मेटाचं टेक्स्टवरून संगीत तयार करणारं AudioCraft AI उपलब्ध!

गेले काही महिने इमेजेस आणि व्हिडिओ तयार करणाऱ्या AI ने बरीच प्रगती केली आहे. Generative AI म्हणजे आपण दिलेल्या सूचनांनुसार कंटेंट तयार करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता. आता यामध्ये मेटा कंपनीसुद्धा वेगवेगळ्या टूल्ससह उतरत आहे. काल त्यांनी त्यांचं नवं AudioCraft AI मॉडेल सर्वांना उपलब्ध करून देत असल्याचं जाहीर केलं आहे.

ऑडिओक्राफ्टद्वारे तुम्ही तुम्हाला ज्या प्रकारचं संगीत तयार करून हवं आहे त्याचे वर्णन करणारे काही शब्द इनपुट म्हणून द्यायचे आणि तो AI काही क्षणात ते संगीत तयार करू देईल! MusicGen, AudioGen, and EnCodec या तीन स्वतंत्र AI मॉडेलवर आधारित AudioCraft गूगलच्या MusicLM चा स्पर्धक म्हणता येईल.

विशेष म्हणजे AudioCraft हे टूल Open Source करण्यात आलं आहे त्यामुळे याबद्दल संशोधन, चाचणी करणं पूर्णपणे मोफत असेल. याचा सोर्स कोड GitHub वर उपलब्ध आहे.

Exit mobile version