MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 10, 2026
in News
iPhone Duo

ॲपलने ९ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या कार्यक्रमात त्यांचा पहिला घडी घालता येणारा Apple Duo फोन सादर केला आहे सोबतच iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max व ॲपल Watch Series 12, ॲपल Watch Ultra 4 आणि AirPods 5 सादर केले. यावेळी ॲपलने कॅमेरा, बॅटरी, Health Tracking आणि ॲपल Intelligence यावर विशेष भर दिला आहे.

iPhone Duo: Appleचा पहिला Foldable iPhone

यावेळी ॲपलने iPhone Duo नावाने आपला बहुप्रतीक्षित Foldable iPhone सादर केला आहे. Fold झाल्यावर हा फोन नेहमीच्या आयफोनसारखा कॉम्पॅक्ट राहतो तर उघडल्यानंतर मोठ्या स्क्रीनचा अनुभव मिळतो. ॲपलने याच्या डिझाइनमध्ये पातळपणा आणि टिकाऊपणावर विशेष लक्ष दिले असून मोठ्या डिस्प्लेचा फायदा मल्टीटास्किंग, व्हिडिओ पाहणे आणि गेमिंगसाठी होऊ शकतो.

ADVERTISEMENT

iPhone Duo मध्ये iOS आणि Apple Intelligence चा Foldable स्क्रीनसाठी खास पद्धतीने वापर करण्यात आला आहे. त्यामुळे Appleच्या पारंपरिक iPhone अनुभवासोबत मोठ्या स्क्रीनची सुविधा एकाच डिव्हाइसमध्ये मिळते. सॅमसंगच्या फोल्ड सिरीजला ॲपलचं हे उत्तर आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये ॲपलने त्यांच्या शैलीत स्वतःच्या ओएस आणि इतर गोष्टी फोल्ड फोनच्या दृष्टीने जोडल्या आहेत.

डिस्प्ले: 7.8-इंच Foldable OLED मुख्य डिस्प्ले, कव्हर डिस्प्ले: 5.5-इंच बाहेरील OLED डिस्प्ले, प्रोसेसर: Apple A20 Pro, मुख्य कॅमेरा: 48MP Dual-Camera Setup, फ्रंट कॅमेरा: 24MP, RAM: 12GB, स्टोरेज: 256GB, 512GB आणि 1TB, बॅटरी: 5,500mAh, वॉटर/डस्ट रेसिस्टन्स: IPX8, वजन: सुमारे 240 ग्रॅम

आयफोन ड्युओची भारतीय किंमत : ₹2,99,000 (256GB) पासून सुरू

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सादर

ॲपल ने यंदाच्या Pro lineup मध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सादर केले आहेत. दोन्ही फोनमध्ये नवीन A20 Pro chip देण्यात आली असून कॅमेरा, performance आणि बॅटरी लाईफमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

iPhone 18 Pro आणि Pro Max मध्ये 48MP Fusion Main camera देण्यात आला आहे. यावेळी मुख्य कॅमेऱ्यात Variable Aperture तंत्रज्ञान आले आहे. त्यामुळे फोटो काढताना aperture वर अधिक नियंत्रण मिळते आणि वेगवेगळ्या प्रकाश परिस्थितीत कॅमेरा अधिक flexible होतो.

कॅमेरा ॲपमध्ये नवीन Pro Controls देण्यात आले आहेत. यामुळे प्रोफेशनल युजर्सना फोटो आणि व्हिडिओ शूट करताना अधिक manual control मिळतो.

iPhone 18 Pro चे प्रमुख फीचर्स

  • A20 Pro chip
  • 48MP Fusion Main camera
  • Variable Aperture camera system
  • नवीन Pro Controls
  • अधिक चांगली battery life
  • अधिक प्रभावी cooling system
  • छोटा आणि अधिक उपयोगी Dynamic Island
  • iOS 27 आणि ॲपल Intelligence
  • नवीन black, silver, glacier आणि burgundy रंग

iPhone 18 Pro Max मध्ये ॲपल ने बॅटरी लाईफमध्ये विशेष सुधारणा केली आहे. कंपनीच्या मते, हा आयफोनच्या इतिहासातील बॅटरी लाईफमधील सर्वात मोठी सुधारणा आहे.

iPhone 18 Pro ची किंमत आणि उपलब्धता

iPhone 18 Pro ची सुरुवातीची किंमत ₹1,64,900 तर iPhone 18 Pro Max ची किंमत ₹1,79,900 आहे. मागील Pro मॉडेलच्या तुलनेत दोन्ही फोनच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Pre-orders १२ सप्टेंबरपासून सुरू होतील आणि विक्री १८ सप्टेंबरपासून सुरू होईल. भारताचाही पहिल्या टप्प्यातील उपलब्ध देशांमध्ये समावेश आहे.

ॲपल Watch Series 12 मध्ये Health Tracking वर भर

ॲपल ने ॲपल Watch Series 12 देखील सादर केले आहे. या मॉडेलमध्ये नवीन Health Sensing System आणि S11 chip देण्यात आली आहे. यामध्ये heart rate आणि Heart Rate Variability म्हणजेच HRV अधिक वारंवार मोजली जाते. या डेटाच्या आधारे नवीन Readiness Score देण्यात येतो. हा score 0 ते 10 दरम्यान असतो आणि त्या दिवसासाठी शरीराची तयारी किती आहे याचा अंदाज देतो. ॲपल Watch Series 12 मध्ये ॲपल Intelligence आधारित काही नवीन features देखील येत आहेत. यामध्ये Sound Recognition, Live Rewind आणि Siri Recap यांचा समावेश आहे.

ॲपल Watch Series 12 चे महत्त्वाचे फीचर्स

  • नवीन Health Sensing System
  • S11 chip
  • अधिक अचूक heart rate sensing
  • अधिक वारंवार HRV measurements
  • नवीन Readiness Score
  • Sleep आणि fitness tracking
  • ॲपल Intelligence आधारित features
  • Siri AI
  • 42mm आणि 46mm sizes
  • Ceramic, aluminum आणि titanium options

Series 12 मध्ये नवीन Ceramic Shield 2 देखील देण्यात आले आहे. ॲपलच्या मते, हे मागील Ion-X glass पेक्षा ६० टक्के अधिक मजबूत आहे.याची किंमत भारतात ₹56,900 पासून सुरू होईल.

ॲपल Watch Ultra 4: अधिक battery आणि fitness features

ॲपल Watch Ultra 4 हे विशेषतः sports आणि adventure usersसाठी तयार करण्यात आले आहे. यामध्येही S11 chip आणि नवीन Health Sensing System देण्यात आले आहे. Ultra 4 मध्ये नवीन Readiness Score, अधिक वारंवार हार्ट रेट आणि HRV tracking तसेच सुधारित GPS देण्यात आले आहे. Outdoor workout tracking साठीही बॅटरी लाईफ वाढवण्यात आली आहे. सामान्य वापरामध्ये ॲपल Watch Ultra 4 ची battery life ५० तासांपर्यंत आहे.

ॲपल Watch Ultra 4 चे प्रमुख फीचर्स

  • S11 chip
  • नवीन Health Sensing System
  • अधिक अचूक heart rate sensing
  • 0 ते 10 Readiness Score
  • सुधारित on-device GPS
  • 50 तासांपर्यंत सामान्य battery life
  • Low Power Mode मध्ये 84 तासांपर्यंत battery
  • 45 तासांपर्यंत outdoor workout tracking
  • Natural आणि Black Titanium finishes
  • ॲपल Intelligence आणि Siri AI features

ॲपल Watch Ultra 4 ची सुरुवातीची किंमत ₹1,09,900 आहे. भारतासह अनेक देशांमध्ये pre-orders सुरू झाले असून विक्री १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

AirPods 5 मध्ये ANC आणि Live Translation

ॲपल ने AirPods 5 देखील लाँच केले आहेत. विशेष म्हणजे open-ear design कायम ठेवत यावेळी Active Noise Cancellation म्हणजेच ANC देण्यात आले आहे. AirPods 5 मध्ये नवीन multiport acoustic architecture आणि पुढील पिढीचे Adaptive EQ देण्यात आले आहे. ॲपलच्या मते, AirPods 4 च्या ANC मॉडेलच्या तुलनेत नवीन AirPods 5 बाहेरील आवाज 50 टक्क्यांपर्यंत अधिक कमी करू शकतात. AirPods 5 मध्ये Siri AI आणि Live Translation देखील महत्त्वाचे features आहेत. वापरकर्ते head gesturesच्या मदतीने Siriला प्रतिसाद देऊ शकतात. Live Translationच्या मदतीने वेगवेगळ्या भाषांमध्ये संभाषण समजून घेणे सोपे होऊ शकते.

AirPods 5 चे महत्त्वाचे फीचर्स

  • Open-ear design
  • Active Noise Cancellation
  • Adaptive Audio
  • Transparency Mode
  • Conversation Awareness
  • Siri AI
  • Live Translation
  • सुधारित sound quality
  • अधिक चांगले dust, sweat आणि water resistance

AirPods 5 ची सुरुवातीची किंमत ₹14,900 आहे. Wireless Charging Case असलेल्या मॉडेलची किंमत ₹17,900 आहे. दोन्ही मॉडेल्सची विक्री १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

ॲपलच्या नव्या उत्पादनांमध्ये AI वर विशेष भर

या वर्षी ॲपलच्या जवळपास प्रत्येक मोठ्या उत्पादनात ॲपल Intelligenceचा वापर वाढवण्यात आला आहे. iPhone 18 Pro मध्ये Siri AI आणि personal context आधारित फीचर्स आहेत. ॲपल Watch Series 12 आणि Ultra 4 मध्ये Audio Intelligence features देण्यात आले आहेत. AirPods 5 मध्येही Siri AI आणि Live Translation चा वापर करता येतो.

यामुळे ॲपलचा भर फक्त हार्डवेअर अपग्रेडवर नसून iPhone, Watch आणि AirPods यांना एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यावरही आहे.

ShareTweetSend
Previous Post

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech