MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

अँड्रॉइड नुगट 7.0 व्हर्जन अपडेट गूगल नेक्सससाठी उपलब्ध !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 24, 2016
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स, स्मार्टफोन्स

अँड्रॉइड फोन्ससाठी अगदी कमी काळातच नवं व्हर्जन उपलब्ध होणं ही काही नवी गोष्ट राहिली नाहीये. नव्या ओएस अपडेट सर्वप्रथम गूगलच्या स्वतःच्या नेक्सस फोन्स वर सादर केलं जातं. (Nexus 6P). त्यानंतर बाकीच्या कंपन्या त्यांच्या नव्या फोन्ससाठी ते व्हर्जन आणण्यासाठी प्रयत्न सुरू करतात, मात्र यात इतका वेळ जातो की तोपर्यंत अँड्रॉइडचं नवं व्हर्जन सादर झालेलं असतं. त्यातच अलीकडे कंपन्या अनेक फोन सादर करत असल्यामुळे प्रत्येक फोनसाठी अपडेट देणं अशक्यप्राय होऊन जातं आणि मग ग्राहकांच्या पदरी निराशा पडते. हा अनुभव कदाचित तुम्हाला सुद्धा आला असेल. यावर उपाय Custom ROM चा XDA Developers साइटवर त्या त्या फोनसाठी नवं व्हर्जन काही  हौशी डेवलपर्सकडून पुरवलं जातं. त्याविषयी नंतर कधीतरी :)…
नुगट जाहीर झालं तेव्हाची पोस्ट : अँड्रॉइडचं नवं व्हर्जन “नुगट”
 
आज जाणून घेऊया नुगटच्या फायनल व्हर्जनमध्ये कोणत्या खास सुविधा आहेत…

प्रथमतः “Android Nougat” चा उच्चार “अँड्रॉइड नुगट” असाच आहे. (याविषयी बरीच चर्चा झालीये 😉 )

ADVERTISEMENT

1. Multi Window : स्प्लिट स्क्रीन या सुविधेमुळे एकाच वेळी दोन अॅप्स वापरता येतील. जसे की स्क्रीनच्या अर्ध्या भागात Gmail दिसेल आणि बाकी अर्ध्या भागात क्रोम ब्राऊजर! ही सुविधा काही सॅमसंग आणि एलजी फोन्सवर बर्‍याच वर्षांपासून होती मात्र अँड्रॉइडतर्फे सपोर्ट नव्हता. आता सरळ अँड्रॉइडकडून सपोर्ट आल्यामुळे सर्वच फोन कंपन्या त्यांच्या फोन्समध्ये याचा समावेश करू शकतील!

2. Battery Life Doze Mode : अँड्रॉइड फोन्ससाठी बॅटरी लाइफ कायमच अडचणीचा भाग राहिला आहे. (याबाबतीत नेहमी नोकीयाची आठवण काढली जाते!). यावर काहीसा उपाय म्हणून लॉलीपॉपपासून डोझ मोडचा अँड्रॉइड मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. ज्यामुळे तुमचा फोन  स्थिर स्थितीत (Locked&idle) असेल तेव्हा फोन मधील अलार्मसारख्या अॅक्टिविटीसोडून बाकी सर्व अॅक्टिविटी तात्पुरत्या थांबल्या जातील जेणेकरून बॅटरीची बचत होईल. जेव्हा फोन आपण हातात घेऊन सुरू करू तेव्हा सर्व अॅक्टिविटी पूर्वपदावर येतील.

3. Quick Settings : नोटिफिकेशन ड्रॉवर खाली ओढल्यावर येणार्‍या सेटिंगला Quick Settings म्हणतात. यामधून आपण वायफाय, ब्लुटुथ, डाटा, फ्लॅशलाइट, इ. सुरू/बंद करू शकतो. आता हे सर्व पर्याय आपल्या आवडीनुसार Rearrange/Organize करता येतील. सोबतच नोटिफिकेशन पाहताना एक छोटी पट्टी दिसेल तिथे काही शॉर्टकट वापरता येतील.

4. Direct Reply : नोटिफिकेशनमधूनच रीप्लाय देता येण्याची खास सोय हेसुद्धा नुगट ओएसचं वैशिष्ट्य. समजा तुम्हाला जीमेल आणि व्हाट्सअॅपवर प्रत्येकी १० ईमेल/मेसेज आले असतील तर प्रत्येक मेसेजला नोटिफिकेशनमधेच वाचून रीप्लाय देता येतो!

5. Multi Locale Support : अनेक भाषांसाठी आधीपासून सपोर्ट जेणेकरून सर्च रिजल्ट्स सारख्या गोष्टी त्यात त्या भाषेत देणं सोपं होईल. सोबतच बाकी अॅप्लिकेशन्ससुद्धा यूजरच्या पसंतीच्या भाषेत उपलब्ध होतील.

6. Fast and Secure : आधीच्या अँड्रॉइड व्हर्जनपेक्षा नुगटचा वेग जास्त असल्याचा दावा गूगलने केला आहे. अर्थात यासाठी नवे फोन आणि नवे हार्डवेअर असणे फायदेशीर ठरणार आहे. सुरक्षिततेच्या बाबतीतसुद्धा अँड्रॉइडमध्ये बर्‍याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. जुने अँड्रॉइड व्हर्जन फोनमध्ये असणे म्हणजे हॅकर्सना आमंत्रण देण्यासारखे आहे.(होय बरेच जुने फोन हॅकर्सच्या हल्ल्यांना सहज बळी पडू शकतात, म्हणूनच अशा कंपनीचेच फोन्स घ्या जी अपडेट देत असते.)

7. Performance : नुगटमध्ये व्हल्कन (vulkan) नावाचं नवं फीचर आहे जो की एक API आहे ज्यामुळे अँड्रॉइड 3D ग्राफिक्समध्ये सुधारणा होते. अनेक कोअरचा प्रॉसेसर असलेल्या फोन्समध्ये गेमिंगसाठी हा नवा अनुभव ठरेल. यासोबतच अॅप्लिकेशन्स कशाप्रकारे चालतात यामध्ये देखील अनेक बदल घडवून आणले आहेत!
 
8. Virtual Reality : व्हर्च्युअल रिअॅलिटीसाठी गूगल स्वतःचा DayDream Virtual Reality VR लवकरच सादर करणार असून त्यासाठी अँड्रॉइडमध्ये सपोर्ट दिला गेला आहे. (व्हर्च्युयल रिअॅलिटी VR म्हणजे काय लेख वाचा).

9. Task Switch : ब्राऊजर वापरता वापरता त्यातील टेक्स्ट व्हाट्सअॅपवर पाठवायचा असेल तर फक्त ऑप्शनबटन दोन वेळा टॅप करा तुम्ही दुसर्‍या अॅपमध्ये जाल पुन्हा परत मागच्या अॅपमध्ये जायचे असेल तर पुन्हा ऑप्शन बटनवर दोनदा टॅप लगेच त्या अॅपमध्ये प्रवेश.

10. नव्या इमोजी : बर्‍याच जणांना ठाऊक नसेल की अँड्रॉइड, iOS, विंडोज अशा ओएसमध्ये इमोजीसाठी सपोर्ट असतो ! शक्यतो व्हाट्सअॅपमध्ये इमोजी वापरल्या जातात पण अँड्रॉइडच्या inbuilt इमोजीमुळे SMS, ईमेल मध्ये सुद्धा आपण इमोजी वापरू शकतो! यातच आणखी इमोजीची जोड नुगटमध्ये करण्यात आली आहे.

याविषयी MKBHD याचा व्हिडिओ पाहा  (प्रसिद्ध यूट्यूबर) : Android 7.0 Nougat Update!    

याआधीचा लेख : एसुस झेनफोन ३ फोन्सची मालिका सादर 

Tags: AndroidGoogleNexusNougatSmartphones
ShareTweetSend
Previous Post

एसुस झेनफोन ३ फोन्सची मालिका सादर

Next Post

व्हॉटसअॅप करणार तुमचा फोन क्रमांक फेसबुकसोबत शेअर : हे कसे थांबवाल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post

व्हॉटसअॅप करणार तुमचा फोन क्रमांक फेसबुकसोबत शेअर : हे कसे थांबवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech