MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Android

अँड्रॉइड १२ अपडेट : अँड्रॉइडची नवी आवृत्ती चाचणीसाठी उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 19, 2021
in Android, ऑपरेटिंग सिस्टिम्स
Android 12 Update

गूगलने त्यांच्या कालपासून सुरू झालेल्या Google I/O या डेव्हलपर कार्यक्रमात अँड्रॉइडच्या नव्या आवृत्ती चाचणीसाठी उपलब्ध करून दिली आहे. नव्या आवृत्ती मध्ये नवा युजर इंटरफेस, अधिक सुरक्षा, अधिक प्रायव्हसी आणि सुधारित कामगिरी पाहायला मिळेल. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आता तब्बल ३०० कोटी उपकरणामध्ये वापरली जात आहे!

गूगलने आजवर त्यांच्या लोकप्रिय मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमच्या विविध आवृत्त्यांची नावे डेझर्ट्सवरून ठेवली होती. उदा. कपकेक, डोनट, फ्रोयो(2.0), जिंजरब्रेड(2.3), हनीकोंब (3.0), आईसक्रीम सँडविच(4.0), जेली बीन(4.1), किटकॅट(4.4), लॉलीपॉप(5.0), मार्शमेलो(6.0), नुगट(7.0), ओरीओ(8.0), पाय(9.0) नंतर Android 10, Android 11 आणि आता येणाऱ्या नव्या आवृत्तीचं अधिकृत नाव Android 12 असं असणार आहे. याबद्दल काल गूगलतर्फे अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

खाली दिलेल्या व्हिडिओ मधून तुम्हाला नव्या अँड्रॉइडमधील नव्या डिझाईनचा अंदाज येईल. स्वाईप डाऊन केल्यावर येणाऱ्या कंट्रोल्समधील नेहमीच्या गोल बटनांऐवजी आता मोठी आडवी बटणे पाहायला मिळतील. यामुळे फोनचा वापर आणखी सोपा होईल असं गूगलचं म्हणणं आहे.

आत्ता ही आवृत्ती अॅप डेव्हलपर्सनी त्यांचे ॲप्स डेव्हलप करण्यासाठी वापरणं सोपं जावं म्हणून दिलेली असते. या प्रीव्यू आवृत्त्या ह्या डेव्हलपरद्वारे करण्यात येणाऱ्या चाचण्यांसाठीच असतात. सामान्य यूजर्सनाही या इंस्टॉल करता येत असल्या तरी शक्यतो त्या फंदात पडू नये कारण यामुळे तुमच्या फोनमधील डेटा जाऊ शकतो किंवा फोन बिघडू सुद्धा शकतो.

आपल्यासाठी फक्त येणाऱ्या अँड्रॉइडमध्ये काय सुविधा असू शकतील याचा अंदाज येईल यादृष्टीने माहिती मिळते. सामान्य यूजर्ससाठी हे अपडेट आणखी काही महिन्यांनी त्यांच्या कंपनीने उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या फोनवर उपलब्ध होईल.

अँड्रॉइड १२ मधील नव्या सुविधा

  • new UI for Android : अँड्रॉइड १२ मध्ये आपल्याला बऱ्यापैकी नवीन डिझाईन पाहायला मिळेल. गेली दोन-तीन व्हर्जन्समधील डिझाईन सारखच होतं मात्र यावेळी ते बदलण्यात आलं आहे. विजेट्स, ट्रान्झिशन्स, रंग, आकार अशा अनेक गोष्टी मध्ये नावीन्य दिसून येईल.
  • Performance : नव्या अँड्रॉइड १२ ची कामगिरी सुद्धा बरीच सुधारलेली असणार आहे. ॲप्स आता आणखी लवकर उघडतील.
  • Custom Theming : आपल्या आवडीनुसार पूर्ण फोनच्या सिस्टमचे रंग बदलता येतील.
  • Privacy Dashboard : याठिकाणी आपल्याला कोणत्या ॲप्सना कोणती परवानगी दिली आहे आणि त्यांचा कसा वापर होत आहे हे ते समजेल.
  • आता प्रायव्हसीसाठी ज्यावेळी आपला कॅमेरा किंवा माइक वापरला जात असेल त्यावेळी नोटिफिकेशन बार वर एका ठिपक्याद्वारे ते समजेल.
  • आता आपल्या अँड्रॉइड फोनद्वारे क्रोमबुक अनलॉक करता येईल.

Search Terms : Android 12 beta is now live What’s new in Android 12 Beta Google I/O 2021

Via: Android
Tags: AndroidAndroid 12DevelopersGoogle I/OOperating Systems
ShareTweetSend
Previous Post

नवं पब्जी ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’चं प्रि रजिस्ट्रेशन सुरू!

Next Post

आता फोर्डचा F-150 इलेक्ट्रिक ट्रक : ही गाडी घराला तीन दिवस वीज पुरवू शकते!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Crowdstrike BSOD Windows

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

July 19, 2024
Next Post
Ford F150

आता फोर्डचा F-150 इलेक्ट्रिक ट्रक : ही गाडी घराला तीन दिवस वीज पुरवू शकते!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech