MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

WhatsApp Communities : व्हॉट्सॲपची नवी सोय : अनेक ग्रुप्सचं एकत्र नियंत्रण!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 14, 2022
in ॲप्स
WhatsApp Communities

व्हॉट्सॲपने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांनी अनेक नव्या सोयी जोडत असल्याचं जाहीर केलं असून यामधील मुख्य सोय म्हणजे WhatsApp Communities. अनेक ग्रुप्स एकत्र करून ते नियंत्रित करणं आता एकदम सोपं होणार आहे. याशिवाय आता 2GB पर्यंतची साईज असलेल्या फाइल्स पाठवता येतील, ३२ लोकांचा ग्रुप कॉल करता येईल आणि मेसेजवर रिएक्शन्ससुद्धा देता येतील!

व्हॉट्सॲप कम्युनिटीज मुळे समजा एखादी शाळा असेल आणि ते प्रत्येक वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वेगवेगळे ग्रुप्समार्फत मेसेजद्वारे माहिती देत असतील तर आता त्यांना ते सर्व वर्गांचे ग्रुप एक कम्यूनिटी बनवता येईल ज्यामध्ये हे सर्व ग्रुप एकत्र दिसतील. मग यामध्ये खास टूल्स असतील जसे की सर्वाना एकाचे वेळी मेसेज करणे, ग्रुपमध्ये कोणाचा समावेश करायचा याचं नियंत्रण, इ.

ADVERTISEMENT

शाळेतील पालक, स्थानिक क्लब्ज, किंवा छोट्या कार्यालयांमध्येही आता लोकांना माहिती देण्यासाठी WhatsApp चा वापर केला जात आहे. या ग्रुप्सना सोशल मीडियापेक्षा वेगळ्या, पण ईमेल किंवा केवळ ब्रॉडकास्ट चॅनल पलीकडेही रिअल-टाईम संभाषण सुकर करणारी अधिक साधने पुरविणाऱ्या संपर्क साधण्याच्या खाजगी मार्गांची गरज आहे आणि त्यासाठीच व्हॉट्सॲप कम्युनिटीजची निर्मिती करण्यात आली आहे असं व्हॉट्सॲपतर्फे सांगण्यात आलं आहे. ही सोय सध्या थोड्या युजर्ससाठीच हळूहळू उपलब्ध करून देण्यात येत असून येणाऱ्या काळात सर्वांसाठी उपलब्ध होईल.

लवकरच व्हॉट्सॲपवर येणाऱ्या नव्या सोयी!

  • प्रतिक्रिया – लोकांना चॅटमध्ये वारंवार नवीन मेसेजेस न टाकताही आपले मत त्वरित मांडता यावे म्हणून WhatsApp वर इमोजी प्रतिक्रिया सादर केल्या जात आहेत.
  • ॲडमिनद्वारे हटवणे – ग्रुप ॲडमिन्स सर्व सदस्यांच्या चॅटमधील चुकीचे किंवा आक्षेपार्ह मेसेजेस काढून टाकण्यास सक्षम असतील.
  • फाइल शेअरिंग – लोकांना प्रोजेक्टमध्ये सुलभतेने सहयोग करता यावा म्हणून २ गिगाबाइट्सपर्यंतच्या फाइल्सना सपोर्ट करण्यासाठी आम्ही फाइल शेअरिंग वाढवत आहोत.
  • अधिक मोठे व्हॉइस कॉल्स – चॅटिंग पेक्षा प्रत्यक्ष बोलणे चांगले वाटत असेल अशा लोकांना आता जास्तीत जास्त ३२ लोकांना व्हॉइस कॉल करणे आम्ही सादर करणार आहोत त्यात पूर्णपणे नवीन डिझाइनचा समावेश आहे आणि जे फक्त एका टॅपने करता येईल.

पुढील मार्गदर्शक तत्वे अनुसरून व्हॉट्सॲप ग्रुप्सना व्हॉट्सॲपवर खाजगी आणि सुरक्षित पद्धतीने संवाद साधता यावा यासाठी काही अपडेट्स तयार आणत आहे.

  • अ‍ॅडमिनला अधिक सक्षम बनवणे
  • वापरकर्त्यांना त्यांच्या चॅटवर अधिक नियंत्रण देणे
  • आकार, शोधयोग्यता आणि फॉरवर्ड करण्यावर योग्य मर्यादा
  • एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि फोन नंबर गोपनीयता
  • गैरवर्तन करणाऱ्या कम्युनिटीजविरुद्ध कारवाई करणे

Search terms : What is WhatsApp Communities , How to use whatspp communities, now send large files in whatsapp upto 2GB, whatsapp message reactions

Via: WhatsApp Communities
Tags: AppsWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

रेडबसच्या redRail या नव्या ॲपद्वारे रेल्वे तिकीट बुकिंग करता येणार!

Next Post

Age of Empires मध्ये आता भारतीय राजघराण्यांचा समावेश!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Best of 2024 Play Store

गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 12, 2024
Next Post
Age Of Empires India

Age of Empires मध्ये आता भारतीय राजघराण्यांचा समावेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech