MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गुगलची ‘वेझ’क्रांती

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 17, 2013
in News
google.jpgजंगलामध्ये रस्ता हरवला, तर मदतीसाठी पूर्वी आरडाओरडा केला जायचा. माहितगार व्यक्ती होकायंत्राने दिशा शोधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायच्या . इंटरनेट क्रांतीनंतर मॅपचा आधार घेऊन दिशा शोधल्या जाऊ लागल्या . आपण नेमकेकोठे आहोत आणि कुठे जायचे आहे , याचे मार्ग मोबाईलवर दिसू लागले आणि अवघड वाटणारा प्रवास सोपा झाला . या सर्व तंत्रज्ञानाचे जनक म्हणजे गुगल , अॅपल , फेसबुकयांसारख्या कंपन्यांनी पुरवलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर अक्षरशः कोट्यवधी लोक करतात.

‘ गुगल ‘ ने या मॅपसंदर्भात नुकतेच एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे . त्यामुळे मॅपिंगच्या क्षेत्रातील चेहरामोहराच बदलला जाईल . मूळचे इस्रायलचे असणारे ‘ वेझ ‘ तंत्रज्ञान खरेदी करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे . १ . ३ अब्जडॉलरचा करार गुगलने यासाठी केला आहे . गुगलच्या यूजर्सची जगभरातील संख्या पाहिली , तर ‘ वेझ ‘ हीगुगलसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच ठरण्याची शक्यता आहे . यापूर्वी अब्जावधी डॉलरचा करार गुगलने तिघांबाबततच केला आहे . त्यात यू – ट्यूबचाही समावेश आहे . इस्रायलमधील भरघोस यशानंतर वेझ हे तंत्रज्ञान चार वर्षांपूर्वीच अमेरिकेत आले आहे . मोटारींना ट्रॅफिकमधून मार्ग दाखवणे , स्पीडलेन सांगणे , शॉटकट कुठेआहेत , अपघात कुठल्या रस्त्यावर झाले आहेत , धोक्याचे रस्ते कुठले आहेत , या सर्वांची कल्पना ड्रायव्हरलादेण्याचे काम ‘ वेझ ‘ करते . 

मोठे करार 

१५ वर्षांच्या इतिहासात गुगलने आतापर्यंत केलेल्या सर्वांत मोठ्या किमतीच्या २४० करारांपैकी ‘ वेझ ‘ चा क्रमांकचौथा लागतो . मोटोरोला मोबिलिटी – १२ . ४ अब्ज डॉलर , डबल क्लिक – ३ . २ अब्ज डॉलर आणि यू – ट्यूब- १ . ७६ अब्ज डॉलर हे तीन करार यापूर्वी केले आहेत . यू – ट्यूबसारख्या साइटचे भारतातील यश पाहता आगामी काळात वेझ तंत्रज्ञानही येथे झपाट्याने वापरले जाईल , याची खात्री वाटते . 

वेझचा १९० देशांमध्ये वापर 

‘ वेझ ‘ ने सांगितले आहे , की मॅपिंग तंत्रज्ञान १९० देशांमध्ये वापरले जाते . ट्रॅफिक जॅम , जॉब आणि इतरठिकाणी जाण्यासाठी सर्वांत जलद उपलब्ध रस्ता शोधण्यासाठी याचा वापर केला जातो . कंपनीचे ७० हजारसदस्य नकाशांचे संपादन करण्यावर काम करतात . नकाशांखेरीज विविध टिप्सही यामध्ये दिल्या जातात . वेझच्या आगमनाने गुगलचीही दोन वर्षांपूर्वीची ‘ प्लस ‘ नावाची सोशल नेटवर्किंग सर्व्हिस अपडेट होण्याची शक्यता आहे .
‘ गुगल ‘ चे भारतातील यूजर पाहता मॅपिंगच्या सुविधेचा येथेही मोठ्या प्रमाणावर केला जाईल . आपल्या देशातील वाहतुकीची समस्या पाहता ‘ वेझ ‘ मुळे ती दूर होईल , असे वाटत नाही ; पण दूरच्या प्रवासासाठी ,महामार्ग ठिकाणी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला , तरी नव्याने फिरणाऱ्यांच्या अनेक समस्या सुटण्यास हातभार लागेल , असे वाटते .

ADVERTISEMENT
Tags: DealsGoogleMapsWarWaze
ShareTweetSend
Previous Post

‘फेसबुक’च्या भात्यातही आता ‘हॅशटॅग’ #

Next Post

‘आयओएस ७’ अॅपलचा नवा प्लॅटफॉर्म

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post

‘आयओएस ७’ अॅपलचा नवा प्लॅटफॉर्म

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech