MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

फॉण्ट्सची गंमत

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 5, 2013
in News
कम्प्युटरमध्ये टायपिंग करत असताना एरिअल , टाइम्सरोमन फार फार तर कॅम्बरिया आणि 
मराठीसाठी मंगल अशा ठराविक फॉण्टच्या पलीकडे आपण कधीच विचार करत नाही . प्रत्यक्षात 
कम्प्युटरमध्ये खूप फॉण्ट्स असतात . प्रत्येक फॉण्ट बनवण्यामागचा एक उद्देश असतो . हेफॉण्ट 
बनवताना टायपोग्राफर्स त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतात , त्यात आपल्या भावना
उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो . वर्षाला असे शेकडो फॉण्ट्स बाजारात येत असतात . सुंदर अक्षर ज्याप्रमाणे आपले लक्ष वेधून घेते त्याप्रमाणेच सुंदर फॉण्टही आपले लक्ष वेधून घेत असतो . यामुळे
 टेक जगतात फॉण्टला विशेष महत्त्व आहे . सरत्या वर्षात बाजारात आलेल्या वेबवर तसेच मोबाइलवर वापरता येतील अशा काही बेस्टफॉण्ट्स विषयी … 


नोटीसीआ 


हा फॉण्ट कॉम्पटीबल टाइपचा आहे . टॅबलेटच्या स्क्रीनवर कोणतीही गोष्ट वाचताना सुसह्य 
व्हावी यादृष्टीने हा फॉण्ट तयार करण्यात आला आहे . या फॉण्टमध्ये वळदार अक्षरे चांगल्या 
प्रकारे दिसतात . यामुळे हा फॉण्ट्सला अनेकांनी पसंती दर्शविली आहे . या फॉण्टमधील 
वळणदारपणामुळे नेहमीच्या मोठ्या फॉण्टला पर्याय मिळणार आहे , असे फॉण्ट बनवणाऱ्यांचे
 म्हणणे आहे . यात फॉण्टचे चार प्रकार असतील . हे फॉण्ट गुगल वेब फॉण्टमध्येउपलब्ध 
आहेत . हे चारही फॉण्ट्स मोफत उपलब्ध आहेत . 


बॅरिओल 


विविध वेबसाइट्स आणि विविध अॅप्समध्ये दिसणारा गोलाकार फॉण्ट हा बॅरिओल फॉण्ट आहे 
. हा फॉण्ट रेग्युलर आणि इटॅलिक अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे . गोलाकार अक्षरांमुळे 
कोणतीही मोठी गोष्ट छोट्या जागेत सेट करता येणे शक्य होत आहे . कोणत्याही वेबसाइटच्या 
मोबाइल आणि टॅबलेट व्हर्जनमध्ये मोठे फॉण्ट वापरले की , अनेकदा आपल्याला त्या गोष्टी 
वाचण्यासाठी स्क्रोल करावे लागते . या त्रास या फॉण्टमुळे कमी होतो आणि छोट्या स्क्रीनवरही 
फॉण्ट तितकाच चांगला दिसतो , असे फॉण्ट क्रिएटरने स्पष्ट केले आहे . 


पॉली 


दक्षिण अमेरिकेतील वायुनाईकी लिपीवर आधारीत हा फॉण्ट आहे . सतत अभ्यासात
 गुंतलेल्यांना लव लेटर लिहिण्यासाठी हा फॉण्ट तयार करण्यात आल्याचे या फॉण्टचा क्रिएटर
 गंमतीने सांगतो . दिसायला साधा असलातरी हा फॉण्ट अनेकांना आकर्षित करून घेतो . याचा 
वापर छोट्या साइजमध्ये चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो .विशेषतः मोबाइलवर वेबसाइट 
वापरण्यासाठी हा फॉण्ट सध्या वापरला जात आहे . वृत्तपत्रांच्या उपशीर्षकासाठी हा फॉण्ट
 वापरता येतो . 


बनवा तुमचा फॉण्ट 


अनेकदा काही सुंदर फॉण्ट पाहून तर अनेकदा फॉण्टची मर्यादा पाहून आपलाही एखादा फॉण्ट
 असावा असं वाटतं. पण हा फॉण्ट कसा तयार करायचा हा प्रश्न असतो . तुम्हाला तुमचा
 फॉण्ट बनवायचा असेल तरhttp://www.myfirstfont.com/ या साइटवर लॉगइन करा . 
या साइटवर फॉण्ट तयार करण्याच्या सर्व स्टेप्स देण्यात आल्या असून त्याचा वापर कसा 
करायचा याची माहितीही देण्यात आली आहे . 
ADVERTISEMENT
Tags: Fonts
ShareTweetSend
Previous Post

अ‍ॅपल, नोकियाला धोबीपछाड देऊन सॅमसंग पहिल्यांदाच टॉपवर!

Next Post

नोकिया आशा २०५ व नोकिया २०६

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

No Content Available
Next Post
नोकिया आशा २०५ व नोकिया २०६

नोकिया आशा २०५ व नोकिया २०६

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech