ADVERTISEMENT
Sooraj Bagal

Sooraj Bagal

आयफोन की अँड्रॉइड

नवीन मोबाइल घेताना नेहमी प्रश्न पडतो कोणता घ्यावा ? अँड्रॉइड की आयफोन ? त्यातही महागडा फोन घ्यायचा तर गोंधळ आणखीनच वाढतो . सॅमसंग गॅलक्सी एस ३ आणि आयफोन पैकी कशाची निवड करावी ते कळतच नाही .दोन्ही त्यांच्या ठिकाणी ग्रेट आहेत , पण मग निवड कशी करायची ? तेव्हा निवड करताना सर्वात आधी पहा ते तुमचा मोबाइल ऑपरेटर . तसेच तुमच्या गरजेच्या अॅप्स आणि इतर गोष्टी कुठे आहेत तेही पहा . कारण एकदा का खरेदी झाली की स्विच करणे आर्थिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने त्रासदायक असते  आयफोन  मोठ्या प्रमाणात चांगल्या अॅप्सची उपलब्धता हे आयफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे . अॅपलच्या अॅप स्टोअरवर ७ लाखाहून अधिक अॅप्स उपलब्ध आहेत . ब - याचशा प्रस्थापित कंपन्या सुरुवातीला आयफोनसाठी अॅप बनवतात नंतर अँड्रॉइडसाठी . कितीतरी काळ इन्स्टाग्राम फक्त आयफोनसाठीच उपलब्ध होतं . फेसबुकनेही त्यांचं नवीन अॅप सुरुवातीला फक्त आयफोनसाठी उपलब्ध करून दिलं नंतर अँड्रॉइडसाठी . ट्विटर आणि फेसबुकचे आयफोन अॅप अतिशय उत्तम आहेत . त्यामुळे पोस्ट टाकणं अगदीचसहज होतं . पासबुकसारखी काही आयफोनसाठीच बनविलेली अॅपही याठिकाणी आहेत . मोबाइल पेमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्क्वेअर कंपनीने त्यासाठी ही सुविधा देऊ केली आहे . याच्या सेटअपसाठी खूप वेळ लागत असला तरी फायदेही आहेतच . सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अॅपलच्या सिस्टीममध्ये उदा . की - बोर्ड बदलण्यासारखे फारसे बदल करू शकत नाहीत . त्यामुळे टेक सॅव्ही नसलेल्या किंवा ज्यांना फारसे बदल करायचे नसतील त्यांना याचा फायदा होतो .  अँड्रॉइड  अँड्रॉइडचा सर्वात मोठा प्लसपॉइंट म्हणजे विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले मोबाइल्स . सँमसंग , एलजी ,मायक्रोमॅक्सपासून कितीतरी कंपन्यांचे अँड्रॉइड फोन बाजारात उपलब्ध आहेत . अगदी गुगलचा नेक्ससही तुमच्यासाठी हजर आहे . अँड्रॉइडचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे , तुम्हाला गरजेप्रमाणे यात बदल करता येतात . उदा . स्विफ्ट की हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले एक आघाडीचे अॅप आहे . यात तुम्ही गरजेप्रमाणे की- बोर्ड बदलू शकता किंवा तुम्ही कोणता शब्द टाइप करणार याचा अंदाज हे सॉफ्टवेअर व्यक्त करते . त्यातून टायपिंग जलद होऊ शकते . आणखी एक गोष्ट म्हणजे याठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या अॅप्स .अॅपल अॅप्स ही डेव्हलपरची पहिली पसंत असली तरी कित्येक अॅप्सला अॅपल मंजुरीच देत नाही . गुगलचं तसं नाही . त्यामुळे गुगलवरही जवळपास ७ लाख अॅप्स आहेत . विंडोज फोन आणि ब्लॅकबेरी हे देखील काही पर्याय आहेत . पण त्यांना अँड्रॉइड किंवा आयफोन इतक्या अॅप्सपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल .

भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीयांनी खूप मोठी झेप घेतली आहे. विंडोज , लिनक्स , अँड्रॉइडसह विविध ऑपरेटिंगसिस्टीमच्या विकासात हातभार लावला आहे . पण संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम बनविण्यात भारताला अद्याप यश आलेले नाही . पण येत्या तीन वर्षांत ही गोष्ट साध्य होऊ शकते . संरक्षण संशोधन व विकास संस्थाअर्थात डीआरडीओ इतर काही संस्थांच्या मदतीने यावर काम करते आहे . बाहेरील देशातून विंडोज , लिनक्स यासारख्या ऑपरेटिंग सिस्टीम आयात केल्याने व्हायरसचा धोका असतो .त्यामुळे आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असणे अनिवार्य असल्याचे डीआरडीओचे प्रमुख व्ही . के . सारस्वतम्हणाले . नवीन ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून त्याला मोठ्याप्रमाणात सॉफ्टवेअर इंजिनीअरची गरज लागणार आहे . सध्या देशभरातील १५० इंजिनीअर्स यावर काम करतअसून संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण व्हायला आणखी तीन वर्षं लागतील . विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारची परदेशी मदत घेतली जाणार नाही . त्यामुळे देशातील उद्योग , संशोधक , वैज्ञानिकांनीडीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक विभागांच्या साथीने या कामाला हातभार लावावा . त्यामुळे पूर्णपणे स्वायत्तहोणे भारताला शक्य होईल , असे आवाहन त्यांनी केले . यापूर्वीही भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्याचे काही प्रयत्न झाले होते . तामिळनाडूतील लोयोला इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी दीपक जॉन यानेही गेल्या वर्षी मायक्रोस ( मोबाइल इनक्युर्ड रिव्होल्युशनाइज्ड ऑपरेटिंग सिस्टीम ) ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली होती . दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दीपकची सिस्टीम क्रॅश झाल्याने त्याला ही प्रेरणा मिळाली होती . १०० एमबी आकाराची ही ओएस त्याने क्लाऊडवर तयार केली होती. त्यामुळे पेनड्राइव्हमधूनही ती वापरता येत होती . त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या इन्स्टॉलेशनची गरज नव्हती पण सिस्टीममध्ये साठविलेल्या विविध फाइल्स यामध्ये अॅक्सेस करता येत होत्या व त्यावर कामंही करता येत होती . त्याने यामध्ये ओपन ऑफिसही दिले होते . यावर इंटरनेट आणि विंडोजवरील विविध अॅप्लिकेशन वापरता येतात . कम्प्युटर बंद केल्यावर त्यातील रॅममध्ये असणारी या संदर्भातील सर्व माहिती डिलीट होत असल्याने युझर्सला त्यांची गोपनीयता जपता येत होती .

स्लाइड्सचा खजिना

स्लाइड शो , प्रेझेंटेशन हे आजकालचे परवलीचे शब्द झाले आहे . बिझनेस कॉन्फरन्सपासून कॉलेजच्या प्रेझेंटेशनपर्यंत सर्वच ठिकाणी स्लाइड शो मस्ट...

अनोळखी ‘फेसबुकर’ला मेसेजसाठी १ डॉलर!

आपण फेसबुकवर भ्रमंती करत असतो... अचानक आपल्यालाएखादा चेहरा, एखादं प्रोफाइल आवडतं... त्याच्याशी / तिच्याशी मैत्री करावीशी वाटते आणि आपण लगेचच त्याला' फ्रेण्ड रिक्वेस्ट ' पाठवतो... कधीकधी या रिक्वेस्टसोबतमेसेजही पाठवतो . मात्र आता अशा अनोळखी (नॉन-फ्रेण्ड) 'फेसबुकर ' ला मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला एक डॉलर, अर्थात...

Page 180 of 202 1 179 180 181 202
  • Trending
  • Comments
  • Latest

नवे लेख