MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Android

अँड्रॉइड एम व गूगल I/O इवेंट बद्दल

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 29, 2015
in Android, ऑपरेटिंग सिस्टिम्स
ADVERTISEMENT
काल रात्री गूगलच्या I/O २०१५ कार्यक्रमात  अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनचा डेवलपर प्रीव्यू सादर केला गेला. गूगलने अँड्रॉइड एम मध्ये नव्याने जोडलेल्या फीचर्स बद्दल डेमो दिले. ह्या व्हर्जनचं नक्की नाव अजून जाहीर करण्यात आलेल नाही . (उदा. अँड्रॉइड लॉलीपॉप). मात्र नव्या व्हर्जन मध्ये करण्यात आलेले बदल जाहीर केले गेले. आणि हे सर्व बदल नक्कीच अँड्रॉइड यूजरचा अनुभव सुखावणारे आहेत. 
कार्यक्रम हॉलच्या तीन भिंती व्यापून टाकणार्‍या मोठ्या स्क्रीनवर ह्या कार्यक्रमाचे डेमो दिले गेले.  
आजच्या लेखात आम्ही सर्वच प्रॉडक्ट बद्दल थोडी माहिती देत आहोत… 

अँड्रॉइड एम :  अँड्रॉइड OS चं नवं व्हर्जन. अधिक फीचर्ससह आणखी चांगला अनुभव 

  • Permission मॅनेजमेंट सेक्युरिटी : आजपर्यंत तुम्ही एखाद App डाऊनलोड केल तर त्यात केवळ कोणत्या permission लागणार आहेत ते दाखवलं जायचं मात्र नव्या अँड्रॉइडमध्ये आपल्याला कोणत्या App ला कोणती Permission द्यायची आहे ते सुद्धा कंट्रोल करता येईल. उदा. आपण WhatsApp वरून ऑडिओ मेसेज रेकॉर्ड करणार असू तर अँड्रॉइड आपल्याला WhatsApp च्या App ला परवानगी द्यावी का नको ते विचारेल. यामुळे आपला डाटा विनाकारण लिक होण्यापासून संरक्षण होईल. हे फीचर अँड्रॉइड साठी नक्कीच गरजेचं होत. 
  • Now On Tap : आजपर्यंत गूगल नाऊ वार सर्च करण्यासाठी गूगल App उघडाव लागे मात्र आता ह्या नव्या फीचर मुळे आपण कोणत्याही App मध्ये असताना  Now On Tap वापरता येईल. समजा तुम्ही WhatsApp वर चॅट करताना एखाद्या चित्रपटाचा उल्लेख आला आणि तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर ब्राऊजर मध्ये जाऊन सर्च करण्याऐवजी या सुविधेमुळे त्याच app मध्ये सर्च करता येईल!
  • “Doze” for battery : ह्या फीचर मुळे अँड्रॉइड फोनची बॅटरी अधिक काळ टिकण्यास मदत होईल. गूगलच्या म्हणण्यानुसार ह्या फीचरमुळे लॉलीपॉपपेक्षा जवळपास दुप्पट काळ बॅटरी टिकेल!
  • USB Type C : ह्या नव्या यूएसबी पोर्टमुळे चार्जिंग वेगाने होईल. तसेच हा USB दोन्ही बाजूने वापरता येत असल्यामुळे उलट किंवा सुलट पिनची अडचण राहणार नाही.   
  • अँड्रॉइड Pay : काही काळापूर्वी अॅपलने अॅपल पे नावाची सुविधा आणली आहे. त्याच धर्तीवर गूगलने अँड्रॉइड पे सादर केली आहे. ज्यामुळे आपल्याला दुकानात ज्याठिकणी NFC/Android लोगो आहे तिथे डायरेक्ट आपल्या फोन द्वारे पेमेंट करता येईल. आणि हे पेमेंट कन्फर्म करण्यासाठी आपल्या बोटांच्या ठशाचा सुद्धा वापर करता येईल. गूगलने फिंगरप्रिंट सेन्सरला सुद्धा सपोर्ट जाहीर केलाय. 
Google Cardboard
गूगल कार्डबोर्ड  : हा स्वस्तात मस्त असा VR व्यूअर गेल्या वर्षी सादर करण्यात आला होता. आपला फोन वापरुन व काही पुठ्ठ्यांना जोडून हा व्यूअर घरीदेखील तयार करता येतो. यावेळी त्यांनी YouTube ल सोबत घेऊन कार्डबोर्डल अधिक भन्नाट बनवलं आहे! हा बनवण्यासाठी केवळ 500 रुपये खर्च येतो. 
(याविषयी आम्ही लवकरच स्वतंत्र  लेख लिहू .. )  
Jump :  आता जगातली प्रेक्षणीय स्थळं घरबसल्या पाहता येतील आणि तेही तेथे असल्याचा अनुभव घेत! या स्थळांच्या सफरीसाठी त्यांनी नवा कॅमेरा सेट बनवला आहे तो देखील GoPro या प्रसिद्ध कॅमेरा कंपनीसोबत! 
या डिवाइस द्वारे विडियो शूट करून तो यूट्यूबवर पाहता येतो आणि कार्डबोर्डसोबत हा अनुभव एकदम जीवंत वाटेल.   

गूगल फोटोज : गूगलने काळ आणखी एक नवी फोटो आणि विडियो सर्विस सुरू केली आहे. ज्याद्वारे आपल्याला आपले फोटो स्टोर करता येतील आणि तेसुद्धा अनलिमिटेड ! यामध्ये आपले फोटोज अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येतील, ऑर्गनाइज करता येतील. ही सर्विस इतकी हुशार आहे की आपल्या फोटो कोणत्या प्रकारचा आहे ते सुद्धा ओळखते जसे की फ्लॉवर्स सर्च केल्यास सर्व फोटो मधून केवळ फुलांचे फोटो शोधून काढते! ही सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
लिंक : photos.google.com
गूगल मॅप्स : याआधी गूगल मॅपवर केवळ मॅप ऑफलाइन पाहन्यासाठी साठवता येत होता मात्र आता त्या ठिकाणच्या सर्व दुकाने, ATM, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, इ. माहिती सुद्धा ऑफलाइन साठवता येईल. आणि यासोबत Turn By Turn नॅविगेशन सुद्धा ऑफलाइन वापरता येणार आहे! ज्यावेळी इंटरनेट उपलब्ध नसेल त्यावेळी हे फीचर खूप उपयोगी पडेल. सोबतच आता मॅप आपल्याला आपल्या वस्तु कधी व कोठून घ्यायच्या याबद्दल देखील आठवण करून देईल. 
अँड्रॉइड वियर : या स्मार्टवॉच साठी असणार्‍या अँड्रॉइडसाठी सुद्धा गूगलने बराच नवीन बदल केले आहेत. आता तब्बल ४००० Apps ह्या OS साठी बनवले गेले आहेत. आता Gesture सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. सोबतच Always On apps, नवा लॉंचर, मॅप, एमोजी सपोर्ट 
   
क्रोमकास्ट : या डिवाइससाठी सुद्धा अनेक गोष्टी नव्या असतील. हे डिवाइस टीव्हील जोडून त्यावर इंटरनेटद्वारे माहिती पाहण्यासाठी वापरलं जातय. यावेळी गूगलने HBO Now उपलब्ध करून दिलय. गूगल प्लेच्या माध्यमातून ह्या सर्विस दिल्या जातील.    
Project Brillo : गूगलने Internet Of Things (IoT) मध्ये आपला सहभाग नोंदवत स्मार्ट घरांच्या निर्मितीसाठी हा नवा प्रोजेक्ट सादर केलाय. ज्याद्वारे आपल्या घरातील व आसपासच्या गोष्टी आपल्या फोनद्वारे नियंत्रित करता येतील जसे की दरवाजाच लॉक काढणे, इ….
या इवेंट आधी गूगलने 3D स्कॅन करणारा टॅब्लेट प्रोजेक्ट Tango देखील आता सर्वांना उपलब्ध करून दिला आहे. याची किंमत $512 आहे.   
Sundar Pichai 
कालच्या कार्यक्रमात गूगलच्या प्रमुख पदांवर असलेल्या भारतीयांची उपस्थिती ठळकपणे जाणवली. 
सुंदर पिचाई (SVP Google)
अपर्णा चेन्नपरगडा (DPM Google)
नील राव (गूगल मॅप इंजीनियर)    

   

Terms :Android M Marathi Maharashtra Google I/O USB type C Brillo IoT wear Pay Tango Cardboard HBO permission 

Tags: AndroidCardboardChromecastDevelopersEventsGoogleMapsOperating SystemsPayments
ShareTweetSend
Previous Post

गूगल क्रोमबूक, मोबाइलची घटलेली विक्री व इतर प्रोडक्टस …

Next Post

अॅपल कीनोट : WWDC 2015

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
Google Bard Marathi

गूगलचा Bard AI आता मराठीतसुद्धा उपलब्ध!

July 16, 2023
Next Post

अॅपल कीनोट : WWDC 2015

Comments 2

  1. dipak kumbhar says:
    8 years ago

    Hi os junya phone var update honaar ka?

    Reply
  2. sbagal says:
    8 years ago

    ह्या OS चा फक्त प्रीव्यू सादर झालाय फक्त काही nexus डिवाइस वरच तो उपलब्ध आहे. येत्या काही महिन्यात हाविषयी अधिक माहिती मिळेल. पण शक्यतो 512 MB पासून RAM असलेले फोन्स Android M ला custom ROM च्या माध्यमातून अपडेट करता येतील. अथवा Moto/Android One फोन नक्की अपडेट होतीलच

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!