क्षमता असलेली पॉवरबँक आता 18W Two Way Quick Charge k Charge सह मिळणार आहे. यामध्ये एक यूएसबी पोर्ट Type A तर दुसरा Type C आहे. एकावेळी दोन्ही पोर्टद्वारे फास्ट चार्जिंग होईल! याची किंमत ९९९ असून हे इयरबड्स realme.com, फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. त्यानंतर लवकरच ऑफलाइन दुकानांमध्येही उपलब्ध होईल. याचा पहिला सेल आज दुपारी ३ वाजता होणार आहे.

Search Terms : realme Smart TV, Smart Watch, Powerbank 2, Buds Air Neo launched in India. Check price, sale dates in india

Tags: EarphonesPowerbankrealmeSmart TVSmart WatchesTVWatches
Share8TweetSend
Previous Post

फेसबुक शॉप्स : ऑनलाइन दुकानांसाठी येतोय नवा पर्याय!

Next Post

Sony ZV-1 सादर : व्लॉगर्स, यूट्यूबर्स व क्रिएटर्ससाठी नवा पर्याय!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Next Post
Sony ZV1 Vlogging Camera

Sony ZV-1 सादर : व्लॉगर्स, यूट्यूबर्स व क्रिएटर्ससाठी नवा पर्याय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech