MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 21, 2023
in ॲप्स
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स नावाची नवी सोय आता तुमच्या सर्वांच्या फोनमध्ये उपलब्ध होत आहे. या सेवेद्वारे सेलेब्रिटी, व्यावसायिक, न्यूज मीडिया, कंपन्या, संस्था त्यांचे अपडेट्स/पोस्ट्स/व्हिडिओ प्रकाशित करू शकतील. या चॅनल्सना आपण फॉलो करून त्या त्या चॅनलचे अपडेट्स मिळवू शकतो. चॅनल्स आपल्या नेहमीच्या चॅटपासून स्वतंत्र अशी वेगळी सेवा आहे.

ज्यांनी चॅनल्स तयार केलं आहे त्या Admin ना तुमचा फोन नंबर दिसणार नाही आणि त्यांचा फोन नंबरसुद्धा तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे दोघांची माहिती एकमेकांपासून गोपनीय राहील. चॅनल Admin ना तुमच्या प्रायवसी सेटिंगनुसार तुमचं नाव मात्र दिसू शकेल.
Verified सेलेब्रिटी आणि बिझनेसेससमोर हिरव्या रंगाचं टिक दिसेल. हे टिक सध्यातरी मेटा कंपनी त्यांच्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मतर्फे ठराविक लोकांनाच देत आहे.

ADVERTISEMENT

व्हॉट्सॲप चॅनल्स मध्ये खालील सुविधा आहेत.

  • Enhanced Directory – तुम्ही आता फॉलो करण्यासाठी चॅनल शोधू शकता जे तुमच्या देशाच्या आधारावर आपोआप फिल्टर केले जातात. तुम्ही फॉलोअरच्या संख्येवर आधारित नवीन, सर्वाधिक सक्रिय आणि लोकप्रिय असलेले चॅनल देखील पाहू शकता.
  • Reactions – अभिप्राय देण्यासाठी आणि एकूण प्रतिक्रियांची संख्या पाहण्यासाठी तुम्ही इमोजी वापरून प्रतिक्रिया देऊ शकता. तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ती फॉलोअरना दर्शवले जाणार नाही.
  • Editing – लवकरच, ॲडमिन ३० दिवसांपर्यंत त्यांच्या अपडेटमध्ये बदल करू शकतील.
  • Forwarding – जेव्हा तुम्ही चॅट्स किंवा ग्रुप्सवर अपडेट फॉरवर्ड करता तेव्हा त्यात परत चॅनलची एक लिंक समाविष्ट असेल जेणेकरून लोक अधिक माहिती जाणून घेऊ शकतील.

तुम्हीसुद्धा स्वतःचं चॅनल तयार करू शकता. Updates च्या Channels विभागात जाऊन + चिन्हावर टॅप केल्यावर Create Channel चा पर्याय दिसेल त्याद्वारे तुमच्या चॅनलचं नाव आणि प्रोफाइल पिक्चर सेट केलं की तुमच चॅनल तयार होतं! याची लिंक शेयर करण्याचा पर्यायसुद्धा दिसेल. सध्या चॅनल तयार करण्याचा पर्याय सर्वांना उपलब्ध झालेला नाही. काही दिवसात होईल.

WhatsApp Business मध्येही आता अनेक नव्या सोयी मिळणार आहेत.

Faster Chat Experiences with Flows : WhatsApp Flows द्वारे तुमची ट्रेनमधील सीट निवडणे, जेवण ऑर्डर करणे किंवा अपॉइंटमेंट बुक करणे अशी कामे करता येतईल. यासाठी तुमच्या चॅटमधून बाहेर पडावे लागणार नाही. Flows द्वारे बिझनेसेस मेनू आणि वेगवेगळ्या बुकिंगसारख्या सेवा देऊ शकतील. येत्या आठवड्यांमध्ये WhatsApp Business प्लॅटफॉर्म वर Flow उपलब्ध होईल.

पेमेंटसाठी आता अनेक पर्याय : WhatsApp Business मध्ये पैसे देण्यासाठी आता UPI च्या विविध Apps क्रेडिट/डेबिट कार्ड, नेटबँकिंगचाही पर्याय मिळेल. यासाठी त्यांनी RazorPay आणि PayU सोबत भागीदारी केली आहे.

Tags: AppsWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Next Post

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Best of 2024 Play Store

गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 12, 2024
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Next Post
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech