MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 10, 2025
in Events
WWDC 2025 Marathi

ॲपलच्या काल WWDC या Cupertino येथे पार पडलेल्या त्यांच्या डेव्हलपर्ससाठी असलेल्या कार्यक्रमात अनेक नव्या गोष्टी जाहीर केल्या असून iOS 26, iPadOS 26, vision OS 26, macOS 26, watchOS 26, tvOS26 अशा ओएस अपडेट्स जाहीर झाल्या आहेत. यासोबत अनेक वर्षांनी ॲपलने त्यांच्या डिझाईन मध्ये बदल करत सर्वच उपकरणांमध्ये नवं Liquid Glass नावाचं डिझाईन आणत असल्याचं सांगितलं आहे. या डिझाइनमध्ये बटन्स, स्लायडर्स, टेक्स्ट आणि मीडिया कंट्रोल्स अधिक पारदर्शक आणि गोलाकार दिसतील, ज्यामुळे इंटरफेसमध्ये एक काचेसारखा अनुभव येईल!

ऍपलने आपल्या ऑपरेटिंग सिस्टम्सच्या नामांकरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता पूर्वीच्या नावांऐवजी, ऑपरेटिंग सिस्टम्सचे नाव थेट संबंधित वर्षाशी जोडले जाईल. त्यामुळे iOS 19 ऐवजी आता iOS 26, iPadOS 19 ऐवजी iPadOS 26, watchOS 12 ऐवजी watchOS 26, tvOS 19 ऐवजी tvOS 26, आणि visionOS 2 ऐवजी visionOS 26 असे संबोधले जाईल. macOS चे नाव मात्र कॅलिफोर्निया-प्रेरितच राहील, त्यामुळे ते macOS Tahoe 26 असे असेल. हे बदल वापरकर्त्यांना नवीन आवृत्त्या समजून घेणे सोपे करेल.

ADVERTISEMENT

iOS 26 मध्ये मिळणाऱ्या नव्या सोयी

  • Live Translation – Messages, FaceTime, voice calls साठी ऑन-डिव्हाइस लाइव्ह भाषांतर
  • AI‑आधारित Call Features – कॉल screening, Hold Assist, voicemail summary
  • Messages मध्ये बदल – chat background, ग्रुप चॅट मध्ये पोल्स
  • Genmoji & Image Playground – इमोजी मर्जिंग व AI‑जनरेटेड इमेजेससाठी नवीन सुविधा
  • Battery Insights – Adaptive Power mode आणि charging time estimates

iPadOS 26 मध्ये मिळणाऱ्या नव्या सोयी :

  • Mac सारखी सुविधा iPad वर – windowed multitasking, top menu bar, अधिक चांगलं आणि सोपं file management
  • नवीन iPadOS मॅकओएसप्रमाणे काम करेल, जिथे वापरकर्ते ॲप विंडोजना resize करू शकतील, त्यांना हवं तिथे ठेऊ शकतील आणि एकाच वेळी अनेक विंडोज उघडू शकतील. आता अधिक अचूक माऊस पॉइंटर आणि नवीन मेनू बार देखील जोडला जाईल.
  • आता पीडीएफफाइल्सवर लिहिता येणार आहे. सोबत नवी Preview नावाची सोय सुद्धा मिळेल.

macOS Tahoe 26 मध्ये मिळणाऱ्या नव्या सोयी :

  • ‘लिक्विड ग्लास’ डिझाइनसह, मॅकमध्येही ‘फोन’ ॲप मिळेल, ज्यामुळे आयफोन जवळ नसतानाही मॅकवरून सेल्युलर कॉल करणे सोपे होईल.
  • स्पॉटलाइटमध्ये आणखी सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे ते अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम बनेल.
  • फोल्डरना आता रंग आणि इमोजीसुद्धा सेट करता येतील
Tags: AppleEventsiOSiPadOSLiquid GlassMacOSWWDC
ShareTweetSend
Previous Post

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

Next Post

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
Apple Mac Mini iMac 2024

ॲपलचा नवा मॅक मिनी व iMac सादर : आता M4 व M4 Pro सह!

October 29, 2024
Next Post
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech