एपेक्स लेजन्ड्स ही प्रसिद्ध बॅटल रॉयाल गेम आजपर्यंत पीसी आणि कॉन्सोल्सवरच उपलब्ध होती. आता या गेमची मोबाइल आवृत्ती आली असून गेले अनेक महिने या आवृत्तीची चाचणी सुरू होती सरतेशेवटी आजपासून ही गेम सर्वांसाठी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. iOS व अँड्रॉइड दोन्ही युजर्सना १७ मेपासून ही गेम डाउनलोड करता येईल.
सध्यातरी त्यांनी Pre Register चा पर्याय दिला असून आज सुद्धा ज्यांनी Pre Register चा पर्याय निवडला आहे त्यांना गेममध्ये खास गोष्टी मिळणार आहेत ज्या नंतर मोफत उपलब्ध नसतील. यामध्ये Bloodhound banner frame, Bloodhound banner pose, Founder’s badge, R99 Epic skin, इ गोष्टींचा समावेश आहे.
Download Apex Legends on Google Play Store: https://play.google.com/store/apps/details?id=com.ea.gp.apexlegendsmobilefps
Download Apex Legends for iOS: https://www.ea.com/games/apex-legends/apex-legends-mobile
खास मोबाइल आवृत्तीमध्ये Fade नावाचा लेजन्ड मिळणार असून याच्याकडेही इतराप्रमाणेच विशिष्ट शक्ती असणार आहे. हा Tier 25 वर पोहोचल्यावर अनलॉक होईल.
बाकी गेमप्ले बऱ्यापैकी पीसी आवृत्ती प्रमाणेच असून खास मोबाइल आवृत्तीवर खेळणं सोपं जावं यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. PUBG Mobile/BGMI चा कंटाळा आला असेल तर ही नवी बॅटल रॉयाल गेम नक्कीच खेळून पाहू शकता.