MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

‘विंडोज’मध्ये पुन्हा दिसेल ‘स्टार्ट बटन’

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 20, 2013
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स

webविंडोजच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सशी सगळेच परिचित आहेत .बहुतेक सगळेच जण ‘ विंडोज ‘ ची ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात . ‘ विंडोज व्हिस्टा ‘, ‘ विंडोज ७ ‘, ‘ विंडोज ८ ‘नंतर आता ‘ विंडोज ब्लू ‘ किंवा ‘ विंडोज ८ . १ ‘ येऊ घातलेआहे . विंडोजच्या आधीच्या व्हर्जनमध्ये असलेल्या उणीवा दूर करून नवीन व्हर्जन अधिक आकर्षक आणि यूझर फ्रेंडली करण्याची ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ची हातोटी आहे .
 पण , ‘ विंडोज८ ‘ च्या बाबतीत ही ‘ हातोटी ‘ तितकीशी यशस्वी झाली नाही . टच स्क्रीनची सुविधा नसलेल्या कम्प्युटरवर ही सिस्टीम तितकी समर्थपणे ऑपरेट झाली नाही आणि थेट डेस्कटॉपला बूट न होणे या बाबी अनेकांना पटल्या नाहीत . त्यामुळे किमान या दोन बाबींचे समाधान ‘ विंडोज ‘ने द्यावे , अशी मागणी यूझरकडून बराच काळ होत होती . 

ग्राहकांचा हा तक्रारींचा सूर ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ पर्यंत पोहोचला असावा . येऊ घातलेल्या ‘ विंडोज ब्लू ‘ मध्ये ‘ स्टार्टबटन ‘ पुन्हा दिसणार असल्याची चर्चा कम्प्युटर जगतात आहे . थेट डेस्कटॉपलाही बूट करता येणार आहे . या नव्या व्हर्जनमध्ये हे बदल होण्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे . खात्रीशीर वृत्त मात्र नाही . त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे , हे जाणून घेण्याचे कुतूहल ग्राहकांमध्ये आहे . मात्र , असा बदल झाला , तर तो ग्राहकांसाठी इष्टच आहे . असे झाले , तर कंपनीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे होईल , की मायक्रोसॉफ्ट ‘ बॅक फूट’ वर गेली आहे आणि पुन्हा एकदा यूझरच्या मागणीला अनुसरून आपल्या सिस्टीममध्ये ती पूर्वीप्रमाणे बदल करेल. 

नव्या व्हर्जनमध्ये पहिल्यांदा हे बदल प्रस्तावित नव्हते . पण , ते होण्याची दाट शक्यता आहे . वेगवेगळ्या माध्यमांतून गेल्या आठवड्यांपासून ही वृत्ते येत आहेत . ‘ मेट्रो स्टाइल ‘ मध्ये होणाऱ्या बूटिंगला फाटा देऊन थेट डेस्कटॉप बूटिंग यूझरना करता येईल , अशी सुविधा पुरवण्याकडे मायक्रोसॉफ्टची वाटचाल सुरू आहे . ‘ विंडोज ‘वर ‘ स्टार्ट बटन ‘ ही पुन्हा येण्याची शक्यता असल्याचे विविध सूत्रांनी सांगितले आहे . 

‘ विंडोज ब्लू ‘ चे उत्पादन या वर्षी कदाचित सुरुवात होईल . त्यावेळी हे दोन्ही बदल होतील , की नाही हे सर्वांना कळेलच . तत्पूर्वी काही अधिकृत घोषणा झाली , तर ग्राहकांसाठी उत्तमच ! ‘ विंडोज ८ ‘ चा यूझर इंटरफेस हा चांगला आहे . मात्र , टच स्क्रीन नाही , त्यांच्यासाठी ‘ विंडोज ‘ चे जुनेच व्हर्जन चांगले , असे सध्या म्हणावे लागत आहे . बरेचसे यूझर त्यामुळे जुन्याच व्हर्जन्सना पसंती देत आहेत . ‘ विंडोज ब्लू ‘ मधील नव्या बदलाने हा त्रास टळून विंडोज अधिक यूझर फ्रेंडली सिस्टीमचा वापर सर्वांना करता येईल , याची आशा बाळगूया . 

ADVERTISEMENT
Tags: FixesMicrosoftRedesignWindowsWindows 8
ShareTweetSend
Previous Post

ई-मेलचे मॅनेजमेंट

Next Post

मराठीटेक अॅप्लिकेशन आता Amazon App स्टोरवरती उपलब्ध

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Next Post
मराठीटेक अॅप्लिकेशन आता Amazon App स्टोरवरती उपलब्ध

मराठीटेक अॅप्लिकेशन आता Amazon App स्टोरवरती उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech