MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, एयर, मॅक मिनी जाहीर : आता ॲपलचा स्वतःचा प्रोसेसर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 11, 2020
in कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स
0
ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, एयर, मॅक मिनी जाहीर : आता ॲपलचा स्वतःचा प्रोसेसर!

WWDC 2020 वेळी जाहीर केल्याप्रमाणे ॲपलने इंटेलऐवजी स्वतः तयार केलेली ARM आधारित सिलिकॉन प्रोसेसर नव्या मॅकबुक्समध्ये जोडले आहेत. नव्या चिपचं नाव M1 असं देण्यात आलं याचा समावेश नव्या MacBook Air, MacBook Pro आणि Mac Mini मध्ये करण्यात आला आहे. या चिपमध्ये १६०० कोटी ट्रांजिस्टर असून 8 Core CPU आहे. नव्या मॅकबुक प्रोची भारतातली किंमत १२२९०० पासून सुरू होईल. मॅक मिनीची ६४९०० आणि मॅकबुक एयरची ९२९०० पासून सुरू होईल. ॲपलच्या वेबसाइटवर यांची प्रिऑर्डर सुरू झाली आहे.

ॲपलचे २०२० साठी उपलब्ध कम्प्युटर्स : सर्वात उजवीकडे मॅक मिनी

ॲपलची नवी ऑपरेटिंग सिस्टम macOS Big Sur १२ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे.

नवा मॅक मिनी आधीच्या मॅक मिनीपेक्षा ३ पट आधी वेगवान CPU असलेला आहे. ॲपलच्या म्हणण्यानुसार हा मॅक मिनी सध्याच्या प्रतिस्पर्धी विंडोज पीसीसोबत तुलना करता 1/10 आकाराचा असून ५ पट वेगवान आहे.

नव्या 13 inch MacBook Pro मध्ये ५ पट अधिक वेगवान ग्राफिक्स आहे. याची बॅटरी लाईफ १७ तासांची असेल असं सांगण्यात आलं आहे!

ॲपलने आज झालेल्या कार्यक्रमात बऱ्याचदा विंडोज पीसी पेक्षा अमुक पटीने वेगवान असं सांगितलं पण तुलनेसाठी त्यांनी कोणतं हार्डवेअर असलेला पीसी वापरला याची माहिती दिली नाही. केवळ सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पीसी पेक्षा वेगवान असं सांगण्यात आलं. आता तुलना करायची तर एखादी गोष्ट सर्वाधिक विकली जात असेल म्हणून ती त्या प्रकारची सर्वोत्तम वस्तू आहे असं म्हणता येत नाही. उदा. भारतात काही महीने शायोमीचे फोन्स सर्वाधिक विकले गेले म्हणून कोणी ते आयफोनपेक्षा चांगले आहेत असं म्हणेल का ? यामुळे ॲपलने कालच्या कार्यक्रमात काही प्रमाणात फसवं मार्केटिंग केलं हे उघड आहे. काही ग्राफ दाखवण्यात आले ज्यांना रेषांव्यतिरिक्त काही अर्थच नव्हता.

Tags: AppleMac MiniMacBookMacBook AirMacbook Pro
ShareTweetSend
Previous Post

पु. ल. देशपांडेंच्या जयंतीनिमित्त गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

Next Post

गूगल फोटोजमधील फ्री अनलिमिटेड बॅकअप बंद होणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपलचा iPad Pro 2020 : अनबॉक्सिंग व ओळख : मराठीत प्रथमच

नवा व्हिडिओ : ॲपलचा iPad Pro 2020 : अनबॉक्सिंग व ओळख : मराठीत प्रथमच

February 14, 2021
ॲपलचे ६० हजार रुपयांचे नवे हेडफोन्स : AirPods Max

ॲपलचे ६० हजार रुपयांचे नवे हेडफोन्स : AirPods Max

December 9, 2020
iPhone 12

ॲपल iPhone 12 : चार आयफोन्स सादर : आता बॉक्समध्ये चार्जर दिला जाणार नाही!

October 14, 2020
Apple Online Store India

ॲपल ऑनलाइन स्टोअर आता भारतात : २३ सप्टेंबरपासून होणार सुरू!

September 18, 2020
Next Post
गूगल फोटोजमधील फ्री अनलिमिटेड बॅकअप बंद होणार!

गूगल फोटोजमधील फ्री अनलिमिटेड बॅकअप बंद होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

March 6, 2021
नेटफ्लिक्सवर यावर्षी ४१ नवे टायटल्स : चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.

नेटफ्लिक्सवर यावर्षी ४१ नवे टायटल्स : चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.

March 5, 2021

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

नेटफ्लिक्सवर यावर्षी ४१ नवे टायटल्स : चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.

Redmi Note 10 फोन्स आता 120Hz डिस्प्ले, 108MP कॅमेरासह सादर!

सोशल मीडिया सोबत OTT साठीही सरकारचे नवे नियम !

नवा व्हिडिओ : सौर ऊर्जेचा वापर करून फोन चार्जिंग!

नासाचं पर्सिव्हिअरन्स मंगळावर : अनेक बाबतीत प्रथमच थेट मंगळावरून!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

error: Content is protected!