MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

‘फेसबुक’च्या भात्यातही आता ‘हॅशटॅग’ #

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 16, 2013
in Social Media
face.jpgसोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘ फेसबुक ‘ ने वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अखेर ‘ हॅशटॅग ‘ ची घोषणा केली आहे. सध्या ‘ ट्विटर ‘, ‘ गुगल प्लस ‘ आणि ‘ इन्टाग्राम’ या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट्सवर सध्या ‘ हॅशटॅग ‘वापरले जातात. 

बुधवारपासूनच या सेवेला सुरुवात झाल्याची घोषणा ‘फेसबुक ‘ तर्फे करण्यात आली. ‘ हॅशटॅग ‘ मुळे ‘ फेसबुक ‘ च्या यूजरना ‘ फेसबुक ‘ वर सुरू असणाऱ्या एखाद्या चर्चेविषयी अथवा हॉट टॉपिकविषयी एका क्लिकवर जाणून घेता येणार आहे. # या चिन्हाचा वापर करून ही सुविधा वापरता येणार आहे. ‘ ट्विटर ‘ वर ही सुविधा लोकप्रिय असून , त्याद्वारे दिवसभरातील चर्चेचा विषय अथवा त्या विषयी माहिती मिळविता येते. आता ‘ फेसबुक ‘ यूजरनाही हॅशटॅगचा वापर करून या चर्चेत सहभागी होण्याची संधी एकाच पानावर मिळणार आहे. (उदाहरणार्थ..निवडणूक या विषयी ‘ फेसबुक ‘ पेजवर चर्चा सुरू असल्यास # ELECTION अशी पोस्ट टाकून यूजरला चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते.) 

‘ हॅशटॅग ‘ ची सुविधा म्हणजे ‘ यूजर फ्रेंडली इंटरफेस ‘ सुरू करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल असल्याचे ‘ फेसबुक ‘ ने म्हटले आहे. लवकरच आणखी फीचर्स सादर करण्यात येणार आहेत. मात्र , त्याचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. बुधवारी ही सुविधा सुरू करण्यात आल्यानंतर केवळ २० टक्के यूजरना त्याचा उपयोग करता आला. उर्वरित यूजरना येत्या आठवडाभरात ही सुविधा वापरता येऊ शकेल. 

‘ हॅशटॅग ‘ विषयी 

‘ फेसबुक ‘ यूजरनी ‘ हॅशटॅग ‘ वापरून पोस्ट केलेली माहिती कोण पाहू शकेल , हे फिल्टरचा वापर करून ठरवता येईल. केवळ फ्रेंड्सनाच ही चर्चा वाचता येईल , असे सेटिंगही करता येणार आहे.
ADVERTISEMENT
Tags: FacebookHashtags
ShareTweetSend
Previous Post

अॅमेझॉन.com भारतीय बाजारात

Next Post

गुगलची ‘वेझ’क्रांती

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
Instagram 90 Second Reel Stickers

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

June 3, 2022
Faceeook Reels Earn Money

Reels आता फेसबुकवरही उपलब्ध : पैसेसुद्धा कमावता येणार!

February 23, 2022
Next Post

गुगलची ‘वेझ’क्रांती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech