MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

बिल कमी करणारे ‘स्मार्ट’ अॅप्स’ स्कायपे निंबूझ वुई चॅट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 18, 2013
in ॲप्स
बिल कमी करणारे ‘ स्मार्ट ‘ अॅप्स ‘ 


एसएमएस , फोन कॉल्स , व्हिडीओ कॉल्स या सर्वांमुळे आपले मोबाइलचे बिलाचे आकडे इतक्या झपाट्याने वाढतात की , ते आपल्या लक्षातही येत नाहीत . पण आपला फोन स्मार्ट असेल तर आपण आपले बिल नक्कीच कमी करू शकतो . अँड्रॉइड किंवा आयओएसवर चालणाऱ्या अॅप्सची त्यासाठी मदत होईल . आपले बिल वाचविणारे काही अॅप्स … 

फ्री कॉलिंगला वाढती पसंती



स्कायपे 


तसं हे फेमस अॅप आहे . बहुतांश स्मार्टफोन यूजर्स हे अॅप वापरतच असतील . हे अॅप मोबाइल आणि डेस्कटॉप अशा दोन्हीकडे वापरता येऊ शकते . स्कायपेवरून आपण फ्री व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकते . यावरून आपल्याला फोन्स किंवा व्हिडीओ कॉल्स करायचे असतील तर आपल्या मित्रांचे किंवा कुटुंबीयांचे अकाऊंट त्यात अॅड करून घ्यावे लागते . यानंतर आपण त्या व्यक्तींना एक रुपयाही खर्च न करता फोन करू शकतो किंवा व्हिडीओ कॉलिंग करू शकतो . याचा वापर आपण इन्स्टंट मेसेंजिंगसाठीही करू शकतो. याद्वारे आपण फोटोही शेअर करू शकतो . Download Skype


निंबूझ 


इन्स्टंट मेसेंजिंग इंटीगेटर म्हणून सुरू झालेल्या निंबूझ या अॅपचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाआहे . हे अॅप आता कम्प्युटर , स्मार्टफोन आणि फीचर फोन यामध्ये वापरू शकतो . निंबूझ ते निंबूझ यूजरसोबतआपण व्हॉइस कॉल्स आणि व्हीडिओ कॉल्स करू शकतो . कम्प्युटर , अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियन याऑपरेटिंग सिस्टिमवरून आपण वॉइस कॉल्स करू शकतो तर आयओएस आणि कम्प्युटरवरून व्हिडीओ कॉल्सकरू शकतो . याशिवाय या अॅपवरून आपण चॅटिंगही करू शकतो . Download Nimbuzz


ओवू 


तुम्हाला तुमच्या ग्रुप्सशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत ‌‌ किंवा त्यांच्याशीच चॅटिंग करायचं आहे तर तुम्हीओवू हे अॅप वापरू शकता . या अॅपच्या माध्यमातून आपण ग्रुप व्हिडीओ चॅट करू शकतो . यामध्ये आपणएकावेळी १२ जणांशी बोलू शकतो . हे अॅप आपल्याला स्मार्टफोन आणि कम्प्युटर्सवर उपलब्ध आहे . याचबरोबरआपण या माध्यमातून फेसबुक फ्रेंडस ‌ आणि ट्विटरच्या फॉलवर्सशी व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल्स करू शकतो . हेअॅप आपल्याला चॅटिंगसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे . 


वुई चॅट 


वुई चॅट हे अॅप्लिकेशन आपल्याला व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देते . यामध्ये आपल्याला व्हॉइस चॅटची सुविधाआहे . पण यातून आपण व्हॉइस कॉलिंग करू शकणार नाही . व्हॉइस चॅटच्या माध्यमातून आपण व्हॉइस मेसेजेसपाठवू शकतो . याशिवाय यामध्ये आपल्याला ग्रुप टेक्स्ट चॅट्स , मल्टिमीडिया शेअरिंग आणि ब्राऊजर्सच्यामाध्यमातून चॅट करू शकतो . यात ‘ लूक अराऊंड ‘ नावाचं एक फीचर आहे , ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याआसपास असलेल्या वूई चॅट यूजर शोधून त्याच्याशीही आपण चॅटिंग करू शकतो 
Download WeChat. 


फ्रिंग 


स्कायपेशी साधर्म्य साधारणारे हे अॅप सध्या बाजारात चांगलेच चालत आहे . अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियनऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येणार आहे . यामध्ये आपण व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स करू शकणार आहोत .हे कॉल्स करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडेही फ्रिंग असणे आवश्यक आहे . यात तुम्ही चॅट करू शकतातयाचबरोबर तुम्ही मल्टीमीडिया कंटेन्टही आपण शेअर करता येऊ शकणार आहे . याशिवाय यात तुम्हाला ग्रुपव्हिडीओ प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत .. Download Fring


वायबर 


व्हॉट्स अॅपशी जवळीक साधणारे हे अॅप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये सहज वापरू शकता . आपण हे अॅपडाऊनलोड केल्यावर आपल्या कॉन्टॅक्टबुकमधील नंबर्स सिंक करतो . यात तुमच्या कॉटॅक्ट बुकमधील जी व्यक्तीवायबर वापरत असेल त्या व्यक्तीशी तुम्ही कनेक्ट होतात आणि त्याच्याशी तुम्ही चॅटिंग , व्हॉइस कॉलिंग ,व्हिडीओ कॉलिंग करू शकता . हे अॅप सर्व स्मार्टफोन्सवर उपलब्ध आहे . यामध्ये तुम्हाला एचडी साऊंड क्वालिटीमिळणार असल्याचा वायबरचा दावा आहे . हा आवाज आपल्या फोनच्या आवाजापेक्षा खूप चांगला येतो . Download Viber


टॉकअटोन 


तुमच्या फोनची डेटा कॉस्ट वाचविण्यासाठी टॉकअटोन हे अॅप उपयुक्त ठरू शकते . सध्या हे अॅप केवळ अँड्रॉइडआणि आयओएस डिवायइसवर उपलब्ध आहे . या अॅपच्या मदतीने तुम्ही मोफत व्हॉइस कॉल्स आणि मेसेजेसपाठवू शकता . याशिवाय या अॅपच्या मदतीने तुम्ही फेसबुक किंवा गुगल चॅटही वापरू शकता . पण या अॅपचीएक वाईट गोष्ट आहे . ती म्हणजे या अॅपवर तुम्हाला बऱ्याच अॅडस येत असतात . यामुळे ते वापरताना व्यत्यययेतो . 


फेस टाइम 


अॅपलच्या सर्व डिवायसेसवर वापरता येईल अशाप्रकारचे हे अॅप्लिकेशन आहे . व्हिडीओ कॉल्स करण्यासाठीबाजारात उपलब्ध असलेल्या सर्व अॅप्समध्ये हे अॅप वापरण्यासाठी सर्वात सोपे आहे . यासाठी तुमच्याकडे दुसऱ्याव्यक्तीचा अॅपलचा आयडी किंवा फोननंबर असणे गरजेचे आहे . तसेच त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आपला नंबरबसणेही गरजचे आहे . एका क्लिकवर तुम्ही व्हिडीओ कॉलिंग करू शकता . आयओएस आणि आयमॅकवर आपण हेअॅप सहज वापरू शकतो . 


गपशप 


मोफत एसएमएस पाठविण्यासाठी तुम्ही गपशप या अॅपचा वापर करू शकता . यामध्ये तुम्ही फ्री मेसेजेस पाठवू शकतात . आपण पहिल्यांदा जेव्हा आपल्या मित्राला एखादा मेसेज पाठवू , तेव्हा त्याने फक्त आपल्याला एक रिप्ल्याय पाठवायचा . त्याचा रिप्लाय आला की आपण त्याच्याशी नेहमीसाठी कनेक्ट होतो . त्याच्याशी मग आपण नेहमी गपशपच्या माध्यमातून संपर्कात राहू शकतो . यातही आपण ग्रुप्स तयार करू शकतो आणि ग्रुपमध्येचॅटिंग ‌ आणि फोटो शेअरिंग करू शकतो . हे अॅप डाऊनलोड करताना आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागते . 


पिंच 


हे अॅप आपल्याला स्मार्टफोन याचबरोबर साध्या फीचर फोनमध्येही उपलब्ध होऊ शकते . याचबरोबर आपण तेअगदी साधं इंटरनेट चालणाऱ्या मोबाइलमधूनही वापरू शकतो . यामध्ये आपण मोफत एसएमएस पाठवू शकतो. यात आपण ज्यांच्याकडे पिंच नाही अशा व्यक्तींनाही एसएमएस पाठवू शकतो . आपला मित्र जर आपल्यालारिप्लाय देत असेल तर आपल्याला तो टायपिंग करत असताना दिसतं . यातही आपण ग्रुप करू शकतो . याशिवाययामध्ये आपल्या मेसेज डिलिवर्ड झाल्याचे आणि समोरच्या व्यक्तीने तो मेसेज वाचल्याचेही आपल्याला कळते . 


वॉट्स अॅप 


हे सर्व स्मार्टफोन यूजर्सचे लाडके अॅप्लिकेशन . यामध्ये नवीन सांगण्यासारखे काही नाही . हे अॅप वापरणाऱ्यांचीसंख्या खूपच जास्त आहे . यामुळे यात तांत्रिक बाबी फार न सांगता एकच गोष्ट सांगता येईल ती म्हणजे हे अॅपजेव्हा पैसे देऊन विकत घ्यावे लागेल , तेव्हा आपल्याला इतर अॅप्स मदत करू शकतील . 


चॅट ऑन 


हे अॅप तुम्हाला स्मार्टफोनवर उपलब्ध आहे . याचबरोबर सॅमसंगच्या फीचर फोन्समध्येही हे अॅप उपलब्ध आहे .या अॅपच्या माध्यमातून आपण पाच डिवायसेस लिंक करू शकतो . तसेच ब्राऊजरच्या माध्यमातून आपण याचावापर करू शकतो . टेक्स चॅट याचबरोबर यामध्ये आपण मल्टिमीडिया आणि डॉक्युमेंट फाइल्स शेअर करू शकतो. तसेच अॅनिमेटेड मेसेजेसही आपण शेअर करू शकतो . 


किक मेसेंजर 


हे अॅप इतर मेसेंजरपेक्षा फार वेगळे आहे . यात आपल्याला फोननंबरची गरज भासत नाही . हे अॅप आपण इंस्टंटमेसेंजिंगसारखं वापरू शकतो . यात आपल्याला केवळ आपले यूजर नेम आणि पासवर्ड सेट करावे लागते . याशिवाआपल्या फ्रेंडसना यात अॅड करावे लागते . यात आपण व्हिडीओज आणि फोटोही शेअर करू शकतो . 
हाइक 
हे अॅपही पिंचसारखेच काम करते . ज्यांच्याकडे हे अॅप्लिकेशन उपलब्ध नाही , अशा लोकांनाही आपण यामाध्यमातून फ्री एसएमएस पाठवू शकतो . याशिवाय याद्वारे चॅटही करू शकतो . ज्यांच्याकडे हे अॅप नाही अशालोकांनी जर रिप्लाय केला तर त्यांना मात्र पैसे पडतात . पण हे अॅप वापरणाऱ्या व्यक्तीला एकही पैसा चार्जपडत नाही . 


रॉकेट टॉक 


हे अॅप इतर अॅपपेक्षा वेगळ्याप्रमारे काम करते . चॅटशिवाय याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण यामध्ये पर्सनल सोशलनेटवर्क सुरू करू शकतो . यात आपण आपल्या ठराविक लोकांशी चर्चा करू शकतो किंवा आपल्या गोष्टीत्यांच्याशी शेअर करू शकतो . तुम्ही फोटो , व्हिडीओ आणि व्हॉइस मेसेजेस याद्वारे शेअर करू शकता. 

ADVERTISEMENT

फ्री कॉलिंगला वाढती पसंती

Tags: AppsMessengerSmartphones
ShareTweetSend
Previous Post

स्मार्ट युद्ध आयफोन सॅमसंग ब्लॅकबेरी नोकिया स्मार्टफोन

Next Post

भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
Next Post
भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर

भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech