नथिंग कंपनीचा Nothing Phone 3 फोन सादर झाला आहे. हा फोन कंपनीचा पहिला खरा फ्लॅगशिप म्हणता येईल. यामध्ये आता त्यांच्या इतर फोन्समध्ये असलेल्या Glyph इंटरफेस यावेळी Glyph Matrix नाव असलेला छोटा डिस्प्ले आहे. यामध्ये ४८९ मायक्रो एलईडीचा वापर केला आहे.
या फोनमध्ये 6.67” flexible AMOLED, डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर, 50MP Main + 50MP Periscope + 50MP Ultrawide आणि 50MP फ्रंट कॅमेरा, 5500mAh बॅटरी, 65W Fast Charging, IP68, Nothing OS 3.5 based on Android 15 मिळेल. 12GB+256GB आणि 16GB + 512GB असे दोन पर्याय आहेत.

या फोनची किंमत ₹८४९९९ असून पहिल्या सेलमध्ये या फोनची किंमत ₹७९९९९ इतकी असेल . हा फोन ११ जुलै पासून फ्लिपकार्टवर मिळेल.
आधीच या फोनच्या डिझाईनवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती आणि त्यात त्यांनी याची किंमतसुद्धा बरीच जास्त ठेवली आहे. यामुळे आता ग्राहक किती प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल….