MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

‘गुगल’ला पाच अब्ज डॉलरचा दंड?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 13, 2014
in News
googleस्पर्धेच्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याप्रकरणी सर्च इंजिन क्षेत्रातील आघाडीच्या ‘गुगल’ला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ‘गुगल’चे व्यवहार ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ (सीसीआय) अर्थात स्पर्धा आयोगाच्या रडारवर आले असून, त्यात तथ्य आढळल्यास कंपनीला ५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. 

या पार्श्वभूमीवर ‘गुगल’शी संपर्क साधला असता, चौकशीदरम्यान ‘सीसीआय’शी पूर्ण सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचे स्प्ष्ट करण्यात आले. अमेरिकेतील स्पर्धा आयोगाने ‘गुगल’च्या मागील दोन वर्षांतील कारभाराचा आढावा घेतला असता, त्यात कंपनीची सेवा आणि उत्पादने स्पर्धेच्या नियमाला धरून असल्याचे म्हटले आहे. मात्र, ‘गुगल’ विषयीच्या तक्रारी भारतातून आल्या असल्याने अमेरिकन आयोगाचा निर्णय ग्राह्य धरण्यात येणार नाही. ‘गुगल’विषयी स्पर्धा आयोगाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्याचे म्हटले आहे. त्यातही गेल्या दोन वर्षांमध्ये तक्रारींचे प्रमाण वाढल्याचाही आयोगाचा दावा आहे. 

या तक्रारींमध्ये भारतात वर्चस्व मिळविण्यासाठी ‘गुगल’कडून नियमबाह्य प्रकारांचा अवलंब केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एखादी कंपनी स्पर्धेच्या अटी आणि शर्तींचा भंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास गेल्या तीन वर्षांच्या एकूण सरासरी उलाढालीच्या १० टक्के रकमेचा दंड करण्यात येतो. गेल्या तीन वर्षांत ‘गुगल’ची सरासरी एकूण उलाढाल ४९.३ अब्ज डॉलरच्या घरात आहे. त्यामुळे स्पर्धा आयोगाच्या नियमानुसार 

‘गुगल’ला दहा टक्क्यांप्रमाणे अंदाजे ५ अब्ज डॉलरचा दंड बसण्याची शक्यता आहे. ‘स्पर्धा आयोगाच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, आमचे व्यवहार आणि इतर सर्व बाबींना अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनने क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे,’ अशी माहिती ‘गुगल’च्या प्रवक्त्याने दिली. 
ADVERTISEMENT
Tags: AntiTrustCCIFineGoogleIndia
ShareTweetSend
Previous Post

आयफोनची ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 लॉन्च

Next Post

राजकीय पक्षांचेही वेबप्रचाराला ‘लाइक’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Next Post
राजकीय पक्षांचेही वेबप्रचाराला ‘लाइक’

राजकीय पक्षांचेही वेबप्रचाराला ‘लाइक’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech