MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 3, 2022
in ॲप्स
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामने टिकटॉकची आणखी एक सोय उचलत आता रील्ससाठी असलेली ६० सेकंदांची मर्यादा वाढवून आता ९० सेकंद केली आहे. यासोबत त्यांनी मेटाने इंस्टाग्राम रील्स व फेसबुक रील्सवर बऱ्याच नव्या क्रिएटिव टूल्सचा समावेश केला आहे! आता इंस्टाग्रामवरील रील्समध्येही स्टोरीप्रमाणे विविध स्टीकर्स वापरुन प्रेक्षकांसोबत अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता!

इंस्टाग्राम रील्समध्ये उपलब्ध होणाऱ्या नव्या सोयी
  • ९० सेकंदांच्या रील्स : आधीच्या ६० सेकंदाची मर्यादा वाढवून आता ९० सेकंद करण्यात आली आहे.
  • रील्समध्येही स्टीकर्स वापरता येणार : आजवर स्टोरीमध्ये उपलब्ध असलेले विविध स्टीकर्स आता रील्समध्ये वापरुन पोल, क्विज, इ. गोष्टी करता येतील!
  • इम्पोर्ट ऑडिओ : स्वतःची ऑडिओ फाइल गॅलरीमधून इम्पोर्ट करून ती रीलला जोडता येईल.
  • Templates : एखादी आवडती रील पाहून त्यानुसार स्वतःच्या रील्स तयार करणं टेंप्लेट्समुळं सोपं होईल. तयार टेंप्लेट मध्ये आपला कंटेंट टाकून लगेच रील्स तयार करता येतील.

ADVERTISEMENT

आता फेसबुकवरसुद्धा रील्स टाकता येतात. त्यासाठी त्यांनी बरेच नवे पर्यायसुद्धा आज उपलब्ध करून दिले आहेत.

फेसबुक रील्समध्ये उपलब्ध होणाऱ्या नव्या सोयी
  • डेस्कटॉपवर रील्स तयार करा : iOS व अँड्रॉइडसह आता डेस्कटॉपवरील क्रिएटर स्टुडिओ मार्फत सुद्धा रील्स तयार करता येतील! शिवाय रील्स शेड्यूल म्हणजेच कधी पोस्ट करायची त्याची वेळसुद्धा सेट करून ठेवता येईल.
  • Clip to Reels : जे क्रिएटर जास्त लांबीचे व्हिडिओ प्रकाशित करतात त्यांच्यासाठी या नव्या टूलद्वारे छोट्या रील्स तयार करणं सहजशक्य होणार आहे.
  • नवे ऑडिओ टूल्स : साऊंड Sync सारख्या सोयी देण्यात येत असून यामुळे तुमच्या व्हिडिओ क्लिपमधील आवाजासोबत गाण्याची बीट आपोआप Sync केली जाईल. शिवाय वॉइसओव्हर देणंसुद्धा शक्य आहे!

💥 Upgrading Reels 💥

Starting today, you’ll be able to:

✅ Add polls, quizzes and emoji sliders like in Stories
✅ Create Reels using existing templates
✅ Make Reels up to 90 secondshttps://t.co/BR902jC9g6 pic.twitter.com/oHF52g2IUo

— Instagram (@instagram) June 2, 2022

Source: new Reels creative tools
Tags: AppsFacebookInstagramReels
ShareTweetSend
Previous Post

ब्रॉडकॉम कंपनी VMware ला ~४.७ लाख कोटी रुपयांना विकत घेणार !

Next Post

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
Apple iOS 16 macOS iPadOS

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

Comments 1

  1. Pallavi says:
    4 years ago

    वटपौर्णिमा कशी साजरी करावी आणि मनोरंजक माहिती नक्की वाचा.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech