MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

गूगल क्लासरूम आणि मीटमध्ये नव्या सोयी : आता मराठी भाषेच्या सपोर्टसह!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 23, 2020
in इंटरनेट, ॲप्स
Google Classroom Meet

सध्याच्या काळात अनेक शाळा, कॉलेजेसनी त्यांचे ऑनलाइन क्लास सुरू केले आहेत. यासाठी प्रामुख्याने वापरला जाणारा पर्याय म्हणजे गूगल मीट. शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी गूगलची Google Classroom ही सेवासुद्धा अनेक शाळांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. तर गूगलने काही दिवसांपूर्वी या गोष्टीचा आणखी चांगल्या प्रकारे वापर करता यावा यासाठी यामध्ये नव्या सोयींचा समावेश केला आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही वापरण्यास अधिक सोपं होईल.

Google Classroom : गूगल क्लासरूममध्ये आता मराठीसह दहा भाषांचा सपोर्ट जोडण्यात आला आहे. आता एकूण ५४ भाषांना गूगल तर्फे या सेवेत सपोर्ट आहे. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना मराठीतसुद्धा सहज शिकवता आणि समजावता येईल. (https://classroom.google.com)
बरेच यूजर्स या माध्यमात नव्याने आले आहेत त्यांना सोपं जावं यासाठी सहज वापरता येणाऱ्या To Do List जोडण्यात आल्या आहेत. या विजेटसमुळे विद्यार्थ्याना करावयाच्या गोष्टींची यादी दिसेल तर शिक्षकांना तपासण्यासाठीच्या गोष्टींची यादी दिसेल! Assigned, Missing व Done असे विभाग असतील ज्यामध्ये दोघेही दिलेल्या, पूर्ण केलेल्या व अपूर्ण अशा गोष्टी पाहू शकतील.

ADVERTISEMENT

गूगल क्लासरूम जॉइन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या लिंक्स शेयर करणं आता आणखी सोपं करण्यात आलं असून या Invite लिंक्स आता व्हॉट्सअॅप व टेलिग्रामसुद्धा शेयर करता येतात!

Google Meet : गूगल मीटमध्येही अनेक नवे पर्याय येत आहेत. यामुळे admin असलेल्या व्यक्तींना सहभागी होणाऱ्यावर आणखी चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येईल. खालील सोयी सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होत आहेत.

  • एखाद्या सदस्याला दोन वेळा मनाई केली असेल किंवा काढून टाकलं असेल तर त्यांनी परत जॉइन होता येणार नाही.
  • क्लास पूर्ण झाला की मीटिंग सर्वांसाठीच बंद होईल
  • जॉइन रिक्वेस्ट आता एकाचवेळी अनेकांची यादी पाहून manage करता येईल (in Bulk)
  • मीटिंगदरम्यान चॅट बंद करणे आणि कोण प्रेझेंट करू शकतो यासाठी पर्याय
  • मॉडरेटर येइपर्यंत मीटिंग लॉक करणे
  • 7×7 ग्रिडमध्ये ४९ विद्यार्थी पाहू शकाल.
  • ऑनलाइन व्हाइटबोर्ड सुद्धा येत असून यावर एकावेळी अनेक विद्यार्थी काम करू शकतील.
  • लवकरच Polls घेण्याचीही सोय जोडण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांपैकी कोणी कोणी उत्तरे दिली कुणी बरोबर उत्तरे दिली हे लगेच समजेल.
  • Hand-raising ऑनलाइन वर्गाततही कोणत्या विद्यार्थ्याला शंका आहे हे समजेल.

अधिक माहिती : https://www.blog.google/outreach-initiatives/education/the-anywhere-school-meet-classroom-updates

Tags: EducationGoogleGoogle ClassroomGoogle Meet
ShareTweetSend
Previous Post

फेसबुक AI मुळे MRI स्कॅन मिळणार अवघ्या काही मिनिटांत!

Next Post

Moto G9 स्मार्टफोन भारतात सादर : ट्रिपल कॅमेरा SD662 प्रोसेसर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post
Moto G9

Moto G9 स्मार्टफोन भारतात सादर : ट्रिपल कॅमेरा SD662 प्रोसेसर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech